बेल्हा : येथील गाडगेमळा परिसरातील ओढ्यावर माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल शेळके यांच्या माध्यमातून ३८ लाख रुपये खर्चून बांधण्यात येत असलेल्या सिमेंट काँक्रिटचा कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे काम अतिशय निष्कृष्ट दर्जाचे होत आहे. हे काम थांबविण्याचे आदेश संबंधित ठेकेदाराला दिले आहेत.येथील स्थानिक शेतकऱ्यांच्या मागणीवरून मंजूर करण्यात आला होता. या बंधाऱ्यामुळे जवळजवळ चारशे ते पाचशे एकर क्षेत्र ओलिताखाली येणार असल्याने व विहिरींच्या पाणीपातळीत वाढ होणार असल्याने आजूबाजूच्या अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या.बंधाऱ्याचे बांधकाम संगमनेर येथील सुधीर विठ्ठलराव कातोरे या ठेकेदाराने घेतल्याचे समजते. ठेकेदाराने काम चालू करताना खाणीच्या डबराऐवजी विहिरीचे डबर पायाभरणीसाठी वापरले. वाळूऐवजी दगडी कच (कृत्रिम वाळू), की तो वापरण्यास परवानगी नाही, तो वापरला गेली. हा प्रकार ग्रामस्थांच्या निदर्शनास आला असता त्यांनी जुन्नर येथील छोटे पाटबंधारे खात्याच्या शाखा अभियंत्याशी संपर्क साधून निकृष्ट दर्जाच्या बांधकाम साहित्याबाबत तक्रार केली. तक्रारीवरून त्यांनी दि. २६ फेब्रुवारी रोजी प्रत्यक्ष बांधकाम स्थळास भेट दिली.बांधकाम साहित्य निकृष्ट दर्जाचे असल्याचे आढळून आल्याने ठेकेदारास बांधकाम थांबविण्याचे लेखी आदेश दिले. परंतु तरीही ठेकेदाराने शासकीय आदेशाकडे दुर्लक्ष करुन काम चालूच ठेवले. त्यानंतर परत ग्रामस्थांच्या तक्रारीवरुन जुन्नरचे शाखा अभियंता राजकुमार मुके यांनी शनिवारी (दि. १) प्रत्यक्ष बांधकामस्थळाला भेट दिली.त्या वेळी कैलास औटी, प्रकाश डावखर, जानकू डावखर व इतरही बऱ्याच ग्रामस्थांनी ठेकेदाराच्या निकृष्ट कामाबद्दल तक्रारी केल्या. त्या वेळी मुके यांनी, ठेकेदारास पत्राद्वारे व ई-मेल पाठवून काम बंद करण्याची नोटीस अगोदरच दिली आहे, असे असतानाही काम चालू असल्याचे दिसून आले. यावरून शासनाच्या आदेशालाही न जुमानता या ठेकेदाराला आशीर्वाद कोणाचा? प्रश्न परिसरातील ग्रामस्थांना पडला आहे.बेटकरमळा येथील पाण्याचा प्रश्न ऐरणीवरराहू (ता. दौंड) येथील बेटकरमळा परिसरातील माटोबा नळ पाणीपुरवठा योजनेचे पाणी येत नसल्यामुळे येथील पिण्याच्या व सांडपाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.ऐन उन्हाळ्यात पाणी येत नाही परिणामी येथील ग्रामस्थांमधून ग्रामपंचायत प्रशासनाबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे तर पिण्याच्या पाण्यासाठी आर्थिक भुर्दंड सोसून पाणी विकत घ्यावे लागत असल्याची वस्तुस्थिती आहे. एकीकडे ग्रामपंचायत प्रशासन माटोबा पाणीपुरवठा सुरळीत चालल्याचे ठणकावून सांगत आहे मात्र बेटकरमळा येथे नळकोंडाळे मात्र प्रत्यक्षात राहू- उंडवडी रस्त्यात अर्धे गाडले गेले आहे. साडेसहा कोटी रुपयांच्या जवळपास रक्कम खर्च करून ही योजना झाली. परंतु पाणीपुरवठा समितीने पाईपलाईन गाडताना योग्य नियोजन न केल्याने व काही ठिकाणी पाईपचे गेज आणि व्यास चुकीचे वापरल्याने पाईपलाईन मध्येच फुटत असल्याचे ग्रामस्थांमधून सांगितले जात आहे.
बंधाऱ्याचे काम निकृष्ट दर्जाचे
By admin | Published: April 03, 2017 1:52 AM