किसमसची शेती
By admin | Published: April 16, 2016 04:41 PM2016-04-16T16:41:25+5:302016-04-16T16:57:40+5:30
कधी रवाळ तूप घातलेल्या खमंग शि:यात ‘तो’ दिसतो, तर कधी लाडवाचा घास घेताना हळूच दाताखाली येतो. कधी फरसाणची लज्जत वाढवतो, तर कधी पुलाव-मसालेभाताला झक्कास ‘टेस्ट’ आणतो. दिवाणखान्यातल्या ‘ड्रायफ्रूट्स’च्या तबकात तर त्याची जागा हमखास ठरलेलीच. जगभरातील खवय्यांची पसंती मिळवलेल्या इवल्याशा बेदाण्याची रोचक आणि रंजक कहाणी.
Next
>
- परिक्रमा
- श्रीनिवास नागे
सांगली-पंढरपूर राज्यमार्गावरील कवठेमहांकाळ तालुक्याचा पश्चिम भाग. या भागाच्या पाचवीलाच दुष्काळ पुजलेला. इथल्या माळरानावर कुसळाशिवाय दुसरं काहीच दिसत नाही. अधूनमधून दिसल्याच तर फक्त बाभळी..
उन्हाळ्यात भाजून काढणारं रखरखीत ऊन. पाण्याचा पत्ता नाही! अलीकडे मात्र फेब्रुवारी उजाडला की या रस्त्याच्या दुतर्फा प्लॅस्टिकच्या काळ्या-पिवळ्या कागदानं झाकलेली शेड दिसू लागतात. जणू नवी गावंच वसल्याचं भासतं. मार्चमध्ये इथं माणसांची लगबग वाढते. मालवाहतुकीच्या गाडय़ांची वर्दळ दिसते. रंगीबेरंगी क्रेटच्या थप्प्या नजरेस येतात.. कारण बेदाण्याचा हंगाम रंगात आलेला असतो. ही शेड असतात बेदाणा निर्मितीची.
नागज, शेळकेवाडी, आगळगाव, चोरोची, घोरपडी, दुधेभावी ते शेजारच्या सोलापूर जिल्ह्यातल्या जुनोनी, हातीदर्पयत नजर टाकावी तिकडे हेच चित्र दिसतं.
कमी आद्र्रता, जास्तीत जास्त तपमान, कोरडं हवामान असणारा हा भाग. नेमकं हेच वातावरण बेदाणा निर्मितीस पोषक असतं. त्यामुळे आज इथं बेदाणा निर्मितीची पाच-साडेपाच हजारांवर शेड उभ्या राहिल्यात.
तासगाव, मिरज पूर्व भाग आणि जत तालुक्यातही अशा शेड दिसतात. काही शेतक:यांनी जागा विकत घेऊन, तर काहींनी भाडय़ानं जागा घेऊन शेड उभ्या केल्यात. पण सर्वात धंदा चालतो तो भाडेपट्टीचा. स्वत:च्या जागेवर शेड उभी करून ती बेदाणा तयार करण्यासाठी भाडय़ानं दिली जातात. या शेडवर बायका-माणसांची झुंबड उडालेली असते. आजूबाजूच्या गावांमधल्या बायकांना, तरण्या पोरांना बेदाणा वाळवणीचा, निवडीचा, साफसफाईचा रोजगार मिळालाय. अलीकडं मात्र शेडवर परप्रांतीय कामगारांचे जथ्थे जादाच दिसतात. कारण ते दिवसाचे चोवीस तास या कामासाठीच देतात. त्यांचं राहणं, जेवणं, झोपणं सगळं तिथंच. शिवाय मजुरीही कमी. खास बेदाण्यासाठी तयार केलेली द्राक्षं बागेतून इथं येतात. आणि पंधरवडय़ातच त्यांचा बेदाणा तयार होऊन तो शीतगृहात रवानाही होतो.
बेदाण्याची उत्पत्ती तशी मध्य-पूर्व देशांतली. महाराष्ट्राबाहेरचं त्याचं नाव ‘किसमिस’. आज सुक्या मेव्यातला तो अविभाज्य घटक बनलाय. तो तयार होतो द्राक्षापासून.
सांगली जिल्ह्यात द्राक्ष लागवडीची सुरुवात झाली तासगावजवळच्या बोरगावात. वसंतराव आव्रे आणि त्यांच्या बंधूंनी नाशिकवरून कलमं आणली. तो काळ होता 1962-63 चा. त्यांची बाग बघून द्राक्ष लागवड सुरू झाली. पहिल्यांदा फक्त खाण्यासाठी उत्पादन सुरू झालं. अनाबेशाही, चिमासाहेबी, सिलेक्शन सेव्हन, काळी साहेबी या काळ्या किंवा पांढ:या बियांच्या द्राक्षांची लागवड व्हायची. मग प्रयोगशील आणि जिगरबाज शेतक:यांनी ‘थॉमसन सीडलेस’ ही बिनबियांची जात आणली. त्यात प्रयोग करून ‘तासगाव चमन’ ब्रँड तयार झाला. पुढं ‘तास-ए-गणोश’ ही जात विकसित झाली. तासगावमधलं ‘तास’, आव्रेमधलं ‘ए’ आणि इथल्या गणोश मंदिरातलं ‘गणोश’ घेऊन या ब्रँडचं नामकरण झालं. हा ब्रँड भारतात चर्चेला आला. गेल्या काही वर्षात लांब आकाराच्या मण्यांची ‘सोनाक्का’ जात नावारूपाला आलीय. त्यात संशोधन होऊन ‘सुपर सोनाक्का’ तयार झाली. तिचा आता सगळीकडं बोलबाला झालाय.
197क् च्या दरम्यान वसंतराव आव्रे, सदाभाऊ पाटील, गणपतराव म्हेत्रे, भगवान पवार, नामदेवराव माने (सावर्डे), बाबूराव कबाडे आणि सोलापूरच्या काही शेतक:यांनी एकत्र येऊन ‘वैज्ञानिक द्राक्षकुल’ निर्माण केलं. त्यामार्फत शेतक:यांना मार्गदर्शन सुरू झालं. 1972 च्या दुष्काळावेळी द्राक्षाचे दर पडले. कारण उत्पादन वाढलं, मात्र मागणी कमी झाली. तेव्हा बेदाणा निर्मितीचा फंडा पुढं आला. त्यामुळे बाजारपेठेवरचा अतिरिक्त द्राक्ष उत्पादनाचा भार कमी झाला. मग बाजारात भारतीय बेदाणा दिसू लागला. तोर्पयत परदेशातला विशेषत: अफगाणिस्तानचा बेदाणा आपल्याकडं यायचा.
197क् च्या दरम्यान अमेरिकेत गंधकाची प्रक्रिया करून बेदाणा तयार होत असे. नंतर द्राक्षाची जात, बेदाणा वाळवणं, तपमानाचा परिणाम, डीपिंग ऑइल, सोडिअम काबरेनेट वापराचं प्रमाण, फवारणी यावर संशोधन आणि प्रयोग झाले. आज ज्या पद्धतीनं बेदाणा तयार होतो, ती पद्धत 1983 मध्ये विकसित झाली.
बेदाण्यासाठी ‘थॉमसन सीडलेस’ ही द्राक्षाची जात सवरेत्तम मानली जाते. द्राक्षं काढल्यानंतर घड रसायनात बुडवतात. नंतर स्वच्छ पाण्यानं धुवून निथळल्यानंतर काबरेनेट आणि ऑइलमध्ये तीन मिनिटं बुडवतात. त्याला डीपिंग म्हणतात. त्यानंतर ती रॅकवरील जाळीवर पसरवली जातात. दुस:या आणि पाचव्या दिवशी रसायन फवारणी होते. बारा-तेरा दिवसात ती सुकतात.
वाळलेल्या द्राक्षांना गरजेनुसार आठ ते दहा तास गंधकाची धुरी दिली जाते. दुस:या दिवशी मळणी यंत्रनं स्वच्छता होते. काडय़ा काढल्या जातात. मण्यांच्या रंग, आकारानुसार प्रतवारी होते. मग पेटय़ा भरतात. एक पेटी 15 किलोची असते. चार किलो द्राक्षांपासून एक किलो बेदाणा तयार होतो. हा बेदाणा औषध फवारणीनंतर नैसर्गिक पद्धतीनं वाळवला जातो. मात्र त्यावरची पुढची प्रक्रिया यंत्रंमार्फत होते. बेदाण्याची स्वच्छता, प्रतवारी, नेटिंग, वॉशिंग, पॅकिंग यासाठी आता जागतिक दर्जाची अत्याधुनिक यंत्रं आलीत.
बेदाणा तयार झाल्यावर पेटय़ा भरून शीतगृहात ठेवतात. त्या बेदाण्याच्या नमुन्याची पेटी बाजार समितीत सौद्याला-लिलावाला नेली जाते. तिथं व्यापारी-अडत्यांसमोर पेटी उघडली जाते. खस्सकन् हात खुपसून बेदाणा बाहेर काढला जातो आणि ओंजळीनं जागेवरच उधळला जातो. अस्सल व्यापारी नुसत्या नजरेनं बेदाण्याचा दर्जा पारखतात आणि बोली लावतात. या बेदाण्यावर दोन टक्के अडत घेतली जाते. बहुतांशवेळा अडते उचलीसारखी रक्कम शेतक:यांना देऊन बेदाणा ‘बुक’ करून ठेवतात. अर्थात हा सारा व्यवहार असतो सचोटी आणि विश्वासाचा! फेब्रुवारी ते मेर्पयत बेदाण्याचा हंगाम चालतो.
हिरवा जर्द, सोनेरी पिवळा किंवा बिस्किट रंगाच्या बेदाण्यास भारतीय बाजारपेठेत जादा दर मिळतो. 1985 नंतर द्राक्ष लागवडीत रूट स्टॉक पद्धत आली. त्यामुळं द्राक्ष उत्पादन वाढलं. मग आपसूकच बेदाण्याचं प्रमाणही वाढलं. त्यातून प्रश्न निर्माण झाला बाजारपेठेचा. त्यामुळे दिवंगत माजी मंत्री आर. आर. पाटील यांनी 13 मार्च 1994 रोजी तासगावात बेदाणा बाजारपेठ सुरू करण्याचं जाहीर केलं. ऑगस्ट 1994 मध्ये तासगावातच बाजारपेठ सुरू झाली. ही देशातली केवळ बेदाण्याची पहिली आणि आशिया खंडातली सर्वात मोठी बाजारपेठ. तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीनं खुल्या पद्धतीनं लिलाव सुरू केला.
आता तासगावसोबत सांगली, पंढरपूर, सोलापूर, पिंपळगाव (नाशिक) इथंही सौदे निघतात. पण खुले व्यवहार, रोख पैसे, शीतगृहांची सुविधा, साठवणुकीच्या प्रोत्साहनपर योजना, बँकांची तारणकजर्, कमी भाडं यामुळं नाशिकपासून विजापूर्पयतचे बेदाणा उत्पादक तासगावलाच पसंती देतात. तासगावात आता तीस एकरात नवं वातानुकूलित बेदाणा मार्केट उभं राहतंय. भारतात 1988 च्या दरम्यान चार हजार टन बेदाणा तयार होत होता. 1994 मध्ये महाराष्ट्रातलं बेदाणा उत्पादन होतं, सात हजार टन (सातशे गाडी). यंदा राज्यात फेब्रुवारीअखेर एक लाख 85 हजार टनांवर उत्पादन गेलंय. त्यात तासगावच्या बाजारातली विक्री आहे 71 हजार टनांची म्हणजे जवळपास निम्मी! राज्यातील 15क्क् कोटी रुपयांच्या उलाढालीतली 60 कोटींची उलाढाल एकटय़ा तासगावच्या बेदाणा बाजारपेठेत होतेय.
मागच्या वर्षी बेदाण्याचे भाव चढे होते. तासगावात हिरव्या बेदाण्याला 451, तर पिवळ्या बेदाण्याला 255 रुपये किलोचा उच्चंकी भाव मिळाला होता. यंदा मात्र भाव पडलेत. हिरवा बेदाणा 275 रुपयांवर स्थिर झालाय, तर पिवळा बेदाणा पावणोदोनशेवर सरकेना झालाय.
काळा, हिरवा
आणि पिवळा मनुका!
चवदारपणा आणि रुचकरपणा ही मनुक्याची प्रमुख वैशिष्टय़ं! अतिशय उच्च औषधी गुणधर्म असल्यानं काळ्या मनुकांना आयुव्रेदात महत्त्व आहे. पण भारतीय बाजारात याचा वाटा केवळ पाच टक्के आहे. याचं कारण म्हणजे त्याचा उत्पादन खर्च आणि वेळ परवडत नाही. हिरवा बेदाणा पूर्णत: नैसर्गिक पद्धतीनं वाळवला जातो.
भारतीय बाजारपेठेतील 7क् ते 8क् टक्के बेदाणा हिरवा असतो. सुक्यामेव्यासाठी प्रामुख्यानं हाच वापरतात.
पिवळ्याजर्द सोनेरी रंगाच्या दाण्याला ‘पिवळा बेदाणा’ म्हटलं जातं. गंधकाची धुरी देऊन हा तयार केला जातो. दुग्धजन्य पदार्थ, मिठाई, फरसाण यामध्ये याचा वापर होतो.
‘सांगली बेदाणा’
सांगलीच्या बेदाण्याला ‘सांगली बेदाणा’ असं जी. आय. मानांकन मिळालंय. केंद्राच्या वाणिज्य मंत्रलयाकडून देशातल्या वैशिष्टय़पूर्ण उत्पादनांना हे मानांकन मिळतं. राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष सुभाष आव्रे यांनी त्यासाठी मेहनत घेतलीय.
आता सांगलीच्या द्राक्ष बागायतदार संघाकडं नोंदणी केलेल्या उत्पादकांना त्यांचा बेदाणा निकषांवर तपासून प्रमाणपत्र मिळेल.
एकरी चार लाख रुपये!
द्राक्षतज्ज्ञ आणि निवृत्त कृषी पर्यवेक्षक
एम. एल. पाटील सांगतात, बहुतांश वेळा चांगल्या दर्जाची द्राक्षं खाण्यासाठी बाजारात पाठवली जातात, तर उर्वरित बेदाण्यासाठी वापरली जातात. मात्र द्राक्षं केवळ बेदाण्यासाठीच करायची, या हेतूनं बाग लावली आणि वाढवली तर एकरी तीन ते चार लाख रुपये मिळू शकतात. सध्याच्या दरानं खर्च वजा जाता दीड-दोन लाख रुपये सहज मिळू शकतात.
देशात महाराष्ट्र, महाराष्ट्रात सांगली नंबर वन!
द्राक्ष उत्पादनात देशात महाराष्ट्राचा पहिला नंबर. सध्या यातली 74.5 टक्के द्राक्षे खाण्यासाठी, तर 23.5 टक्के बेदाण्यासाठी, दीड टक्का मद्यनिर्मितीसाठी आणि अर्धा टक्का रसासाठी वापरली जातात.
महाराष्ट्रात बेदाणा निर्मितीत सांगलीचा पहिला, तर पाठोपाठ सोलापूरचा नंबर लागतो. सांगली जिल्ह्यात तासगाव, मिरज पूर्व भाग, कवठेमहांकाळ, खानापूर पूर्व भागातली जमीन द्राक्षासाठी पोषक. तासगाव हे द्राक्षाचं आगर. बेदाणा मात्र प्रामुख्यानं कवठेमहांकाळमध्ये तयार केला जातो.
(लेखक लोकमतच्या सांगली आवृत्तीचे प्रमुख आहेत.)
shrinivas.nage@lokmat.com