जागतिक ताण-तणाव दिन विशेष : मनाचा त्रिकोण सांभाळा, मनोविकारापासून दूर राहा !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 11:30 AM2019-05-13T11:30:54+5:302019-05-13T11:34:00+5:30

विचार, भावना आणि वर्तन ताणले गेले की तणाव निर्माण होतो.

World Tension-Stress Day Special : Maintain the triangle of mind, stay away from mentality! | जागतिक ताण-तणाव दिन विशेष : मनाचा त्रिकोण सांभाळा, मनोविकारापासून दूर राहा !

जागतिक ताण-तणाव दिन विशेष : मनाचा त्रिकोण सांभाळा, मनोविकारापासून दूर राहा !

googlenewsNext
ठळक मुद्दे मानसोपचार तज्ज्ञाचे आवाहन 

अतुल चिंचली 
      पुणे : मन म्हणजे काय हे जाणून घेतले पाहिजे. शास्त्रीय दृष्टीने मनाच्या अनेक व्याख्या होतात. मेंदू विज्ञान मनाचा विचार वेगळ्या पद्धतीने करतात. पहिल्या पातळीत विचार, भावना आणि वर्तन यांचा समभुज त्रिकोण असतो. तिघांमध्ये संवाद असेल तर समतोल राखला जातो. हे एकमेकांशी भांडत नाहीत त्याला मानसिक आरोग्य म्हणतात. आपल्या आयुष्यात सतत ओढाताण चालू असते. विचार आणि  भावना वेगवेगळ्या दिशेने जात असतात. त्या दोघांच्या जाळ्यात वर्तन अडकते. विचार, भावना आणि वर्तन ताणले गेले की तणाव निर्माण होतो. त्रिकोण फाटला की मानवाला मनोविकार होतात. त्यामुळे हा त्रिकोण सांभाळा असे आवाहन ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ आनंद नाडकर्णी यांनी केले.  
        मानसिक आरोग्याची पहिली पातळी म्हणजे या तिघांमध्ये सुसंवाद हवा. या त्रिकोणात शरीर सहभागी झाले की त्याचे पिरॅमिड तयार होते. पुढच्या पातळीत शरीर आणि मनाच्या सुसंवादाला आरोग्य असे म्हणतो. आपले आवडते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शारीरिक कष्ट घेतो. ते उद्दिष्ट पूर्ण होते. पण आपल्याला थकल्यासारखे वाटत नाही. पण कामाचा आनंद मिळतो. येथे तणाव घेत नाही.
मनाला समाधान मिळते. कामाची इच्छा नसताना काम केले, की शरीर मात्र कष्ट करते पण मन समाधानी होत नाही. हे काम आपण तणाव घेऊन केलेले असते.  त्यासाठी शरीर आणि मनाचा सुसंवाद महत्वाचा असतो. तिसऱ्या पातळीत पिरॅमिड स्थितीशील असल्याने त्याचे रूपांतर गतिशील अवस्थेत करण्यासाठी त्रिकोणाचे रूपांतर गणिती कोनात होते. विचार, भावना वर्तन यांना शरीराची ऊर्जा मिळाली की एक वर्तुळ तयार होते. या वतुर्ळात मनाची ऊर्जा तयार होते. 


१. विचार, भावना वर्तन यांचा सुसंवाद, २. मन शरीर यांचा सुसंवाद, ३. मनाची ऊर्जा आणि शारीरिक ऊर्जा यांचा सुसंवाद या तीन पातळया आहेत. 

विचार, भावना आणि वर्तन यांचा विस्तार कसा होतो.
आपले विचार आत्मकेंद्रित न राहता समूह केंद्रित झाले की विचारांचा विस्तार होतो. आपल्या भावना समजून दुसऱ्यांच्या भावना समजण्याचा प्रयन्त केला की भावनांचा विस्तार होतो.  जसे कौशल्य वाढते तसे वर्तन विस्तारत जाते. कौशल्यामुळे वर्तनात, ज्ञानामुळे विचारात, अनुभवामुळे भावनामध्ये विस्तार होत जाणे. यालाच शिक्षण असे म्हणतात. ही प्रगतभावना आहेत. विचार, भावना आणि वर्तन सुसंवादाचा यांचा विस्तार झाला की आपल्या तणाव कमी होतो. 
या मानसशास्त्रमध्ये संतत्व येते. आपली आवड आणि दुसऱ्यांची आवड एकरूप झाली. या क्षणाला संतत्व असे म्हणतात.
संतत्वाचा प्रत्येक क्षण मानवी जीवनाचा एक भाग असतो. या क्षणात आपला मी पणा विरघळतो. त्याचे दुसरे सूत्र म्हणजे स्वीकार असते. विचाराने ज्ञानमार्ग, भावनेने भक्तिमार्ग, आणि वर्तनाने कर्ममार्ग असे मार्ग संतत्वमध्ये येतात. विचार, भावना आणि वर्तन या तिघांमध्ये ऐक्य निर्माण झाले की संतत्व येते. 
     विचार आणि भावना यांची उत्क्रांती कशी झाली. आदिमानवाच्या काळात त्याच्यावर वन्य प्राणी हल्ला, त्सुनामी, वणवा, पूर, अशा नैसर्गिक आपत्ती येत असे. अशा वेळी त्याला तात्काळ निर्णय घेणे गरजेचे होते. आदिमानवाकडे लढा, पळा, लपून रहा असे तीन पर्याय होते. तो या पयार्यांचा वापर करू लागला. तेव्हाच स्वायत्त मज्जासंस्थेची स्थापना झाली. लढण्याबरोबर संताप, पळण्याबरोबर भीती, लपून राहण्याबरोबर नैराश्य आणि एकटेपणा या भावनांची निर्मिती झाली. यांना आपण आदिमभावना म्हणतो. सर्व काही निर्णय चुकले की जी भावना तयार होते. तिला खंत असे म्हणतात. आदिमानवाच्या काळापासून आदिमभावना मानवामध्ये रुजू झाल्या आहेत. 
आदिमभावनामध्ये स्वत:चा विचार केला जातो. प्रगतभावनामध्ये दुसऱ्याचा विचार केला जातो. 
सध्याच्या परिस्थितीत आपली बौद्धिक, तांत्रिक, सामाजिक, शैक्षणिक, सर्व आव्हाने वाढत आहेत. या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आदिमभावनेबरोबरच प्रगतभावनेचा विचार केला पाहिजे. समोरच्या आव्हानांचा विचार करून डोकं चालवले तर संताप कमी होईल. संताप कमी झाला की माणूस तणावापासून दूर राहतो. 
                            
                                                                 

Web Title: World Tension-Stress Day Special : Maintain the triangle of mind, stay away from mentality!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.