- धनंजय जोशीकाही वर्षांपूर्वी एका मोठ्या कंपनीत काम करत होतो. माझ्या हाताखाली सात-आठ लोकं काम करत होते. आमचं काम चांगलं चाललं होतं, आमच्या कामामुळे कंपनीला फायदापण होत होता.आता अमेरिकेमध्ये (भारतातपण असलं पाहिजे !) तुमच्या डिपार्टमेंटमध्ये किती फायदा मिळाला यापेक्षा तुमचे काम करणारे लोकं किती सुखी आहेत किंबहुना त्यांना त्यांचा बॉस किती ‘आवडतो’ याबद्दल बरंच महत्त्व दिलं जातं.त्यासाठी ३६० डिग्रीत सर्व्हे करतात, म्हणजे तुमच्याभोवतीच्या सर्वांबद्दल त्यांना ऐकायचं असतं!असो! म्हणजे माझ्या हाताखाली काम करणाºया लोकांचं काय मत होतं?आणखी गंमत म्हणजे त्यांना त्यांचं मत तुमच्या ‘बॉस’ला प्रत्यक्ष समोरासमोर द्यावं लागतं!माझ्या हाताखाली एक मुलगी काम करायची. सुलभा नाव तिचं!आमची मीटिंग! मी म्हणालो, सो सुलभा, आय अॅम रेडी! व्हॉट डू यू वॉण्ट टू से?सुलभा म्हणाली, ‘धनंजय, यू आर अ ग्रेट पर्सन बट अ टेरिबल मॅनेजर !’मी थक्कच झालो.म्हणालो, व्हाय, सुलभा?ती म्हणाली, ‘तू आम्हाला कधीच आमच्या ‘चुका’ सांगत नाहीस. तू फक्त म्हणतोस की हे वेगळं करायला पाहिजे म्हणून! म्हणजे आम्ही चुकलो की नाही? आमचा त्यामध्ये दोष काय? इतर मॅनेजरनी आमचा पगार कमी केला आणि तू वाढवून दिलास!’मी तिला म्हणालो, सुलभा मला कोणात ‘चूक’ दिसतच नाही. फक्त आपण काय करावं ते दिसतं! माझे झेन गुरु मला नेहमी सांगायचे, ‘डोण्ट चेक’ म्हणजे दुसºयांच्या चुकांकडे लक्ष देऊ नको! त्यामुळे ‘चूक’ हा शब्द निसटला असं म्हणायला हरकत नाही.मला आठवतं, ‘एक कप आपल्या हातातून पडला आणि फुटला... ती एक चूक की ‘केवळ एक फुटलेला कप’?एक नवीन ध्यान साधना मनात आली!एक दिवस ठरवावा!सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्याबरोबर एक कागद ठेवावा. प्रत्येक वेळी आपल्या मनामध्ये ‘हे असं का?’ आणि ‘कसं कळत नाही त्याला?’ असे विचार आले की त्याची नोंद करावी. मोजावेत! त्या प्रत्येक विचारांसाठी आपण तासभर तरी ध्यान करावं असा निश्चय करावा! आणि वेळ न घालवता चालायला लागावं! सान सा निम म्हणायचे, ‘ट्राय, ट्राय, ट्राय, ट्राय, फॉर टेन थाउसण्ड इयर्स!’ही दहा हजार वर्षे कशी जमली?त्याचं उत्तर इथेच कुठेतरी!
joshi5647@gmail.com