शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : अडचणीची परिस्थिती वा द्विधा मनःस्थिती; एकनाथ शिंदे जातात सातारच्या गावी! यावेळी काय घडणार?
2
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
3
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
4
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
5
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
6
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
7
"वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा", नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र
8
"लॉरेन्स बिश्नोईचा जेलमधून शूटर्सना कॉल; म्हणाला, पोलिसांना घाबरु नका, आपल्याकडे वकिलांची फौज"
9
PAN 2.0 नंतर सरकार आता EPFO 3.0 आणण्याच्या विचारात; ATM मधूनच करता येणार 'हे' काम
10
Maharashtra Politics : मोठी बातमी! महायुतीची बैठक रद्द, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याला जाणार
11
भारतीय गुंडांचा अमेरिकेत 'डंकी'पद्धतीने प्रवेश; लॉरेन्स बिश्नोई टोळीचेही आवडते ठिकाण बनले
12
रोल्स रॉयस घ्यायची असेल तर डाऊन पेमेंट किती करावे लागणार? EMI किती बसणार... जाणून घ्यायला काय हरकत आहे...
13
Shubman Gill कमबॅकसाठी सज्ज; हा घ्या तो १०० टक्के फिट असल्याचा पुरावा (VIDEO) 
14
EPFO कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ३० नोव्हेंबरपर्यंत करा 'हे' काम; अन्यथा होईल मोठं नुकसान
15
अमित शाहांच्या भेटीवेळी चेहऱ्यावर नाराजी, व्हायरल होत असलेल्या फोटोबाबत एकनाथ शिंदे म्हणाले...  
16
गुजरातमध्ये बनावट ऑस्ट्रेलियन डॉलर्सची छपाई, पोलिसांनी चौघांना घेतले ताब्यात
17
'कोणतीही कारवाई करू नका'; जामा मशीद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे कनिष्ठ न्यायालयाला निर्देश
18
F&O मध्ये ४५ नवे स्टॉक्स : Paytm, जिओ, फायनान्शिअल, LIC; Yes Bank सारख्या शेअर्सची एन्ट्री, काय फरक पडणार?
19
PM मोदींच्या सुरक्षेसाठी महिला 'एसपीजी कमांडो', काय आहे व्हायरल फोटोचं सत्य?
20
गोंदियात भीषण अपघात! शिवशाही बस उलटली, ११ जणांचा मृत्यू; मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

शिक्षणमंत्री काय म्हणतात... गरिबाला शिक्षण न्हाय म्हणतात...

By admin | Published: July 27, 2016 8:35 PM

लयं लयं लयं अत्याचार लयं लयं लयं भ्रष्टाचाऱ, मुख्यमंत्री काय म्हणतात़़ग़रिबाला शिक्षण न्हायं म्हणतात़़, शिक्षण मंत्री काय म्हणतात़ग़रिबाला शिक्षण न्हायं म्हणतात़़शिक्षण आमच्या हक्काचं

ऑलनलाइन लोकमतसोलापूर, दि. २७ : लयं लयं लयं अत्याचार लयं लयं लयं भ्रष्टाचाऱ, मुख्यमंत्री काय म्हणतात़़ग़रिबाला शिक्षण न्हायं म्हणतात़़, शिक्षण मंत्री काय म्हणतात़ग़रिबाला शिक्षण न्हायं म्हणतात़़शिक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापचं अशी भारदस्त घोषणा देऊन स्टुडंट्स फेडरेशन आॅफ इंडिया च्या विद्यार्थ्यांनी बुधवारी जिल्हा परिषद परिसर दणाणून सोडला़

शालेय विद्यार्थ्यांची थकीत शिष्यवृत्ती त्त्वरीत देण्यात यावी आणि शिष्यवृत्तीमध्ये महागाई निर्देशांकानुसार वाढ करावी या मागणीसाठी बुधवारी सकाळी जिल्हापरिषदेसमोर निदर्शने केली़ मागील दोन वर्षापासून प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती थकीत आहे़ शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत समाजातील उपेक्षित, दुर्बल, आर्थिक मागास घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध योजना आहेत़

त्यातील शिष्यवृत्ती ही एक योजना आहे़ ही शिष्यवृत्ती बँकेत जमा केला जातो़ मागील दोन वर्षापासून शालेय विद्यार्थ्यांना दिली जाणारी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, गुणवत्ता शिष्यवृत्ती, ओबीसी, एसबीसी शिष्यवृत्ती, एससी, एसटी विद्यार्थ्यांना दिली जाणारी शिष्यवृत्ती दिली गेली नाही़ याचा मोठा परिणाम शिक्षणावर होत आहे़ शासनाने आॅनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया आणली़ राष्ट्रीयकृत बँकेत खाते काढण्यापासून आधार कार्ड देण्यापर्यंतची सर्व प्रक्रिया करुन देखील या शिष्यवृत्या मिळत नाहीत त्यामुळे याकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले़

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती नियमित व वेळेत देण्यात यावी, गुणवत्ता शिष्यवृत्ती नियमित व वेळेत द्यावी त्यात वाढ करावी, विडी कामगारांच्या पाल्यांना मिळणारी थकीत विडी शिष्यवृत्ती त्वरीत द्यावी, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती नियमित व वेळेवर द्यावी, शिष्यवृत्तीमध्ये वाढ करावी, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना नियमित व वेळेवर शिष्यवृत्ती द्यावी, शिष्यवृत्ती जमा केल्याची एक प्रत शाळेला द्यावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या़या आंदोलनात दत्त चव्हाण, किशोर झेंडेकर, मिरा कांबळे, नम्रता निली, मल्लेशम कारमपुरी, शामसुंदर आडम, गणेश भोईटे, राहूल जाधव, विश्वजित बिराजदार, व्यंकटेश यनगंदूल, नविन द्यावनपल्ली यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते़