उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर काय बदलले? नीलम गोऱ्हेंनी स्पष्टपणे सांगितले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 10:13 PM2023-07-12T22:13:28+5:302023-07-12T22:14:21+5:30
विधानपरिषद उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचा प्रश्न येत नाही. जर काही प्रश्न आलाच तर नंतर पाहता येईल असे मला सांगितले गेले आहे. - नीलम गोऱ्हे
पक्ष संघटनेकडे दुर्लक्ष झाले. ज्या अपेक्षेने आमचे ६३ आमदार आलेले, बाकीच्या ठिकाणी थोडक्यात पडलेले, दुसऱ्या क्रमांकावर असलेले लोक होते. या लोकांचा वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याचा कल सुरु झाला होता. दुसरे असे की दर तीन महिन्यांनी भाजपासोबत युती तुटेल की राहिल हेच कळत नव्हते, असे विधान परिषद उपाध्यक्षा नीलम गोऱ्हे यांंनी केले.
आम्हाला मत विचारलेच गेले नाही. महापौर बंगल्यामध्ये मुख्यमंत्री कोण करायचे तेव्हा मला मत विचारले गेले. तेव्हा मी उद्धव ठाकरेंनीच व्हावे अशी भूमिका घेतली होती. असे कोणाला वाटले होते की संघटना पूर्ण शून्य होईल, उलट ते मुख्यमंत्री झाले तर संघटना आणि पक्ष दोन्हींना गती येईल असे वाटले होते. त्याच्यात कोरोना येईल असे अपेक्षित नव्हते. तसेच एवढे बंदिस्त राजकारण होईल असेही वाटले नव्हते. यापूर्वी ते जे काम करू शकत होते. ते ते करू शकत नव्हते, अशा शब्दांत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याने काय काय बिघडले हे गोऱ्हेंनी सांगितले.
आमदारांचा निधी कापला गेला, मंत्र्यांचा निधी कापला गेला हे काही माझ्यापर्यंत पोहोचत नव्हते. ते त्यांच्यासोबत वैयक्तिक होत होते. विधानपरिषद उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचा प्रश्न येत नाही. जर काही प्रश्न आलाच तर नंतर पाहता येईल असे मला सांगितले गेले आहे. मी शिवसेनेसाठीच काम करत आहे. एवढ्या अनुभवानंतर मी घडाघडा बोलू शकते, परंतू आपल्याकडून बोलता बोलता इकडचा तिकडचा शब्द जातो, तो जाऊ नये म्हणून मी भाषण वाचले असे त्या म्हणाल्या.