- शर्मिला फडके
अतिरिक्त खरेदी न करण्याच्या, अनावश्यक वस्तू न साठवण्याच्या आव्हानात रोजच्या जीवनातल्या अनेक गोष्टींचा त्याग असतो. ज्या एरवी निरुपद्रवी वाटलेल्या असतात, पण ज्यांचा अतिरेक कर्जाच्या खाईत लोटणारा ठरलेला असतो. उदाहरणार्थ बाहेर जेवणावर पैसे न उधळणो, सिनेमा, बार्स, डिस्कोजवर खर्च न करणो, विकेण्ड्सना भटकंती करण्यात पेट्रोल न जाळणो इत्यादि. आणि अनेक गोष्टींचा स्वीकार असतो. करमणुकीसाठी सर्वाकरता खुले असणारे कार्यक्र म पाहणो, सार्वजनिक वाहनाने प्रवास करणो, नवी पुस्तके विकत न घेता सार्वजनिक वाचनालयांमधून आणणो किंवा घरातली पुस्तके एकमेकांना वाचायला देणो. अशा अनेक गोष्टी. काहीजण ट्रेन किंवा बसचं तिकीट न काढता सायकल किंवा पायी चालणं स्वीकारतात. मित्रंनी किंवा जवळच्या कुटुंबीयांनीही त्यांचा खर्च उचलायचा नाही हे महत्त्वाचं. एका साध्या, मिनिमलिस्ट जीवनशैलीकडे घेऊन जाणारी, सुरुवातीला खडतर वाटणारी ही वाट. प्रत्येकाची वेगळी.
मिनिमलिझम किंवा मिनिमलिस्ट जीवनशैलीचा स्वीकार म्हणजे कमीतकमी, अत्यावश्यक गरजेच्या, स्वत:ला महत्त्वाच्या वाटणा:या वस्तूंसोबत जगणो. साधेपणाने जगण्याचे सूत्र सांगणा:या ङोन तत्त्वज्ञानाबद्दल आस्था असणा:यांना मिनिमलिझमबद्दल वेगळे सांगायची आवश्यकता नाही. मिनिमलिस्ट जीवनशैलीचा प्रसार गेल्या दहा-बारा वर्षात इंटरनेट नियमाने वापरणा:या, उच्च मध्यमवर्गीय, यशस्वी करिअर जोपासणा:या, अतिरेकी खरेदी आणि उपभोगवादी जीवनशैलीच्या चक्र ात अडकलेल्या 3क् ते 45 वयोगटातल्या अमेरिकन तरु ण-तरु णींमध्ये मोठय़ा प्रमाणावर झाला त्यामागचे ट्रिगर होते जोशुआ बेकरचा ‘द मिनिमलिस्ट’ ब्लॉग.
‘द मिनिमलिस्ट’ हा ब्लॉग लिहिणा:या व्हरमॉण्टच्या जोशुआ बेकरची गोष्ट सुरू झाली ती त्याने घरातला, गॅरेजमधला ओसंडून वाहणारा कचरा, वस्तूंची अडगळ साफकरायला काढण्याच्या दिवशी. ड्राइव्ह वे वरचा प्रचंड मोठा ढिगारा पाहून जोशुआचा म्हातारा शेजारी त्याला सहज म्हणाला, ‘‘खरंच तुला या इतक्या गोष्टींची गरज होती का?’’ या प्रश्नाचे उत्तर शोधताना जोशुआचे पुढचे आयुष्य बदलून गेलं. आपल्या आयुष्यात या गोष्टींनी काहीही मौल्यवान भर घातलेली नाही, उलट अनेक मौल्यवान गोष्टी हिरावून घेतलेल्या आहेत असं त्याच्या लक्षात आलं. आणि मग जोशुआने नुसती अडगळच नाही, तर घरातल्या इतरही अनेक वस्तू डोनेट, रिसायकल करायला सुरु वात केली. कमीतकमी वस्तूंसोबत जगण्याची मिनिमलिस्ट जीवनशैली जोशुआने जगायला सुरु वात केली आणि मग त्यातून मिनिमलिस्ट ब्लॉगर्स चळवळ सुरू झाली.
‘मिनिमलिझम’ म्हणजे सर्वसंगपरित्याग नाही. आजच्या जगात वावरताना कोणत्याही व्यक्तीला असे नि:संगपणो जगता येणं प्रॅक्टिकली अशक्य आहे. रोजच्या जगण्याला अत्यावश्यक अनेक महत्त्वाच्या गोष्टी असतात. त्यांच्यासकट मिनिमलिस्ट जीवनशैली स्वीकारणो कितपत शक्य असते, असं अनेकांना वाटतं. म्हणूनच जोशुआ बेकर आजच्या काळातल्या मिनिमलिझमची व्याख्या सोप्या शब्दांमधे करतो. ‘शंभरहून कमी गोष्टींसोबत जगणं’. रोज ठरवून काही गोष्टी कमी केल्या, नवीन वस्तू आणण्यापेक्षा आहेत त्यांचाच नवा उपयोग शोधून काढला तर हे ध्येय बघता बघता साध्य होऊ शकतं. घर-संसार व्यवस्थित सांभाळून, वस्तूंचा उपभोग घेऊनही मिनिमलिस्ट जीवनशैली जोपासता येतेच. फक्त त्या वस्तूंना, चैनीला स्वत:च्या आयुष्यात किती महत्त्व द्यायचे, हे प्रत्येकाने स्वत: ठरवणं. आपले आरोग्य, नातेसंबंध, छंद, व्यक्तिमत्त्वाची जोपासना, एक व्यक्ती म्हणून आपली होणारी वाढ यापेक्षा या वस्तू मोठय़ा आहेत का, याचा निर्णय घेणं. माणूस हा भोवतालच्या पर्यावरणाचा, समाजाचा एक घटक आहे. आपलं आयुष्य जगताना त्यांचंही देणं आपण किती मानतो. फक्त स्वत:करता, स्वत:च्या कोशात गुरफटून घेत जगायचं की आजूबाजूच्या पर्यावरणाचा एक भाग होऊन जगायचं याचा निर्णय घेणं. आलिशान घर, कार हवीशी वाटते आहे? खुशाल जा आणि खरेदी करा. कुटुंबाकरता चैनीच्या वस्तू खरेदी करायच्या आहेत? जा आणि आणा. करिअरच्या मागे धावायचं आहे? तसं करा. या गोष्टी तुम्हाला प्राधान्यक्र माने गरजेच्या वाटत असतील तर नक्कीच करा. मात्र जाणीवपूर्वक, स्वत: विचार करून या गोष्टींचा तुमच्या आयुष्यातला प्राधान्यक्र म ठरवा. ग्राहक-संस्कृती, जाहिराती यांच्या मा:याखाली दबून जाऊन, स्वत:ची विचारशक्ती हरवून, आपल्या आयुष्यातल्या सर्वात आनंद देणा:या इतर गोष्टींना डावलून हे करू नका, इतकं साधं मिनिमलिस्ट जीवनशैलीचं सूत्र. जोशुआ बेकर आपल्या ‘द मिनिमलिस्ट’ ब्लॉगद्वारा हे सूत्र आपल्या किंवा आपल्या मित्रंच्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या अनुभवांद्वारे मांडत जातो. जोशुआच्या ब्लॉगला अनेकांनी आपल्या स्वत:च्या अनुभवांच्या कडय़ा जोडून मिनिमलिझमची शृंखला बनवली आहे. जगताना आपले अनुभव, अडचणी, आनंद, सगळं काही शद्बबद्ध करायचं ही एक महत्त्वाची, कदाचित एकमेव अशी अट आहे जोशुआने घातलेली. इतरांना आपल्या अनुभवातून प्रेरित करण्याकरता, शृंखला जोडली जाण्याकरता हे गरजेचं.
मिनिमलिस्ट जीवनशैली यशस्वीपणो जगणारे अनेकजण या ब्लॉग शृंखलेमधे वाचायला मिळतात. लिओ बबैता आपली पत्नी आणि सहा मुलांसहित आनंदाने मिनिमलिस्ट आयुष्य जगतो. सहा मुलांपैकी तीन त्याने दत्तक घेतलेली आहेत. जोशुआ बेकरचं उत्तम करिअर आहे. उपनगरात प्रेमळ कुटुंबासोबत तो राहतो. कारही वापरतो. कॉलिन राईटजवळ आता फक्त 51 वस्तू आहेत, त्यांच्यासोबत तिची जगभरात भटकंती चालते. त्या कमी करून 3क् वर आणायचं तिचं ध्येय आहे. कॉइलिन आपल्या या भटकंतीवर आधारित पुस्तकं, लेख लिहिते आणि पैसे कमावते. आणि मग पुन्हा नव्या भटकंतीवर निघते. टॅमी स्ट्रोबेल आपल्या नव:यासोबत एका अगदी चिमुकल्या घरात राहते. ती कार वापरत नाही. हे सगळे म्हटलं तर वेगवेगळ्या त:हेचं आयुष्य जगतात; पण जगताना मिनिमलिझमचं तत्त्व जोपासतात. गरजेच्या नाहीत त्या वस्तू घेत नाहीत, साठवत नाहीत आणि पर्यावरणाचं, नैसर्गिक स्रोतांचं जमेल तेवढं रक्षण करण्याचं ब्रीद जपतात. जोशुआ यालाच आयुष्यावरचा भार कमी करणो, जाडजूड टरफल काढून टाकून आतला मौल्यवान गाभा जपणो म्हणतो. हा गाभा म्हणजे जगण्यातला आनंद, समाधान आणि पर्याय निवडीचे स्वातंत्र्य.
मिनिमलिझममुळे जगणं कंटाळवाणं, एकसुरी होत नाही का, असा अनेकांच्या मनात येणारा प्रश्न. जोशुआच्या मते, मुळातच रोजच्या जगण्यातला अतिरिक्ततेचा, हव्यासाचा, उपभोगाचा, अडगळीचा रेटा ज्यांना नकोसा झाला आहे, ज्यांना तो दूर करून जगण्याच्या निखळ आनंदावर लक्ष केंद्रित करायचं आहे, जगण्यातून गडबड, कोलाहल काढून टाकायची आहे त्यांच्याकरताच ही जीवनशैली असल्याने या प्रश्नांचे वेगळे काही उत्तर संभवतच नाही. मिनिमलिझमचा अर्थ काहीजणांकरता स्वच्छता, टापटीप असू शकतो. काहीजणांकरता ताणविरहित आयुष्य. मिनिमलिझमच्या अंतिम स्थानार्पयत पोहचण्याकरता प्रत्येकाचा मार्गही वेगळा. मात्र असे जगणो केव्हाही जास्त शाश्वत आणि निरामय, आरोग्यपूर्ण असते याबाबत मात्र सर्वाचेच एकमत.
मिनिमलिस्ट जीवनशैली म्हणजे एखाद्या संन्यासी, फकिरासारखं नि:संग जगणो नाही. अर्थात ज्यांना तसं जगायचं आहे त्यांना त्यातही आनंदच मिळत असतो. पण मिनिमलिझमचा तो हेतू नाही. यात फक्त जगण्यातला महत्त्वाचा, मौल्यवान गाभा मिळावा म्हणून भोवतालची अडगळ दूर करणो अभिप्रेत आहे. घरामधे, आयुष्यामधे आनंद सामावायला जास्तीत जास्त जागा उपलब्ध करून देणो हा मुख्य हेतू. ही अडगळ नेमकी कोणती हे प्रत्येकाने ठरवायचे.
मिनिमलिझम हे कोणतंही आधुनिक फॅड नाही, त्याकरता कोणत्याही गोष्टींचा ‘त्याग’ करणो, कोणत्याही बंधनांमध्ये अडकवून घेणं अपेक्षित नाही. ही फक्त एक पर्यायी जीवनशैली आहे. करिअरच्या मागे धावत राहूनही ती जोपासता येते आणि मनात आलं तर पाठीवर संसार लादून जगभरात कुठेही, कधीही भटकंती करत जाता येऊ शकेल इतका सोपेपणा जगण्यात अपेक्षित असणा:यांनाही ती स्वीकारता येते. मिनिमलिस्ट जीवनशैली जगताना काही जणांना स्वत:चं घर, कार, टीव्हीसेट या गोष्टी आवश्यक वाटू शकतात, तर काही जणांना अनावश्यक. म्हणूनच काय टाकायचे किंवा काय स्वीकारायचे याचा कोणताही उल्लेख जोशुआ मिनिमलिझमच्या आपल्या व्याख्येत करत नाही. त्याच्या मते मुळात स्वत:हून या जीवनशैलीकडे वळलेल्यांना अशा गोष्टींचं महत्त्व आपोआपच एका टप्प्यावर वाटेनासं होतं. मात्र तो टप्पा प्रत्येकाने आपापला ठरवायला हवा. जगताना मुक्तपणा, मोकळेपणा जाणवायला हवा हे मिनिमलिस्ट जीवनशैलीचं मुख्य सूत्र. कसलीही भीती, असुरक्षितता, स्पर्धा, काळज्या, तणाव यांपासून मुक्ती, अपराधभाव, नैराश्य जोपासणा:या ग्राहकसंस्कृतीच्या चंगळवादी जाळ्यात अडकून राहण्यापासून मिळालेली मुक्ती.
(लेखिका ख्यातनाम कला समीक्षक आहेत)
sharmilaphadke@gmail.com