९ डिसेंबरपर्यंत ट्विट करणार नाही - नवाब मलिक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 07:50 AM2021-11-26T07:50:03+5:302021-11-26T07:50:45+5:30
"समीर वानखेडे यांच्या जातीबाबत मंत्र्यांनी जात पडताळणी समितीपुढे तक्रार केली का? जर त्यांनी तक्रार केली नसेल तर या ‘मीडिया पब्लिसिटी’ मागे हेतू काय? अशा पद्धतीने वागणे मंत्र्यांना शोभणारे नाही."
मुंबई : एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे, त्यांचे वडील किंवा कुटुंबातील अन्य सदस्याविरोधात ९ डिसेंबरपर्यंत कोणतेही ट्विट करणार नाही किंवा सार्वजनिक वक्तव्यही करणार नाही, अशी हमी राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी उच्च न्यायालयाला गुरुवारी दिली.
समीर वानखेडे यांच्या जातीबाबत मंत्र्यांनी जात पडताळणी समितीपुढे तक्रार केली का? जर त्यांनी तक्रार केली नसेल तर या ‘मीडिया पब्लिसिटी’ मागे हेतू काय? अशा पद्धतीने वागणे मंत्र्यांना शोभणारे नाही, असे न्या. एस. जे. काथावाला व न्या. मिलिंद जाधव यांच्या खंडपीठाने म्हटल्यावर नवाब मलिक यांचे वकील कार्ल तांबोळी यांनी समीर वानखेडे व त्यांच्या कुटुंबीयांविरोधात सुनावणीच्या पुढील तारखेपर्यंत (९ डिसेंबर) ट्विट व सार्वजनिकरीत्या वक्तव्य न करण्याचे आश्वासन दिले. ‘तुम्ही आश्वासन दिले नसते तर आम्ही मंत्र्यांना पुढील सुनावणीपर्यंत वानखेडे व त्यांच्या कुटुंबीयांविरोधात वक्तव्य व ट्विट करण्यास मनाई करणार होतो. मलिक द्वेषापोटी असे वागत असल्याचे उघड आहे,’ असे न्यायालयाने म्हटले.
मलिक यांना समीर वानखेडे व त्यांच्या कुटुंबीयांविरोधात र्वजनिकरीत्या वक्तव्य करण्यास व ट्विट करण्यास मनाई करण्याचे आदेश देण्यास उच्च न्यायालयाच्या एकलपीठाने नकार दिल्याने समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी खंडपीठापुढे अपिलात गेले. मंत्र्यांनी याबाबत जात पडताळणी समितीपुढे तक्रार केली का? तांबोळी यांनी नकार देताच न्यायालयाने म्हटले की, मग मलिक अशी वक्तव्य का करत आहेत? जात पडताळणी समितीकडे तक्रार केली का? जर तक्रार केली नसेल, तर ते काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत? ते हे सर्व प्रसिद्धीसाठी करत आहेत का? चुकीची जात दाखवली असेल तर त्याबाबत तक्रार करण्यासाठी योग्य मंच उपलब्ध आहे.
पुढील सुनावणी ९ डिसेंबरला -
- तांबोळी यांनी सूचना घेण्यास वेळ मागितली. थोड्या वेळाने तांबोळी यांनी वानखेडे व त्यांच्या कुटुंबीयांविरोधात मलिक यांनी ९ डिसेंबरपर्यंत ट्विट न करण्याची हमी न्यायालयाला दिली. न्यायालयाने त्यांचे आश्वासन मान्य केले.
- मलिक यांची सून न्यायालयात उपस्थित असल्याने न्यायालयाने याबाबत शंका उपस्थित केली. यामध्ये मंत्र्यांचे पूर्ण कुटुंब सहभागी आहे? त्या (मलिक यांची सून) इथे का आहेत? असे विचारत न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी ९ डिसेंबर रोजी ठेवली आहे.वागत असल्याचे उघड आहे,’ असे न्यायालयाने म्हटले. मलिक यांना समीर वानखेडे व त्यांच्या कुटुंबीयांविरोधात सार्वजनिकरीत्या वक्तव्य करण्यास व ट्विट करण्यास मनाई करण्याचे आदेश देण्यास उच्च न्यायालयाच्या एकलपीठाने नकार दिल्याने समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी खंडपीठापुढे अपिलात गेले.
मंत्र्यांनी याबाबत जात पडताळणी समितीपुढे तक्रार केली का? तांबोळी यांनी नकार देताच न्यायालयाने म्हटले की, मग मलिक अशी वक्तव्य का करत आहेत? जात पडताळणी समितीकडे तक्रार केली का? जर तक्रार केली नसेल, तर ते काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत? ते हे सर्व प्रसिद्धीसाठी करत आहेत का? चुकीची जात दाखवली असेल तर त्याबाबत तक्रार करण्यासाठी योग्य मंच उपलब्ध आहे.