447 फासेपारध्यांचा बाप!

By admin | Published: April 2, 2016 03:04 PM2016-04-02T15:04:09+5:302016-04-02T15:04:09+5:30

‘चोर’! - मूल जन्माला आल्या आल्या त्याच्या कपाळावर लिहिलं जाणारं फासेपारधी समाजातलं हे बिरुद! स्वत:सकट या मुलांवरील गुन्हेगारीचा टिळा पुसून काढण्यासाठी त्यानं जंग जंग पछाडलं. असतील तिथून ही मुलं शोधून काढली. महाराष्ट्रच नाही, तर इतर राज्यांतीलही गावं, पाडे, जंगलं पालथी घालून या मुलांना एकत्र केलं

447 Father of the Faces! | 447 फासेपारध्यांचा बाप!

447 फासेपारध्यांचा बाप!

Next

 

 
‘चोर’! - मूल जन्माला आल्या आल्या त्याच्या कपाळावर लिहिलं जाणारं फासेपारधी समाजातलं हे बिरुद! स्वत:सकट या मुलांवरील गुन्हेगारीचा टिळा पुसून काढण्यासाठी त्यानं जंग जंग पछाडलं.
असतील तिथून ही मुलं शोधून काढली. महाराष्ट्रच नाही, तर इतर राज्यांतीलही गावं, पाडे, जंगलं पालथी घालून या मुलांना एकत्र केलं. गळकं का होईना, डोईवर छप्पर उभारलं. शेळ्या विकून, दारोदार भीक मागून या मुलांच्या शिक्षणाची, पोटापाण्याची सोय केली. अजूनही तेच चालू आहे. 374 चौरस फुटाच्या जागेत आज तब्बल 447 मुलं राहताहेत. आपल्या कपाळावरील गुन्हेगारीचा टिळा
कायमचा पुसण्यासाठी ती झटताहेत.
 
कपाळावरील गुन्हेगारीचा टिळा पुसण्यासाठी फासेपारधी समाजातील मुलांची मंगरूळ चव्हाळ्यातून
रिकाम्या पोटानिशी लढाई..
 
चोरी, दरोडा म्हटले की आधी परिसरातील फासेपारधी समाजातील लोकांना ताब्यात घेतले जाते. अमक्या-तमक्या समाजात जन्म घेतला म्हणून मी साव आणि फासेपारधी समाजात जन्मला म्हणून तो चोर. समाजावर लागलेला हा डाग पुसून टाकण्यासाठी याच समाजातील एका शिक्षकाने स्वत:ची नोकरी सोडली. शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी देशभर फिरून समाजातील तब्बल 447 मुलांना एकत्र केले. अमरावती जिल्ह्यातील मंगरूळ चव्हाळा येथे पत्र्याच्या शेडमध्ये ‘प्रश्नचिन्ह’ नावाने शाळा सुरू केली. ना शासनाचे अनुदान, ना कुठली मान्यता. महागाई मी म्हणत असताना एवढय़ा मुलांचे पोट कसे भरणार? समाजातील माणुसकीवर ‘प्रश्नचिन्ह’ उभी करणारी ही लढाई मतीन भोसले एकटय़ानेच लढत आहे. 
पाच माणसांच्या कुटुंबाला राहण्यासाठी किमान 4क्क् चौरस फुटाचा फ्लॅट लागतो.  ‘प्रश्नचिन्ह’मधील तब्बल 447 मुले केवळ 375 चौरस फूट जागेत शिकतात, जेवतात आणि झोपतातही. उंच भिंती, हवा यायलाही जागा नाही, ओढून ताणून श्वास घ्यावा अशी स्थिती, चारही बाजूंनी तट्टय़ा मारलेले दोन बाथरूम, शौचाला जाण्यासाठी मोकळे रान असा या शाळेचा संसार. खुल्या वातावरणातून कोणी शाळेत गेला तर जीव गुदमरतो. कधी एकदा बाहेर पडेन असे होते. अशा वातावरणात कशी जगत असतील ही मुले? तरीही ती आनंदी आहेत. येथेच राहायचे, गावी कधीच परतायचे नाही, हे प्रत्येकाने ठरवले आहे. शिकार करून, भीक मागून कंटाळलेल्या या मुलांना शिक्षणाचे चार धडे मिळत आहेत. काहीतरी करेन अशी उमेद जागी झाली आहे. खुल्या वातावरणात कुठेतरी रात्र काढावी लागणा:या या मुलांना गुदमरणारा का असेना पण कायमचा आसरा मिळाला आहे. दररोज पोट भरण्याची भ्रांत असलेल्या मुलांना आता आठवडय़ातून पाच-सहा दिवस तरी पोटभर अन्न मिळत आहे. म्हणून ‘प्रश्नचिन्ह’ची शाळा त्यांना आपली वाटते आहे. 
या 447 मुलांचा बाप असलेला मतीन जन्मला तोच गुन्हेगारीचा टिळा लावून.  फासेपारधी समाजात त्याचा जन्म झाला. अमरावती जिल्ह्यातील मंगरूळ चव्हाळा हे गाव. 2क्क्1 मध्ये गावातच दहावी पास केली आणि समाजावरील गुन्हेगारीचा शिक्का पुसण्याचा विडा उचलला. वडील शिकार करायचे. गावात-परिसरात कार्यक्रम झाल्यानंतर पत्रवळीत राहिलेले अन्न जमा करायचे. यातूनच मतीनसह तीन भाऊ, एक बहीण आणि आई-वडिलांचे पोट भरायचे. आठवडय़ातील दोन-चार दिवस असे भागायचे. बाकीचे दिवस रिकाम्या पोटाशी लढाई. त्यामुळे सोळाव्या वर्षीच अमरावतीतील सदन सोशल सेंटरमध्ये नोकरी स्वीकारली. या संस्थेने फासेपारधी समाज राहणारी दोन गावे दिली. शाळाबाह्य विद्यार्थी, स्त्री-पुरुष, रोजगार आदि सव्र्हे करण्याचे काम मिळाले. हे करीत असतानाच समाजासाठी पुढे मोर्चे काढले. आंदोलने केली. नागपूर-जालना महामार्गावर शिंगणापूर येथे चक्का जाम केला. नंतर गावातच, म्हणजे मंगरूळ चव्हाळ्यात राज्य शासनाने पारधी समाजातील पहिली ते चौथीच्या विद्याथ्र्यासाठी वस्तीशाळा सुरू केली. 
निम्न शिक्षक म्हणून मतीनची या शाळेवर नियुक्ती झाली. नोकरी मिळाली तरी समाजासाठी मोर्चे-आंदोलने करण्याचे थांबले नाही. नंतर 2क्क्5 मध्ये स्वत: मतीननेच आदिवासी फासेपारधी समिती स्थापन केली. या माध्यमातून समाजासाठी रोजगार, रेशनकार्ड, जातीचे प्रमाणपत्र यासाठीचा लढा सुरूच ठेवला. फासेपारधी समाजातील लहान-लहान मुलांना भीक मागताना पाहून चाळिशीतील हा तरुण अस्वस्थ झाला आणि अचानक अप्पलपोटेपणाच्या जगण्याला लाथ मारून शिक्षकाच्या नोकरीवर पाणी सोडले. 
समाज बदलायचा तर आधी मुलांना शिक्षित करावे लागेल म्हणून मुलांचा शोध सुरू झाला. केवळ महाराष्ट्रच नाही, तर इतर राज्यांतही फासेपारधी समाज राहणा:या गावांत जाऊन सव्र्हे केला. पोरं काय करतात, आई-बाप काय करतात याची माहिती जमा केली. शिकार करणो हा त्यांचा एकमेव आधार. वन संरक्षण जीवन कायदा लागू झाला आणि तो आधारही गेला. जगायचे कसे? पोरापासून आईवडिलांर्पयत सर्वानीच मुंबई, नागपूरपासून चेन्नई, दिल्लीर्पयत मिळेल ते गाव गाठले आणि भीक मागणो सुरू केले. या शहरांत फिरून मतीनने समाजातील 169 मुले गोळा केली. तब्बल नऊ महिने लागले. स्वत:कडील चार बक:या विकून या मुलांसाठी 2क्क्9 साली त्याने ‘प्रश्नचिन्ह’ शाळा सुरू केली. केवळ आपण आणि आपल्या कुटुंबातच अडकलेल्या प्रत्येकाच्या जगण्यावर ‘प्रश्नचिन्ह’ निर्माण करणारी ही शाळा जगणार आणि वाढणार कशी? 
घरात दाणा नाही आणि खिशात एक आणाही नाही अशा स्थितीत मतीनने सरपंचापासून जिल्हाधिका:यांर्पयत भीक मागितली. गावोगावी जाऊन स्वत: मतीन आणि त्याच्या कार्यकत्र्यानी धान्य, लाकडे, ब्लँकेट, जुने कपडे, तेल, मीठ जमा केले. भीक मागणो हा गुन्हा आहे असे सांगून मतीनला चार दिवस तुरुंगात डांबले गेले. सुटल्यानंतर मतीन पुन्हा आंदोलनाला लागला. आश्रमशाळेसाठी मान्यता मिळावी म्हणून नागपूरपासून मुंबईर्पयत अनेक चकरा मारल्या. मतीन आणि या 447 मुलांची व्यथा कोणाला दिसली नाही. मंगरूळ चव्हाळ्यात अगदी मुख्य रस्त्याच्या बाजूलाच एका हॉलमध्ये ही शाळा भरते. बाजूला एका कुडात अन्न शिजवले जाते. शिकणो, खाणो आणि झोपणो हे सारे याच ठिकाणी. रात्री हॉलमधून मुंगी जायलाही जागा राहत नाही. स्वत: मतीनला अनेक मुलांसह बाहेर व्हरांडय़ात झोपावे लागते. आठवडय़ाला दोन क्विंटल धान्य लागते. तेल, मीठ-मिरची वेगळेच. चार वर्षापासून जालन्यातील मैत्र मांदियाळी ग्रुपतर्फे महिन्याला किराणा मिळत आहे. कधी-कधी तोही कमी पडतो. उपाशी झोपण्याची सवय करून घेतली आहे या सर्वानी. अंगभर कापड, राहायला छप्पर आणि पोटभर अन्न यासाठीच त्यांची लढाई सुरू आहे. रिकाम्या पोटी ही पोरं कशी शिकणार? 
कधीकाळी ही मुले कचरा, भंगार गोळा करायची. भीक मागायची. शिकार करायची. पाकीटमारी-चो:या करायची. ही सर्व मुले आता या शाळेत धडे गिरवताना दिसत आहेत. त्यांच्या मदतीला 1क् ते 12 कार्यकर्तेही आहेत. या शाळेत सहा वर्षापासून 16 वर्षार्पयतची मुले-मुली शिकतात आणि इथेच राहतात. यातील लहान मुलांना अंघोळ घालण्यापासून कपडे बदलण्यार्पयत सर्वच कामे करावी लागतात. एका पैशाचे मानधन न घेता नऊ शिक्षक या मुलांना शिकवितात. यातले तीन शिक्षक फासेपारधी समाजातलेच आहेत. त्यामुळे बोलीभाषेतून मुलांना शिकविण्यास मदत होते. वाहून घेतलेल्या या शिक्षकांना द्यायला मतीनकडे एक पैसाही नाही. पोट भरण्याची भ्रांत तिथे पगार काय देणार? 
या शाळेतून दहावीर्पयतचे शिक्षण घेऊन 22 विद्याथ्र्याची एक पिढी बाहेर पडली आहे. यातल्या काहींना लष्करात जायचे आहे. दोघेजण आयपीएस होण्याचे ध्येय बाळगून आहेत. दोघांना पोलीस व्हायचे आहे. फासेपारधी समाजातील मुलांनी हे स्वप्न पाहावे यापेक्षा मोठा बदल तो कुठला? 
 
 
 
लढाई पोट भरण्याची..
 
‘शाळा रस्त्यावरच असल्याने अनेकजण येऊन पाठ थोपटतात. पोरांचे उपाशी पोट कुणाला दिसत नाही. भीक मागायची मला लाज वाटत नाही. नवीन कपडय़ांची आम्हाला गरज नाही. पोट भरण्यासाठी चमचमीत-गोडधोड लागत नाही. पण किमान भाजी-भाकरी आणि तुम्ही वापरलेले कपडे मिळाले तरी खूप झाले. सध्या लढाई केवळ पोट भरण्यासाठीच सुरू आहे. रिकाम्या पोटाने कोण शिकणार? त्याची तजवीज झाली की पुढचे पाऊल टाकायचे आहे..’ मतीन भोसले यांची ही लढाई अप्पलपोटय़ा समाजातील किती लोकांच्या कानी पडणार? 
 
मैत्र मांदियाळीचा मदतीचा हात
 
जालन्यातील मैत्र मांदियाळी ग्रुपच्या वतीने दर महिन्याला या मुलांसाठी किराणा पाठविला जातो. कधी कपडे, कधी औषधी असे विविध साहित्य पाठविले जाते. शिवाय आणखी काही दानशूर व्यक्तीही समोर येत आहेत. सध्या त्यांच्या मदतीनेच हा संसार सुरू आहे. 
मैत्र मांदियाळीच्या मदतीतून पाच खोल्यांचे बांधकाम सुरू आहे. ते पूर्ण झाल्यानंतर पत्र्याच्या शेडमधील शाळेचा संसार या खोल्यांमध्ये जाईल.
 
भीक मागण्यासाठी 
मुलांचा वापर
 
2क्12-13 सालची आठवण. अशीच भीक मागणारी 13 मुले मतीनने हैदराबादेतून सोबत घेतली. रेल्वेत झोप लागताच ती गायब झाली. पांढरकवडय़ाजवळ त्यांना पुन्हा शोधून काढले. आज ही सर्व मुले ‘प्रश्नचिन्ह’मध्ये आहेत. 
धुळे जिल्ह्यातील 2क्15 सालची एक आठवण. नातेवाइकांना दोन वेळच्या जेवणाचे आमिष दाखवून जंगलात राहणा:या 92 मुलांना शहरात आणले. - कशासाठी तर भीक मागण्यासाठी. ही माहिती मतीनला समजताच खान्देश गाठले. एक आठवडा या मुलांसोबत काढला. मुलांशी मैत्री केली. त्यांचे मनपरिवर्तन केले आणि सर्वाना सोबत घेऊन मंगरूळ गाठले. स्वत:च्या पोटाचा प्रश्न निर्माण झाल्याने यातील 6क् मुलांना नातेवाइकांनी परत नेले. नाशिकमध्ये झालेल्या कुंभमेळ्यात या सर्व मुलांना भीक मागायला लावले. आईबाप तुरुंगात आणि नातेवाइकांना स्वत:चे पोट जवळचे अशा दुहेरी लढाईत ही मुले जगत आहेत. अशा प्रत्येक मुलाला ‘प्रश्नचिन्ह’च्या शाळेत आणण्याचे स्वप्न मतीन बाळगून आहे. 
 
पालक तुरुंगात
 
धुळ्याचा शिवा आठवीत शिकतो. त्याचे वडील सध्या तुरुंगाची हवा खात आहेत. दहावीत शिकणा:या सिकंदरचे वडील नाशिकच्या फुटपाथवर भीक मागतात. प्रत्येकाची व्यथा वेगळी. ‘प्रश्नचिन्ह’मधील 1क्8 मुलांचे पालक राज्यातील वेगवेगळ्या तुरुंगात चोरीच्या गुन्ह्यांतर्गत शिक्षा भोगत आहेत. अनेक मुलांचे पालक असून नसल्यासारखेच आहेत. यातील कुठल्याही मुलाला शाळेत जाण्यासाठी आई-बाबाचा हात नाही मिळाला. या प्रत्येकाचा आई-बाप एकच, मतीन भोसले. 
 
केवळ आश्वासनं!
 
कागदावर रंगवलेल्या अनेक प्रकल्पांवर सरकार पैसे उधळत असते. अनेक आश्रमशाळांची कागदी रंगरंगोटी सर्वज्ञात आहे. शिक्षणाच्या या बाजारात मतीन भोसले सात वर्षापासून ‘प्रश्नचिन्ह’ ही शाळा चालवतो. या आश्रमशाळेला मान्यता मिळावी म्हणून त्याने जिल्हाधिका:यांपासून मंत्र्यांर्पयत सर्वाची भेट घेतली. आश्वासनाशिवाय हाती काहीच पडले नाही.
 
(लेखक ‘लोकमत’च्या मराठवाडा आवृत्तीत उपवृत्तसंपादक आहेत.)
 
 
 
gajanan.diwan@lokmat.com

Web Title: 447 Father of the Faces!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.