बारामतीत ५५ टँकरने पाणीपुरवठा
By admin | Published: May 20, 2016 02:22 AM2016-05-20T02:22:13+5:302016-05-20T02:22:13+5:30
इंदापूर तालुक्यात २१ अशा एकूण ५५ टँकरनी दोन्ही तालुक्यातील मिळून एकूण १ लाख २६ हजार ५३९ लोकसंख्येला पाणीपुरवठा करण्यात येत आहे
बारामती : बारामती उपविभागातील बारामती तालुक्यात ३४, तर इंदापूर तालुक्यात २१ अशा एकूण ५५ टँकरनी दोन्ही तालुक्यातील मिळून एकूण १ लाख २६ हजार ५३९ लोकसंख्येला पाणीपुरवठा करण्यात येत आहे. बारामती तालुक्यातील २२ गावांसह त्यांच्याशी संलग्न असणाऱ्या २५५ वाड्या-वस्त्यांना, तर इंदापूर तालुक्यातील १८ गावांसह त्यांच्याशी संलग्न असणाऱ्या ४७ वाड्या-वस्त्यांवर टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने जिल्ह्यातील अनेक गावांना त्याचा फटका बसत आहे. बारामती तालुक्यातील बाबुर्डी, काळखैरेवाडी, देऊळगाव रसाळ, जळगाव सुपे, पानसरेवाडी, कारखेल, जराडवाडी, खराडेवाडी, कोळोली, उंडवडी सुपे, उंडवडी क.प., मोराळवाडी, वाकी, कुतवळवाडी, दंडवाडी, साबळेवाडी, निंबोडी, कटफळ, सोनवडी सुपे, गोजुबावी, भोंडवेवाडी, आंबी खुर्द, नारोळी, अंजनगाव, सायबाचीवाडी, भिलारवाडी, वाढाणे, तरडोली, मासाळवाडी, लोणीभापकर, शिर्सुफळ, काऱ्हाटी, मुर्टी, मुढाळे, गाडीखेल, मोढवे, मोरगाव, पारवडी, जैनकवाडी, सावळ या गावांसह त्यांच्याशी संलग्न असणाऱ्या २५५ वाड्या-वस्त्यांना ३४ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. तालुक्यातील टंचाईच्या गावातील एकूण लोकसंख्या ७० हजार ४२२ इतकी आहे. इंदापूर तालुक्यातील कळंब, वडापुरी, गलांडवाडी-२, विठ्ठलवाडी, गोखळी, झगडेवाडी, खोरोची, वकीलवस्ती, भोडणी, कौटळी, शेटफळगढे, रुई, कळस, व्याहाळी, दगडवाडी, घोरपडवस्ती, कचरवाडी नि.के., कडबनवाडी, निरगुडे, वायसेवाडी, अकोले या गावांसह या गावांशी संलग्न असणाऱ्या ४७ वाड्या-वस्त्यांना २१ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. टंचाईच्या गावांतील एकूण लोकसंख्या ५६ हजार ११७ इतकी असून, येथील ९ खासगी, तर २ शासकीय बोअर अधिग्रहण केल्या आहेत.
तरंगवाडी तलावात पाण्यामुळे दिलासा
दरम्यान, इंदापूर व बारामती तालुक्यातील टंचाईची भीषण स्थिती लक्षात घेऊन शासनाने खडकवासला धरणातून इंदापूर तालुक्यासाठी तरंगवाडी तलावात पिण्याच्या पाण्यासाठी पाणी सोडले आहे.
तर बारामती तालुक्यासाठी सुपा तलावात पाणी सोडण्यात आले आहे. ऐन टंचाईच्या काळात हे पाणी सोडण्यात आल्याने या तलावावर अवलंबून असणाऱ्या जनेतला दिलासा मिळाला आहे.