शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
2
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
3
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
4
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
5
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
6
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
7
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
8
Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट
9
म्हशीमुळे मालकाला भरावा लागला ९ हजार रुपयांचा दंड; असं काय घडलं?
10
तुमचा पगार, पॅकेजच नाही, ऑफिसमध्ये या ९ गोष्टीही बोलू नका; नोकरी करताय तर नक्कीच घ्या हा सल्ला...
11
Ed Sheeran ची पुन्हा भारतात कॉन्सर्ट, ६ शहरांमध्ये घुमणार गायकाचा आवाज; कधी आणि कुठे? वाचा
12
Ananya Panday : चंकी पांडे यांच्या 'या' कृतीने अनन्या पांडे त्रस्त; इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा दिला सल्ला
13
"तुमचा मित्र हिंदूंना चिरडतोय"; इन्फोसिसच्या माजी सीईओंनी मोहम्मद युनूस यांच्या मित्राला सुनावलं
14
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
15
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
16
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
17
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
18
"वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा", नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र
19
"लॉरेन्स बिश्नोईचा जेलमधून शूटर्सना कॉल; म्हणाला, पोलिसांना घाबरु नका, आपल्याकडे वकिलांची फौज"
20
PAN 2.0 नंतर सरकार आता EPFO 3.0 आणण्याच्या विचारात; ATM मधूनच करता येणार 'हे' काम

आषाढीसाठी काय तयारी?

By admin | Published: June 11, 2015 1:22 AM

पुढच्या महिन्यातील आषाढी एकादशीसाठी पंढरपुरात येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही, यासाठी नेमकी काय तयारी केली आहे,

मुंबई : पुढच्या महिन्यातील आषाढी एकादशीसाठी पंढरपुरात येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही, यासाठी नेमकी काय तयारी केली आहे, याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश उच्च न्यायायलाने बुधवारी राज्य शासनाला दिले.विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी सुमारे १५ लाख भाविक पंढरपुरात दाखल होतात. पुढच्या महिन्यात २७ जुलैला आषाढी आहे. तेव्हा संपूर्ण राज्यातून १५ लाखांहून अधिक वारकारी पंढरपुरात येतील. मात्र त्यांची राहण्याची व शौचालयाची सोय शासन योग्य प्रकारे करीत नाही. यामुळे भाविकांना स्वत:लाच राहण्याची व्यवस्था करावी लागते. अजूनही पंढरपूरमध्ये मानवाकडून मानवी विष्ठा उचलली जाते, असा आरोप करीत वारकरी संघटनेने उच्च न्यायालयात अर्ज केला. वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी न्यायालयानेच शासनाला आदेश द्यावेत, अशी मागणी अर्जात करण्यात आली आहे.न्या. नरेश पाटील यांच्या खंडपीठासमोर या अर्जावर सुनावणी झाली. याचे प्रत्युत्तर सादर करताना मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी पंढरपूरमधील तयारीचा तपशील न्यायालयासमोर ठेवला. पंढरपुरात चार हजार मोबाइल शौचालये दिली आहेत. अजून सहा हजार दिली जाणार आहेत. वारकऱ्यांना राहण्यासाठी मंदिरापासून अंदाजे दीड किमी अंतरावर १५ एकरांचा भूखंड शासन ताब्यात घेणार आहे, असे अ‍ॅड. वग्यानी यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले. (प्रतिनिधी)