उद्धव ठाकरेंच्या खेडमधील सभेला नेमकी गर्दी किती? हा व्हिडीओ पाहाच...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2023 08:22 AM2023-03-06T08:22:38+5:302023-03-06T08:23:35+5:30
अपेक्षेप्रमाणे या सभेतून उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आणि भाजपावर टीका केली
मुंबई - राज्यातील सत्तांतरानंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले. केवळ सत्ताच नाही तर उद्धव ठाकरे यांच्यावर शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गमावण्याची वेळ आली. शिवसेनेचे बहुतांश आमदार, खासदार हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. त्यामुळे पक्षसंघटना मजबूत करण्याचं मोठे आव्हान उद्धव ठाकरेंसमोर उभे राहिले. त्यात आता पक्षाला उभारी देण्यासाठी उद्धव ठाकरे राज्यभरात ठिकठिकाणी सभा घेत आहे. त्यातीलच पहिली सभा रत्नागिरीच्या खेड इथं पार पडली.
खेडच्या सभेसाठी हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांनी गर्दी केली. ही सभा अतिविराट होती, या गर्दीचे फोटो सगळीकडे व्हायरल झाले. अपेक्षेप्रमाणे या सभेतून उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आणि भाजपावर टीका केली. खेडच्या गोळीबार मैदानावर उद्धव ठाकरे यांची ही सभा झाली. सत्तासंघर्षानंतर पहिली जाहीर सभा झाली. हे मैदान तुडुंब भरलेले आहेत. रस्ते दोन्ही बाजूने तुडुंब भरलेले आहेत असा दावा माजी खासदार अनंत गीते यांनी केला. खालील दिलेल्या व्हिडिओवरून उद्धव ठाकरेंच्या सभेला किती गर्दी होती याचा अंदाज तुम्ही बांधू शकता.
"भाड्याने माणसे आणली तरी मला संपवू शकत नाहीत"
मुंबई, पुणे, ठाणे येथून भाड्याची माणसे आणून किती प्रयत्न केले तरी रामदास कदम आणि आमदार योगेश कदम यांना राजकारणातून कोणीही संपवू शकत नाही असा घणाघात माजी पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे. एकदा नाही तर शंभर वेळा जरी उद्धव ठाकरे आले तरी आम्हाला पराभूत करू शकत नाहीत. उलट तुम्ही जितक्या वेळा याल तेवढे अधिक लीड आमचे वाढेल असा विश्वास कदमांनी व्यक्त केला.
तसेच उद्धव ठाकरे यांनी माझा धसका घेतला आहे. त्यामुळे खेडमध्ये बाहेरची माणसे आणून विराट सभेचा दिखावा केला जात आहे. जणू ही शिवाजी पार्कचीच सभा वाटत आहे. बाहेरची माणसे आणून स्थानिक राजकारण करता येत नाही. दापोली मतदारसंघातील २-४ टक्के तरी लोक यांच्यासोबत आहेत का? असा सवाल रामदास कदमांनी उपस्थित केला आहे.
१९ तारखेला याच मैदानावर एकनाथ शिंदेंची सभा
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या खेडच्या सभेला प्रत्युत्तर देण्यासाठी त्याच ठिकाणी, त्याच मैदानात १९ तारखेला सभा घेणार असून व्याजासह उत्तरे देणार असल्याचं रामदास कदमांनी सांगितले. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गुलाबराव पाटील, शंभूराज देसाई, आमदार भरत गोगावले उपस्थित राहणार आहेत.