शहरं
Join us  
Trending Stories
1
"जनतेचा ५ महिन्यात कौल बदलला त्याला काय करणार"; बाबा आढावांच्या भेटीनंतर अजितदादांचा सवाल
2
“EVM सेट केले जाते हे दाखवले होते, विश्वास ठेवला नाही, पण आता...”; शरद पवारांचा मोठा दावा
3
ट्रकमध्ये पैसे, ३६ नोटा मोजण्याच्या मशीन्स; भारतातील सर्वात मोठ्या IT छाप्यात काय सापडलं?
4
काही नाराजी असेल तर उघडपणे व्यक्त करू; संजय शिरसाट यांचे वक्तव्य चर्चेत!
5
ना बिग बी, ना सलमान-विराट, हा अभिनेता भरतो सर्वात जास्त टॅक्स, टॉप ५मधून अक्षय कुमार बाहेर
6
निकालाबाबत शंका, इव्हीएमवर संशय, राज्यातील या पराभूत उमेदवारांनी EVM पडताळणीसाठी केला अर्ज 
7
महायुतीत बंडखोरी करणाऱ्या समीर भुजबळांची राजकीय दिशा काय?; छगन भुजबळ म्हणाले..
8
“लाडकी बहीण योजना नाही, ‘ती’ ७६ लाख मते महायुतीच्या विजयाची शिल्पकार”; संजय राऊतांचा दावा
9
"अपमान सहन केला जाणार नाही"; किरीट सोमय्यांची भाई जगतापांविरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार
10
फ्युचर अँड ऑप्शन्स ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, NSE नं केला मोठा बदल
11
IND vs PAK मॅचमधील भारतीय कॅप्टन अन् युधजीत यांनी घेतलेला मस्त रिले कॅच एकदा बघाच (VIDEO)
12
२०० रुपयांसाठी देशासोबत विश्वासघात! पाकिस्तानी गुप्तहेराला माहिती पुरवणाऱ्या मजुराला गुजरातमधून अटक
13
ICC Champions Trophy 2025 : जर हट्ट सोडला नाही तर PCB ला बसेल मोठा फटका; BCCI च्या मनासारखं होणार?
14
₹१८० वर जाणार TATA चा 'हा' शेअर, आताही २२% स्वस्त; LIC कडे आहेत ९५ कोटी शेअर्स 
15
Video - कष्टाचं फळ! मजूर झाला डॉक्टर; दिवसा रोजंदारीवर काम अन् रात्री खूप अभ्यास
16
शुक्र-चंद्र योग: १० राशींना झटपट लाभ, विशेष कृपा; सुख-समृद्धी वृद्धी, पद-पैसा-प्रतिष्ठा लाभ!
17
विधानसभेच्या मतदानाआधीच काँग्रेसला लागली होती पराभवाची कुणकूण? तो अंतर्गत सर्व्हे चर्चेत
18
तरुणाला वारंवार भेटायची विवाहित महिला, मुलाच्या आईने खडसावताच संतापली आणि...
19
वर्षभरात दिलाय ३३ टक्क्यांपर्यंत रिटर्न, कोणत्या Mutual Fund नं दिले बेस्ट रिटर्न्स, कोणती आहेत सेक्टर्स?
20
स्वप्नील जोशीने दिली 'मुंबई पुणे मुंबई ४' ची हिंट? मुक्ता बर्वेला टॅग करत म्हणाला...

निरोप!

By admin | Published: April 09, 2016 2:38 PM

काही महिन्यांपूर्वी माङया रिकाम्या शाळेच्या इमारतीला मी सांगून आलो की आपला संबंध आता संपला! एकदा जुन्या उग्र अत्तराची बाटली शांतपणो बेसिनमध्ये रिकामी केली. एकदा जवळच्या मैत्रिणीचा मेसेज वाचला. तो निरोप मी शांत श्वास घेऊन पचवला. अनेकदा आपल्याला लक्षातच येत नाही की ही शेवटची भेट आहे. समजूत आल्यानंतर मी निरोप नीट घ्यायला शिकलो.

- सचिन कुंडलकर
 
 
वयाने मोठे होताना आपल्यामधील अनेक सवयी, जुन्या भावनांची वळणो आणि आपले वागणो असे सगळेच बदलत राहते. काही बाबतीत आपण संपूर्ण होत्याचे नव्हते असल्यासारखे वागतो, तर काही भावना आपल्या मनाला लहानपणापासून चिकटून बसलेल्या अजिबात सुटता सुटत नाहीत. 
मी लहानपणी अतिशय एकलकोंडा आणि हळवा मुलगा होतो. ज्याला घरकोंबडा म्हणता येईल असा. सतत बसून पुस्तके वाचणारा आणि घरी आल्यागेल्या सगळ्यांशी तासन्तास गप्पा मारत बसणारा. कधीही खेळायला बाहेर न जाणारा. घरी आलेले कुणी जायला निघाले की मला वाईट वाटून रडायला येत असे. कितीही कमी वेळामध्ये माझा माणसावर खूप जीव बसत असे. नंतरच्या आयुष्यात अतिशय घातक ठरू शकेल अशी ही सवय. समोर आलेल्या माणसावर माझा अतोनात विश्वास बसत असे आणि त्या व्यक्तीविषयी एक कायमची आपुलकी मनामध्ये काही क्षणात उमटत असे. एखाद्या सोप्या पाळीव कुत्र्याचे मन असावे तसे शेपूटहलवे मन माङया लहानपणीच मला लाभले. जागा आणि माणसे सोडून जाताना माङया मनावर त्यांचे दाट आणि गाढ रंग उमटत असत. अशावेळी मी रडायचो. आणि मग घरचे मला समजवायचे की अरे चिंचवडची मावशी थोडीच कायमची सोडून चालली आहे? ती लगेचच परत येणार आहे. किंवा असे सांगायचे की मी फक्त ऑफिसला जातो आहे, हा गेलो आणि हा आलो. आणि मग ती माणसं निघून जायची आणि बराच काळ पुन्हा समोर यायची नाहीत. 
काही वेळा ती परत कधीही भेटायची नाहीत. माणसांप्रमाणो जागासुद्धा लुप्त व्हायच्या. काहीतरी मेलोड्रामॅटिक विश्वास होता माङया मनात, की आता परत काही या जागी आपण येणार नाही. ही वेळ शेवटची. आमच्या शहरात विद्यापीठाच्या बाहेर एक सुंदर भव्य कारंजे होते पूर्वी. आम्हाला लहानपणी तिथे फिरायला नेत असत. त्या कारंजाच्या तुषारांचा गारवा मला त्या बुजवलेल्या जागी धुरकट ट्रॅफिकजाममध्ये आजही उभा असताना जाणवतो. ते कारंजे अचानक बुजवून नाहीसे झाल्यावर मी खूप उदास झालो होतो. ते कारंजे म्हणजे माङया शहराच्या दाराशी उभा असणारा हसरा दरबान होता. तो गेला. त्याने मला जाताना काही सांगितले नाही. 
एखादी व्यक्ती आपल्याला या आयुष्यात आता पुन्हा कधीही भेटणार नाही हा आपला मृत्यूच असतो. त्या व्यक्तीच्या नातेसंबंधात आपण जे काही तयार झालो असतो त्या आपल्या व्यक्तिमत्त्वाचा मृत्यू. अनेक वर्षांपूर्वी जेराल्ड हा माझा मित्र पॅरिसच्या एअरपोर्टवर मला आग्रहाने सोडायला आला. त्याच्या स्कूटरवर डबलसीट बसून फिरत मी दीडदोन महिने पॅरिस पाहिले होते. माझा तो चांगला मित्र झाला होता. त्या दिवशी सकाळी लवकर उठून गावाबाहेर लांब असणा:या एअरपोर्टवर तो का येतोय हे मला लक्षात येत नव्हते. कारण तसे वागायची उठसूट पद्धत युरोपात नाही. इमिग्रेशन करून आत जाताना मी वळलो आणि त्याला पाहून हसलो आणि टाटा केला. भेटूच लवकर. त्याने मला पुन्हा जवळ बोलावले आणि मला म्हणाला नीट राहा, काळजी घे आणि एकटा पडण्यापासून स्वत:ला जप. तो काय बोलतो आहे हे माङया मनात नीट उमटले नाही, कारण मी चार महिन्यांनी भारतात घरी परत जाण्याच्या आनंदात होतो. फोन करू, की ईमेल पाठवू, की आणि मी येईनच ना परत पुढच्या वर्षी. मला असे सगळे वाटत होते. मी त्याला हसून होकार दिला आणि वळलो. ती आमची शेवटची भेट असणार होती. तो जाणीवपूर्वक माझा नीट, शांत निरोप घेत होता हे मला लक्षात आले नाही. मी परत आलो आणि काहीच दिवसांत जेराल्ड पॅरिसमधून  काहीतरी गूढ घडल्याप्रमाणो गायब झाला. फोन बंद, घर सोडले आणि स्वत:चे नामोनिशाण पुसून टाकले. विरघळून गेला आणि संपला. अजूनही त्याच्या मृत्यूची कोणतीही बातमी आलेली नाही. त्याच्या दु:खांनी त्याला गायब केले आहे. मी त्या दिवशी त्याच्या निरोपाची खूण ओळखली नाही. 
मी त्यानंतरच्या काळात माङया माणसांना स्टेशनवर आणि एअरपोर्टवर घ्यायला आणि सोडायला जायची सवय स्वत:ला लावून घेतली. फोन, ईमेल ह्या गोष्टींवरचा माझा सर्व विश्वास उडून गेला आणि समोर दिसणारा माणूस दिसेनासा होताना त्याला नीट भरीवपणो पाहून घ्यायला मी शिकलो. शिवाय एक दुसरी गोष्ट मी फार सावकाशपणो शिकलो. जी करायला कुणी शिकवत नाही, ती म्हणजे आपण शेवटचा निरोप घेत आहोत ही भावना न संकोचता शांतपणो समोरच्या व्यक्तीपर्यंत पोचवणो. एका ओळीमध्ये लिहायला आता सोपे जात असले, तरी ते वळण घ्यायला मला अनेक संकोचलेल्या क्षणांचा अनुभव घ्यावा लागला.
लिफ्टचा दरवाजा बंद होताना, स्टेशनवरून ट्रेन हलताना, जिना उतरून गाडीत बसायच्या आधी वर खिडकीकडे पाहताना आपल्याला लक्षात आलेले असते की ही शेवटची भेट आहे. काही वेळा एका व्यक्तीला किंवा काही वेळा दोघांनाही कळलेले असते. आपण खोटे हसून आणि काहीच कसे घडले नाहीये असे एकमेकांना सांगत ती वेळ मारून नेत असतो. नाते संपत आलेले माहीत असते, पण चांगला निरोप घेण्यासाठी जी शांत शब्दसंपदा लागते ती आपण माणूस म्हणून कमावलेली नसते. ती कमवायला हवी. ही समजूत सावकाश येत गेली तसं मी माणसांचा नाही तर जागांचा आणि शहरांचा निरोपही नीट घ्यायला शिकलो. आवडत्या जागा आणि शहरे ह्या आवडत्या व्यक्तीच असतात. कधीही मृत्यू न होणा:या व्यक्ती. आपण त्यांना सोडून जातो. त्या तिथेच असतात. माङयात अजूनही एक भाबडा मुसाफिर आहे, ज्याला जग अगदी तळहातावर सामावेल एवढे सोपे आणि छोटे वाटते. आणि कुठूनही निघताना असे त्या शहराला सांगावे वाटते की हा मी आलोच जाऊन परत. पण कसचे काय? कामांच्या रगाडय़ात आणि जगण्याच्या उग्र प्रवाहात आपण तिथे परत कधीही जाणार नसतो. त्या जागेचा तसा एकमेवाद्वितीय अनुभव आपल्याला परत कधीही येणार नसतो. 
गीङोला मन्सूर नावाच्या एका अतिउत्साही आणि प्रेमळ बाईच्या घरी पाहुणा म्हणून जर्मनीतल्या ब्रेमेन शहरात मी काही दिवस राहिलो. तिने माङो अतिशय लाड केले. गाडीत घालून शहर फिरवून आणले. आमच्या पुण्यात ब्रेमेन चौक आहे तसा तिथे पुणो चौक आहे तिथे नेऊन आणले आणि अशा सर्व प्रसंगांना येतो तसं निघायचा दिवस भरकन येऊन उभा ठाकला. गीङोला मला स्टेशनवर सोडायला आली आणि मी तिला म्हणालो की गाडी सुटेपर्यंत आपण गप्पा मारू. ती म्हणाली, थांब तुझा ब्रेकफास्ट झाला नाहीये, मी तुला फळे विकत आणून देते, ती गाडीत खा. ती तिथल्या फळांच्या स्टॉलकडे पळाली आणि काही मिनिटात गाडी सुटली. 
माङो लहानपण संपावे आणि त्या आठवणींच्या जाळ्यातून मुक्त व्हावे म्हणून मी काही महिन्यांपूर्वी माङया रिकाम्या शाळेच्या इमारतीला जाऊन हे सांगून आलो की आपला संबंध आता संपला. मी आपल्या जुन्या आठवणींच्या नात्यामधून आता मोकळा होत आहे. 
मला पूर्वी भाबडेपणाने आवडणारे आणि मोठा झाल्यावर अजिबात न पटणारे भैरप्पा या कन्नड लेखकाचे एक पुस्तक मी एकदा विमानात जाणीवपूर्वक विसरून आलो. जुन्या उग्र अत्तराची एक बाटली शांतपणो बेसिनमध्ये रिकामी केली. एका जुन्या नात्याचे कपाटातले कपडे गुलझारांचे ऐकून बांधून परत पाठवून दिले आणि सोबत टवटवीत फुले. एकदा पहाटे उठलो तर माङया मुंबईतल्या सगळ्यात जवळच्या मैत्रिणीचा मेसेज फोनवर वाचला. आपण यापुढे परत काही काळ भेटायला नको. तो निरोप मी शांत श्वास घेऊन पचवला. तिचे आभार मानले. या सुसंस्कृत कृत्याबद्दल. 
आपण गर्दीतून वाट शोधत बाहेर आल्यावर आपल्याला कुणी न्यायला आलेले असणो ह्यासारखे दुसरे सुख नाही आणि आपल्याला कुणी शांतपणो वाहनापाशी सोडायला आलेले असणो ह्यासारखे मनावर  गूढ वलय दुसरे नाही. मी नेहमीच सोडायला आलेल्या माणसाशी हल्ली शांत, प्रेमाने वागतो आणि गाडी निघताना नक्की मागे वळून पाहतो. 
 
(ख्यातनाम लेखक, दिग्दर्शक)
kundalkar@gmail.com