‘कांद्याला हमीभाव देण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविणार’

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2019 01:46 AM2019-01-02T01:46:58+5:302019-01-02T01:47:12+5:30

राज्यातील कांद्याचे दर कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी कांद्याला हमीभाव मिळावा यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्याचे आश्वासन पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी मंगळवारी दिले.

 'Will send proposal to give back onion to Center' | ‘कांद्याला हमीभाव देण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविणार’

‘कांद्याला हमीभाव देण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविणार’

Next

मुंबई : राज्यातील कांद्याचे दर कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी कांद्याला हमीभाव मिळावा यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्याचे आश्वासन पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी मंगळवारी दिले.
राज्यातील कांदा उत्पादक शेतकºयांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी मंत्रालयात मंत्री सुभाष देशमुख यांची भेट घेऊन निवेदन दिले. या वेळी देशमुख म्हणाले की, राज्यातील कांदा उत्पादक शेतकºयांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे आहे. कांद्यासाठी सरकारने अनुदान जाहीर केले आहे. काही बाजार समित्या शेतमालाचे दर उतरावेत म्हणून बाजार समित्या बंद ठेवत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. शेतकºयांना अडचणीत आणण्यासाठी असे प्रकार होत असतील तर त्या बाजार समित्यांवर कारवाई करण्यात येईल. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये शेतमालाचा लिलाव झाल्यानंतर व्यापाºयांच्या खळ्यावर नेण्यासाठी लागणारा वाहतूक खर्च घेऊ नये, असेही देशमुख यांनी बैठकीत सांगितले.
उन्हाळी कांदा खरेदीसाठी शासनाने हस्तक्षेप करावा यांसारख्या विविध मागण्या या वेळी शिष्टमंडळाने मंत्र्यांसमोर मांडल्या.

Web Title:  'Will send proposal to give back onion to Center'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :onionकांदा