पिवळ्या समुद्रातले ‘एअरोपॉलिस’

By admin | Published: April 2, 2016 02:58 PM2016-04-02T14:58:32+5:302016-04-02T14:58:32+5:30

इथे या, ऑफिसे उघडा, जगाशी व्यापार करा, जिथे तुमचे काम तिथेच राहा, इथेच तुमच्या मुलांना युरोप-अमेरिकेतले शिक्षण द्या, मनोरंजन हवे? - ते इथेच! शॉपिंग- तेही इथेच! न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्कचा फेरफटका? - तुमच्या ऑफिसातून खाली उतरलात की घराच्या वाटेवरच!! व्यापारी उपयोगाचे गगनचुंबी टॉवर्स, निवासी संकुले आणि रिटेल विक्रीसाठीच्या बडय़ा महा-दुकानांचे गट असे सगळे सगळे एकत्र असलेली एक स्वयंचलित व्यवस्था म्हणजे सोंगडो हे शहर!

Aaprolis in the Yellow Sea | पिवळ्या समुद्रातले ‘एअरोपॉलिस’

पिवळ्या समुद्रातले ‘एअरोपॉलिस’

Next
>- अपर्णा वेलणकर
 
अठरावे शतक हे नदी अगर समुद्राच्या कडेला म्हणजे पाण्याच्या काठाने वसलेल्या शहरांचे, कारण त्याकाळी व्यापार हेच आर्थिक दळणवळणाचे मुख्य साधन होते आणि मालाची वाहतूक बोटी-गलबतेच करीत.
एकोणिसाव्या शतकात मालवाहतुकीसाठी रेल्वे आली आणि रेल्वेमार्गाच्या काठाने, स्टेशनांभोवती शहरे वाढली. विसाव्या शतकात महामार्ग धावू लागले आणि जीवनदायिनी असलेल्या रस्त्यांच्या कडेने शहरीकरण वाढले. आता एकविसावे शतक थेट हवाई मार्गाने जगाशी व्यापार करण्याचे! हा व्यापार केवळ वस्तूंचा नव्हे, तर मौल्यवान अशा मनुष्यबळाचाही! - म्हणून या शतकातली नवी शहरेही विमानतळांच्या निकट सान्निध्यातली, जगातल्या प्रमुख महानगरांशी कमीत कमी वेळात अतिवेगवान संपर्क करू शकणारी अशी हवीत, असे मानणारा एक विचार आहे. या प्रकारच्या शहरांना ‘एअरोपॉलिस’ म्हणतात. हवाई शहरेच!
दक्षिण कोरियाने पिवळ्या समुद्रात भराव घालून पूर्णत: नव्याने बांधलेले शहर ‘सोंगडो’ हे असेच ‘एअरोपॉलिस’ आहे. नव्या स्मार्ट सिटीच्या परिभाषेत बोलायचे, तर ‘सोंगडो’ ही ‘ग्रीन सिटी’. म्हणजे शब्दश: शून्यातून बांधलेले शहर. हे केवळ शहर नव्हे, आशियाई सत्तास्पर्धेत आपला आर्थिक वरचष्मा निर्माण व्हावा, या शुद्ध व्यापारी उद्देशाने द. कोरियाने जन्माला घातलेले ते एक अत्याधुनिक, तंत्रसज्ज असे ‘प्रॉडक्ट’ आहे. उत्पादन, जाहिरात करून विक्रीला मांडलेले शहर!  सोंगडोचा ‘यूएसपी’ - युनिक सेलिंग पॉइंट  आहे :
जगातल्या एक तृतियांश लोकसंख्येपासून फक्त साडेतीन तासांच्या अंतरावर!
हे कसे? तर आंतरराष्ट्रीय मालाच्या ने-आणीसाठी आशियाई जलवाहतुकीचा महत्त्वाचा टप्पा असलेले इंचऑन बंदर उशाशी. शिवाय सोंगडो बिङिानेस डिस्ट्रिक्टमधून टॅक्सी घेऊन उड्डाणपुलावर चढलात की तुम्ही फक्त अठरा मिनिटात थेट इंचऑन या द. कोरियाच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोचता. की तिथून शांघाय (चीन) दीड तासावर, टोकिओ (जपान) दोन तासांवर आणि हॉंगकॉंग साडेतीन तासांवर. शिवाय जेमतेम छपन्न किलोमीटर अंतरावरचे सेऊल आणि शेजारच्या इंचऑन, ग्योन्गी या महानगरांचा पसारा जमेला धरला, तर द. कोरियाची निम्मी लोकसंख्या हाकेच्या अंतरावर!
- सतत वाढत्या, सशक्त आशियाई बाजारपेठेवर भिस्त ठेवून असलेल्या जगाच्या व्यवसाय-व्यापारासाठी इतके ‘स्टॅटेजिक’ आणि मुख्य म्हणजे वायुवेगाने जोडणारी ‘कनेक्टिव्हिटी’ तयार असलेले ठिकाण दुसरे कुठले असणार?
- या भरवशावरच तर द. कोरियाने सोंगडोच्या उभारणीचा महागडा घाट घातला आणि आपल्या भौगोलिक स्थानमाहात्म्याचा आर्थिक/भूराजकीय उपयोग करून घ्यायचे ठरवले.
व्यापारी उपयोगाचे गगनचुंबी टॉवर्स, निवासी संकुले आणि रिटेल विक्रीसाठीच्या बडय़ा महा-दुकानांचे गट असे सगळे सगळे एकत्र असलेली एक स्वयंचलित व्यवस्था म्हणजे हे शहर!
- पुन्हा पायी चालायला, सायकली चालवायला सोयीचे. मुलांना मित्रंकडे जायचे असेल, तर सायकलवर टांग टाकली की झाले!
‘कनेक्टिव्हिटी’ आणि ‘कम्पॅटेटिव्हनेस’ या दोन सूत्रंभोवती हे शहर उभे राहील, असे आधीच ठरले. मुख्य उद्देश जगभरातल्या बडय़ा कंपन्यांनी आपापली कार्यालये इथे उघडावीत आणि हे व्यापाराचे आधुनिक केंद्र व्हावे हा! बाकीचे शहर उभे राहिले ते या व्यापारासाठी आणि त्या अनुषंगाने जगभरातून येणा:या मनुष्यबळासाठी लागणा:या (त्यांना आकर्षून घेतील अशा) सोयीसुविधांभोवती.
या शहरातल्या ‘स्मार्ट’ तांत्रिक सुविधांची प्राथमिक यादी वाचली (चौकटीत) तरी थक्क व्हावे! सगळे शहरच नव्याने उभे राहिले असल्याने (ग्रीन डेव्हलपमेंट) परस्परांमध्ये गुंतलेल्या तांत्रिक सुविधांचे जाळे उभारणो शक्य झाले आहे. सोंगडोला याचा सर्वात मोठा फायदा मिळाला आहे तो ऊर्जा-व्यवस्थापनात! अत्याधुनिक शहरनियोजनातले ‘ग्रीनफिल्ड’ तंत्र वापरून उभ्या राहिलेल्या ‘सोंगडो’कडे जगभरातल्या तज्ज्ञांचे लक्ष आहे, ते या प्रयोगाला मिळणा:या यशाच्या मोजमापासाठी! - आत्ता कुठे जेमतेम अकरा वर्षे वयाचे हे ‘स्मार्ट’ शहर पूर्ण होऊ घातले आहे. त्यापायी प्रचंड पैसा ओतला गेला आहे.
- आणि हल्लीच एका संशोधनात असे समोर आले आहे, की सोंगडोत राहायला आलेली कुटुंबे- विशेषत: तरुण जोडपी- विकेण्ड आला की शेजारच्या गर्दीने भरलेल्या, प्रदूषणाने कोंदलेल्या सेऊलकडे धावतात.
त्यांना काय असे सुख टोचत असावे?
- त्याबद्दल पुढच्या रविवारी!
 
सोंगडो
म्हणजे कोरियन भाषेत पाईन वृक्षांच्या सावलीतले बेट! या प्रकल्पाला द. कोरियाने
‘भविष्यातले शहर’ म्हटले आहे. सतत वर्तमानाच्या पुढे राहू शकते असे गतिमान, प्रगतिशील शहर.
 
सर्वत्र सेन्सर्स
शहरभर लावलेले सेन्सर्स हे सोंगडोचे वैशिष्टय़. वीज-पाणी-कचरा आणि वाहतूकव्यवस्थेसह बहुतांश यंत्रणा सेन्सर्सच्या आधाराने स्वयंचलित!
 
ग्रीन सिटी
 शहराच्या एकूण क्षेत्रफळातली 4क् टक्के जागा वृक्षलागवड, बागा, हिरवळीसाठी राखीव.
 पेट्रोलपंपांपेक्षा इलेक्ट्रिक चाजिर्ंग स्टेशन्स अधिक.
 पिण्याखेरीजच्या कोणत्याही कारणासाठी
शुद्ध पाण्याच्या पहिल्या वापराला बंदी.
 पावसाचे पाणी साठवणो कायद्याने बंधनकारक.
 शहरातल्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून तेच औद्योगिक वापरासाठी मिळेल अशी व्यवस्था.
 
स्मार्ट सिटी
 शहरातली सर्व व्यापारी आणि निवासी संकुले ‘इंटरकनेक्टेड’.
 कुठेही होणारा विजेचा, वातानुकूलनासारख्या यंत्रणांचा (गैर)वापर एकाच नियंत्रण कक्षातून नियंत्रित करण्याची सोय.
 
टेलिप्रेङोन्स
 स्काईपच्या धर्तीवर चालणारी ऑनलाइन 
थेट संवाद-व्यवस्था (व्हिडीओ कॉलिंग).
 कोणत्याही व्यापारी-निवासी संकुलातून
अन्य कोणत्याही संकुलाशी जोडले जाण्याची सोय. त्यासाठी सर्वत्र मोठे स्क्रीन्स आणि रिमोट्-रिसेप्शनिस्ट.
 नेहमीच्या बैठकांसाठी शक्यतो आपल्या
कार्यालयाबाहेर पडावे लागू नये यासाठी व्यवस्था.
 आपापल्या मित्र-मैत्रिणींना ‘भेटण्यासाठी’ ही टेलिप्रेङोन्स प्रणाली (मोफत) वापरण्याची मुभा.
 या प्रणालीवरूनच छंदवर्ग, शिकवण्या, 
घरपोच सिनेमा-नाटके-मैफली आदि विविध सेवा उपलब्ध.
 
प्रयोगशाळा
हातातल्या मोबाइलवरूनच घरातली आणि ऑफिसातली उपकरणो चालवता यावीत यासाठी ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’शी संबंधित शहर-जाळे उभे करण्यासाठी कार्यरत ‘सिस्को’ची प्रयोगशाळा.
 
स्मार्ट ऊर्जा
 सर्व यंत्रणा परस्परांशी जोडल्याने 
नियंत्रित वापरामुळे विजेची 3क् टक्के बचत.
 खिडक्यांना सूर्यप्रकाश नियंत्रित करणा:या काचा.
 मानवी विष्ठेमधून तयार होणा:या उष्णतेपासून पाणी गरम करणारी यंत्रणा.
 
(लेखिका ‘लोकमत’च्या फीचर एडिटर आहेत.)
 
aparna.velankar@lokmat.com

Web Title: Aaprolis in the Yellow Sea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.