ऑनलाइन लोकमतपणजी, दि. 17 : राज्यातील स्पा उद्योगामध्ये काम करणा:या महिला व मुलींचा विविध प्रकारे छळ होत असल्याची तक्रार गोव्याच्या नॉर्थ-इस्ट संघटनेने केली आहे. या महिलांचा छळ थांबायला हवा, अन्यथा आम्ही निदर्शने देखील करण्याची तयारी ठेवली आहे, असे संघटनेचे अध्यक्ष आघातो आवोमी व इतरांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
स्नीप सलोन व स्पामध्ये महिला आणि मुलींचा छळ केला जात आहे. प्रतिष्ठेने काम करण्याचा त्यांचा हक्क हिरावून घेतला जात आहे. गोव्याच्या पर्यटन क्षेत्रत स्पा उद्योग वाढत असून या उद्योगातील एकूण कर्मचा:यांमध्ये ईशान्येकडील राज्यांतील सुमारे 9क् टक्के कर्मचारी आहेत. कॅसिनो उद्योगातही बहुतांश ईशान्येकडीलच कर्मचारी असल्याचे संघटनेचे म्हणणो आहे. काही स्पा व्यवसायिकांनी आमच्या संघटनेला देणग्या दिल्या आहेत पण त्याचा अर्थ असा होत नाही की, त्यांनी कर्मचा:यांना हक्कांपासून परावृत्त करावे. यापूर्वी आयटकच्या मदतीने एका महिला कर्मचा:याचा विषय आम्ही मजुर खात्याच्या न्यायालयातही नेला आहे. महिला कर्मचा:यांना मुलभूत हक्कही नाकारले जात आहेत.
स्पामधील महिला कर्मचा:यांना ग्राहकांच्या घरी जाऊन मसाज करण्यास सांगितले जात आहे. काहीवेळा अशावेळी लैंगिक अत्याचार होण्याचाही धोका असतो. लैंगिक अत्याचाराची तक्रार अजून आलेली नाही पण अशा प्रकारच्या शक्यता मुळीच नाकारता येत नाहीत. काही ग्राहक आक्षेपार्ह मागणी करतात असाही अनुभव महिला कर्मचा:यांना येत असल्याचे संघटनेच्या पदाधिका:यांनी सांगितले. घरी जाऊन मसाज करण्याची पद्धत स्पा व्यवस्थापनाने थांबवावी. पार्टी, विवाह व अन्य तत्सम सोहळ्य़ांवेळीही मसाज करण्यासाठी महिला कर्मचा:यांना पाठविले जात आहे. अशा सोहळ्य़ावेळी मद्यपान व धूम्रपान करणा:या पुरुषांच्या गर्दीलाही या महिलांना सामोरे जावे लागते, असे संघटनेच्या पदाधिका:यांनी नमूद केले. किनारपट्टीवर दहा ते पंधरा व्यक्तींना मसाज करून जेव्हा महिला कर्मचारी स्पामध्ये येतात तेव्हा त्यांना आराम करण्यासाठीही व्यवस्थापनाकडून वेळ दिला जात नाही. त्यांना काही खाण्याची देखील मुभा दिली जात नाही, असे संघटनेचे म्हणणो आहे.