तरुणाईच्या मोबाईल स्टेटसवर झळकतयं विठुरायाचं सावळं रुप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 01:13 PM2019-05-13T13:13:38+5:302019-05-13T13:17:10+5:30
तरुणाईमध्ये क्रेझ; सोशल मीडियाच्या माध्यमातून पांडुरंगांची प्रसिद्धी
पंढरपूर : महाराष्ट्राचे दैवत म्हणजे पंढरपूरचा पांडुरंग़ विठुरायाचे नाव जरी कुण्या भाविकाच्या मुखी आले, तरी त्याचे सावळे रुप आठवते़ श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचे असो किंवा हिंदू सण, उत्सव त्या दिवशी मंदिरात विविध प्रकारची आकर्षक आरास केली जाते़ या आरासातील विठुरायाचे सावळे रूप अनेकांच्या मोबाईल स्टेटसवर पाहावयास मिळत आहे़ विशेषत: तरुणाईमध्ये याची क्रेझ वाढत आहे.
सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरात पंढरीचा पांडुरंग तरुणाईच्या हातून प्रसिध्दीस येत आहे. श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोपºयातून भाविक पंढरपुरात येतात. आषाढी, कार्तिकी, चैत्री व माघ यात्रेसाठी लाखो भाविकांची मांदियाळी होते.
पंढरीचा विठ्ठल म्हणलं की, विठ्ठलाबरोबर धोतर व नेहरु शर्ट घातलेला वारकºयाचा चेहरा समोर येतो़ वारकºयांची वेशभूषाही अशीच आहे.
सध्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत. यामध्ये श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या सर्व उत्सवाला, एकादशीला तुळशीची, विविध रंगीबेरंगी फुलांची आरास, विड्याच्या आणि रुईच्या पानांची आरास, २६ जानेवारी, १५ आॅगस्टनिमित्त तिरंगा रंगात मंदिराची सजावट, आंब्यांची आरास व राष्टÑीय उत्सवादिवशी मंदिरात विविध पध्दतीची सजावट केली जात आहे.
मंदिर सजावटीचे फोटो समितीकडून व्हायरल करण्यात येत आहेत. ते फोटो तरुण आपल्या व्हॉट्सअॅप, फेसबुक यासारख्या सोशल मीडियावर व्हायरल करत त्याच्या स्टेटसवर ठेवत आहेत. यामुळे धोतर घालणाºया वारकºयांपासून ते जिन्स घालणाºया तरुणांमध्येदेखील विठ्ठलाविषयी सर्वाधिक श्रध्दा निर्माण होत आहे. पंढरीचा विठ्ठलदेखील देशभरात, जगभरात प्रसिध्दीस येत आहे.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष डॉ़ अतुल भोसले व सर्व सदस्य, कार्यकारी अधिकारी सचिन ढोले, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या संकल्पनेतून विविध विकासाभिमुख योजना साकारल्या जात आहेत.
विठ्ठल-रुक्मिणीमातेचा उत्सव, हिंदू सणादिवशी मंदिरात आकर्षक सजावट करण्यात येते. ते फोटो व्हॉट्सअॅप, फेसबुकवर व्हायरल होतात. त्यामुळे आबालवृद्ध वारकºयांमध्ये श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचे ते रुप याची एक वेगळी के्रझ निर्माण होत आहे. याचे अधिक समाधान मिळत आहे.
- सचिन ढोले
कार्यकारी अधिकारी, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर