शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

कट.. रीटेक..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 6:03 AM

लेखक गोष्ट लिहितात,  कलाकार आणि तंत्नज्ञांना पैसे देऊन,  निर्माता त्यांच्या सेवा विकत घेतो. त्या गोष्टीचे एपिसोड्स तयार करतो.  हे एपिसोड्स वाहिनीला विकतो.  वाहिनीवाले ते जाहिरातीसह  प्रसारित करुन पैसे कमावतात.  कोरोनामुळे मार्चपासून शूटिंग्ज बंद आहेत  या सगळ्या गोंधळात निर्मात्यांचे पैसे अडकले.  त्यांनी कलाकार आणि तंत्नज्ञांचे पैसे अडकवले.  फिल्म आणि टीव्ही लाइनमध्ये काम करणार्‍या  तीन लाख लोकांचा चालू सीन कोरोनामुळे कट झालाय  आणि दूर दूरपर्यंत रीटेकची शक्यताही दिसत नाहीये.

ठळक मुद्देकोरोना लॉकडाऊनचा मराठी मालिका निर्मितीवर झालेला परिणाम 

- योगेश गायकवाड

शूटिंग चालू असताना मध्येच ‘कट कट’ असं मोठय़ाने ओरडून दिग्दर्शक चित्नीकरण थांबवतो तेव्हा काहीतरी चुकलेलं असतं. आणि मग ती चूक सुधारण्यासाठी ‘रीटेक’ केला जातो. तशी ‘रीटेकची’ सोय सध्या कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीलापण असती तर किती बरं झालं असतं. विषाणूचा शिरकाव रोखण्यात झालेली चूक सुधारून परिस्थितीचा रीटेक केला असता आणि सगळं ठीक झालं असतं. व्यवहारी जगातल्या प्रॅक्टिकल लोकांना हा विचार स्वप्नाळू वाटेल; पण आमच्या फिल्म आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीतले बहुतांश लोक असाच विचार करतात. कारण आमचं विचार करण्याचं केंद्र मेंदूऐवजी हृदयात असतं. कदाचित हीच आम्हा लोकांची ताकद आहे आणि त्यामुळेच आम्ही सृजनाची उत्तम निर्मिती करतो, पण व्यवहाराच्या पातळीवर कायम चाचपडत असतो. म्हणून मग कोरोना महामारीचा फिल्म आणि टेलिव्हिजन उद्योगावर काय परिणाम झाला, याचा विचार करतानापण आधी मानसिक आणि मग आर्थिक बाजू बघावी असं मला वाटलं.जवळ जवळ दोन महिन्याच्या लॉकडाउनचा फिल्म आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये काम करणार्‍या लोकांच्या मनावर फारसा नकारात्मक परिणाम झालेला नाही, असं थेट विधान मी अत्यंत जबाबदारीने या ठिकाणी करीत आहे. इतर क्षेत्नात नोकरी करून महिन्याच्या महिन्याला रेग्युलर इन्कम घरी नेणार्‍या नोकरदारांना लॉकडाउनचा जितका मानसिक धक्का बसलाय तेवढा फिल्म आणि टेलिव्हिजनच्या क्षेत्नातल्या लोकांना बसलेला दिसत नाही. कारण आमचं क्षेत्न आर्थिक बेभरवशाचं आहे, याची आम्हाला आधीपासूनच कल्पना असते.काम मिळवण्यासाठी स्ट्रगल करायचा, काम मिळालं की त्याचे पैसे मिळवण्यासाठी स्ट्रगल करायचा आणि मग पुन: पुढचं काम मिळवण्यासाठी स्ट्रगल करायचा. दरम्यान, दोन -तीन महिने एक रुपयाचंपण काम मिळालं नाही, अशी अवस्था आम्हाला नवीन नाही. घरच्यांच्या परवानगीने आलेल्या नवख्या स्ट्रगलर्सना घरून सप्लाय चालू असतो. तर स्वत:च्या हिमतीवर आलेले गरजा कमी करून काटकसरीने जगत काम शोधात असतात.मार्गी लागलेली माणसं दोन पैसे साठवून असतात. किंवा उधार उसनवार करण्याइतकी पत बाळगून असतात. आणि प्रस्थापित लोक खाऊन पिऊन सुखी असतात. त्यामुळे दोन महिने काम बंद असल्याने हादरून गेलेले लोक सिनेसृष्टीत आपल्याला क्वचितच दिसतील.  आम्हाला एकवेळ पैसा दिसला नाही तरी चालतो; पण आशा मात्न कायम दिसत राहिली पाहिजे.एरवी शूटिंग सुरू असताना लोक ऑडिशन्स देत असतात. आपण लिहिलेली सिनेमाची गोष्ट किंवा वेब सिरीजसाठीची कन्सेप्ट निर्मात्यांना ऐकवत असतात. गिटारवर बनवलेली एखादी नवीन ट्यून ऐकवत फिरत असतात. संध्याकाळी सगळं टेन्शन सिक्स्टी- नाइण्टीच्या हिशोबात रिचवतात आणि दुसर्‍या दिवशी दुपारी पुन्हा काम शोधायला निघतात. लॉकडाउनमुळे रोज सोबत करणारे ते आशेचे किरण गायब आले आहेत आणि त्यामुळे आमची ही फिल्मी माणसं अस्वस्थ झाली आहेत. वाचायला कितीही भारी वाटलं तरीही मनोरंजनाच्या क्षेत्नात काम करणार्‍या लोकांची हीच शोकांतिका आहे. स्पॉटबॉयपासून ते निर्मात्यापर्यंत प्रत्येकजण हा थोड्या अधिक प्रमाणात मनस्वी कलाकार वृत्तीचा असतो. एक्सेल शीटपेक्षा पांढर्‍या मोकळ्या कागदाला जास्त महत्त्व देणारी आम्ही माणसं, आमच्याही नकळत ‘आर्थिक निरक्षर’ असतो. आमच्यातल्या फार कमी लोकांना आपल्या कामाचे योग्य पैसे लावता येतात, लावले तर वसूल करता येत नाहीत, केले तर ते साठवून ठेवता येत नाही आणि ‘अँसेट-लायबिलिटी’चं गणित मांडत आलेला पैसा गुंतवून वाढवणे तर आम्हाला स्वप्नातपण सुचत नाही. टीव्ही चॅनेल्समध्ये नोकरी करणारे काही लोक सोडले तर बाकी आम्ही सगळे फ्री लान्सर या प्रवर्गात मोडतो. कर भरतो, तरीपण देशाच्या अर्थसंकल्पात आम्हाला जागा नसते. साधं बँकेचं कर्ज मिळण्याइतकीपण बाजारात आमची पत नसते. नुसते नावाला ‘इंडस्ट्री’; पण प्रत्यक्षात किमान वेतनदर, कामाच्या तासांच्या र्मयादा, वित्तसहाय्य, पेन्शन योजना, अपघात विमा. असल्या कोणत्याच गोष्टी लागू होण्याइतके आम्ही ‘ऑर्गनाइज्ड’ नाही आहोत.या सर्व पार्श्वभूमीवर आम्ही आधीच इतके गाळात आहोत की हा रुमालाच्या भोकातूनपण आत न जाऊ शकणारा कोरोना विषाणू आम्हाला अजून काय चेपणार??.अशी ही फारसा फरक न पडलेली फिल्म इंडस्ट्रीची मानसिक बाजू असली तरी शेवटी जगण्यासाठी फक्त प्रसन्न मन असून भागत नाही तर त्यासाठी भाजीपोळीपण लागते आणि ती पैशानेच विकत घ्यावी लागते. त्यामुळे या व्यवसायाची आर्थिक बाजूदेखील या जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर तपासून बघितली पाहिजे.सिनेमा आणि त्यातही मराठी सिनेमा निर्मिती हा अजूनही बर्‍यापैकी ‘रामभरोसे’ कारभार आहे. त्यामुळे या लेखात आपण त्यातल्या त्यात ऑर्गनाइज्ड अशा टीव्ही उद्योगाचा आर्थिक श्वास कोरोनाने कसा कोंडला आहे ते बघूयात. त्याकरिता आधी या व्यवसायाचं आर्थिक चक्र समजावून घ्यावं लागेल. लेखक गोष्ट लिहितात, कलाकार आणि तंत्नज्ञांना पैसे देऊन, त्यांच्या सेवा विकत घेऊन  निर्माता त्या गोष्टीचे एपिसोड्स तयार करतो. निर्मिती खर्चावर आपला नफा लावून निर्माता हे एपिसोड्स वाहिनीला विकतो. वाहिनीवाले हे एपिसोड्स प्रसारित करताना त्यासोबत  जाहिराती लावून पैसे कमावतात. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे साधारण मार्च महिन्याच्या मध्यापासून शूटिंगज बंद झाली आहेत आणि सर्व वाहिन्यांना आपल्या चालू मालिकांचं प्रक्षेपण थांबवून जुन्या मालिका रिपीट कराव्या लागल्या. तेजीत चालू असलेल्या मालिकांच्या तुलनेत जुन्या मालिकांना अर्थातच जाहिराती कमी दराने मिळाल्या. त्यात लॉकडाउनमुळे विक्र ी आणि उत्पादन बंद असल्याने फक्त ‘फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स’ (एफएमसीजी- साबण, टूथपेस्ट इत्यादी) सेग्मेंट मधल्याच मोजक्या जाहिराती मिळत असल्याने वाहिनीचा रेव्हेन्यू अचानक खाली आला. आधीच ‘ओटीटी’ (ओव्हर द टॉप- अर्थात वेब मीडिया )च्या प्रचंड स्पर्धेमुळे अस्तित्वाचा संघर्ष करीत असलेल्या पेड चॅनेल्सची अवस्था बिकटच होती. त्यात एका रात्नीत निर्मिती बंद झाल्याने परिस्थिती अधिकच वाईट झाली. लोक घरात कोंडून बसणार म्हणजे जास्त टीव्ही बघणार, त्यामुळे आपला ‘टीआरपी’ वाढवण्याची ही सुवर्णसंधी आहे, हे समजत होतंपण चॅनेल चालवायला पुरेसा स्टाफ नव्हता. र्मयादित स्टाफ सोबत कसेबसे जुन्या मालिका दाखवत त्यांनी चॅनेल चालू ठेवलं. या सगळ्या गोंधळात निर्मात्यांचे लॉकडाउन लागायच्या आधी केलेल्या कामाचे पैसे अडकले. त्यांचे पैसे अडकले म्हटल्यावर त्यांनी कलाकार आणि तंत्नज्ञांचे पैसे अडकवले. त्यामुळे हातात पैसे नाहीत असे दोन महिने गेले. आणि अजून दोन महिन्यांनी शूटिंग सुरू होईल असं गृहीत धरलं तरी 90 दिवसांच्या क्रे डिटने प्रत्यक्ष पैसे हातात यायला किमान पाच ते सहा महिने लागणार. फ्री लान्स काम करणारे स्ट्रगलर्स एकमेकांच्या आधाराने जगत असतात. 4-5  जण रूम भाड्याने घेऊन राहत असतात आणि पैकी एकाला जरी काम मिळालं तरी चौघांचा महिना निघून जातो. पण सगळेच घरी बसलेत, असं पहिल्यांदाच घडलं.बरं, चॅनेलच्या कॉर्पोरेट स्ट्रक्चरमध्ये नोकरी करून शाश्वत पगार घरी नेणार्‍यांनी होम लोनचे हफ्ते लावून घेतले होते. लॉकडाउनच्या काळात त्यांच्या पगारात तीस टक्क्यांपर्यंत कपात करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना स्ट्रगलर म्हणून रडता येत नाही आणि महिन्याचं गणित सावरताही येत नाहीये. पण नोकरी करणार्‍यांना किमान वर्क फ्रॉम होमच्या बदल्यात अर्धा का होईना पगार मिळत आहे. स्ट्रगलर घरी परत जात आहेत किंवा मदतीसाठी हात पसरत आहेत. खरी गोची ही निर्मात्याकडे मधल्या फळीत काम करणार्‍यांची आहे. निर्मात्याने हात वर केल्यावर त्यांना अक्षरश: कोणीच वाली नाही. आणि असे शे-दोनशे नाही तर मुंबईच्या फिल्म आणि टीव्ही लाइनमध्ये काम करणार्‍या तीन लाख लोकांचा चालू सीन कोरोनामुळे कट झालाय आणि दूर दूरपर्यंत रीटेकची शक्यतापण दिसत नाहीये. 

मराठी-हिंदी मालिकांचा खर्च आणि नुकसान किती?मराठी मालिकेच्या एका भागाचा साधारण निर्मिती खर्च - दीड ते दोन लाख रुपये हिंदी मालिकेच्या एका भागाचा साधारण निर्मितीचा खर्च - दहा ते बारा लाख मराठी मालिकांच्या निर्मितीत वर्षाला होणारी गुंतवणूक -250 कोटी हिंदी मालिकांच्या निर्मितीत वर्षाला होणारी गुंतवणूक- 5000 कोटी लॉकडाउनमुळे चित्नीकरण बंद पडलेल्या मालिका -हिंदी - 70, मराठी- 40 आणि वेब सिरीज - 10 (खिशातले पैसे घालून किंवा कोणाकडून तरी उधार घेऊन हौशी पातळीवर तयार होणार्‍या शॉर्ट फिल्म्स, वेबिसोडसचा यात अंतर्भाव नाही. मराठी सिने, मालिका क्षेत्नातील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर नुकसानीचा अंदाज देणारी ही आकडेवारी नुकतीच मांडली होती.)

वाहिनी आणि निर्मात्यांनी समन्वयाने करायची उपाययोजना

1- सरकारची परवानगी मिळताच शूटिंग सुरू करण्याच्या दृष्टीने तयारीत राहणे. 2- लॉकडाउनच्या आधीच्या कामाचे थकीत पैसे ताबडतोब अदा करणे. 3- शूटिंग सुरू झाल्यावर 90 दिवसानंतर पैसे मिळण्याची अट शिथिल करून दर महिन्याला पैसे देण्यात यावेत. 4- वाहिनीने सगळा भार निर्मात्यावर न टाकता साठ टक्के रक्कम थेट कलाकारांच्या / कामगारांच्या खात्यात जमा करावी. आणि चाळीस टक्के निर्मात्याने खर्च करावेत. 

क्रिएटिव्ह स्तरावर काय उपाययोजना करता येतील? 1- प्रोग्रामिंगमध्ये बदल करून सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवसच मालिका दाखवाव्यात.2-  शनिवार आणि रविवारी तरुण प्रेक्षकांना आकर्षित करणारे कमी खर्चाचे वेब कन्टेन्टसारखे कार्यक्र म दाखवून निर्मितीवरचा ताण कमी करावा. 3- सोशल डिस्टन्सिंगचं बंधन उठेपर्यंत मालिकेची गोष्ट एकाच घराभोवती / कमीत कमी पात्नसंख्या आणि कमीत कमी लोकेशन्समध्ये घडेल अशी लिहून घ्यावी.4- आज निर्मात्याला फक्त पुढील आठ दिवसांचे एपिसोड्स आगावू लिहून त्यांचं बँकिंग करून ठेवता येतं. हा अलिखित संकेत शिथिल करून जास्तीत जास्त बँकिंग करण्याची मुभा द्यावी. 

शासन स्तरावर काय उपाययोजना करता येतील? 

1- अत्यावश्यक नसली तरी लॉकडाउनच्या काळात मनोरंजन ही आवश्यक सेवा आहे आणि त्यावर लाखो लोकांची उपजीविका अवलंबून आहे, याचा विचार करून सरकारने लवकरात लवकर मार्गदर्शक सूचना जारी करून रेड झोनव्यतिरिक्त शूटिंगला परवानगी द्यावी. 2- शूटिंग लोकेशनच्या भाड्यात सूट द्यावी, निर्मात्यांना वाहिनीकडे थकलेले पैसे मिळावेत यासाठी सरकारने विशेष सूचना कराव्यात. 3- वाई, नाशिक, कोल्हापूर या ठिकाणी चित्नीकरण करू इच्छिणार्‍या निर्मात्यांना  परवानग्या पटकन मिळाव्यात यासाठी स्थानिक प्रशासनाला आदेश द्यावेत.4- निर्मात्यांना विनातारण आणि कमी व्याजाने कर्ज उपलब्ध करून द्यावे. फिल्म आणि टेलिव्हिजन या उद्योगाला इंडस्ट्रीचा दर्जा देऊन दीर्घकालीन उपाययोजना करावी. 

मानसिक धीर देण्यासाठी काय उपाययोजना करता येतील?   

1- कलाकार आणि सिनेकामगारांच्या संघटनांनी आपल्या सभासदांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. 2- राजकीय संघटनांनी आपापल्या पक्षाची ताकद वापरून सरकारी स्तरावरील अपेक्षा लवकरात लवकर पूर्ण होतील यासाठी पाठपुरावा करावा. 3- इंडस्ट्रीमधल्या सिनिअर लोकांनी प्रत्यक्ष/समाजमाध्यमांतून आपल्या विभागातील ज्युनिअर लोकांशी सतत संपर्कात राहून त्यांना धीर द्यावा. 4- बाहेर कितीही राजकीय वातावरण तापलं तरीही फिल्म इंडस्ट्रीने आपला एकोपा नेहमीप्रमाणे जपावा आणि बाहेरचे विरुद्ध स्थानिक असल्या वादात न पडता, एकत्न मिळून आपलं रुतलेलं चाक मोकळं करावं. 

yogmh15@gmail.com(लेखक फिल्म आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीत प्रोजेक्ट हेड म्हणून कार्यरत आहेत.)