सूक्ष्म जिवाणू : बागुलबुवा आणि वास्तव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 08:31 AM2020-04-26T08:31:00+5:302020-04-26T08:35:01+5:30
बहुतांश धोकादायक आजार हे संसर्ग झालेल्या एका माणसाच्या श्वासोच्छ्वासाव्दारे निरोगी लोकांपर्यंत पोहोचतात. मनुष्य मुख्यत: स्वत:ला नीटपणे ओळखत नाही आणि ज्या निसर्गाने त्याला निर्माण केले तो निसर्गही त्याला नीटसा समजलेला नाही.
सूक्ष्म जिवाणूचा उपयोग मनुष्याला फार पूर्वीपासून कळत नकळत झाला आहे. दुधाचे दह्णात रूपांतर करणारा बॅक्टेरिया असो की कणकेपासून पाव बनवणारे किण्वक. १८८० सालच्या दरम्यान हे सिद्ध झाले की, प्राणघातक रोग विशिष्ट जिवाणूच्या संसगार्मुळे होतात. लक्षावधी लोकांचा जीव घेणाऱ्या रोगामागची कारणे बॅक्टेरियामध्ये आहेत. १८३० सालच्या सुमारास बंगालमध्ये सुरू झालेली पटकीची साथ साम्राज्यवादी जहाजावर स्वार होऊन युरोपात पोहोचली. तिने जगभरात हाहाकार माजवला. लक्षावधी लोक मृत्युमुखी पडले.
१८४८ ते १८५४ सालच्या दरम्यान लंडनला पटकीने वारंवार ग्रासले गेले. लाखो लोक आजारी पडले, त्यात हजारो मेले. १८८६ साली जर्मनीमध्ये पटकीच्या रोगाणूचा शोध लागला. बहुतांश धोकादायक आजार हे संसर्ग झालेल्या एका माणसाच्या श्वासोच्छ्वासाव्दारे निरोगी लोकांपर्यंत पोहोचतात. मनुष्य मुख्यत: स्वत:ला नीटपणे ओळखत नाही आणि ज्या निसर्गाने त्याला निर्माण केले तो निसर्गही त्याला नीटसा समजलेला नाही. १८८७ नंतर थेट २०१५ मध्ये एका अँटीबायोटिकचा शोध लागला. मधल्या २८ वर्र्षांत हजारो वैज्ञानिक अनेक प्रयोगशाळांत अब्जावदी डॉलर खर्च करून निरनिराळे प्रयोग करीत होते. असे असूनही या संपूर्ण कालावधीत कुठलेही नवे अँटीबायोटिक शोधले गेले नाही. जिवाणूचा प्रचंड प्रमाणात बागुलबुवा केला जात आहे. त्यांची नावे दहशतवादी टोळ्यांसारखी घेतली जातात. जाहिरातीमध्ये तर जिवाणू हे शत्रुपक्षाचे सैनिक विध्वंसक असल्याचे दाखविले आहे. त्यांचा नाश करणारी महागडी औषधे त्यामुळेच विकली जातात. खरे पाहता आपले संपूर्ण जगच जिवाणूने व्यापले आहे. आपण खालेले अन्न पचविण्यात पोटातील जिवाणूंची महत्त्वाची भूमिका असते. ते अन्नातील अनेक जटिल रसाचे विघटन करून अन्नाला सूपाच्य बनवण्याचे काम करतात. आतड्यामध्ये अन्नाचे विघटन करून त्याला शोषून घेण्यासाठी अनेक रसायनांची गरज पडते. आपले शरीर सगळीच रसायने स्वत:ला बनवू शकत नसल्याने ते स्वत:मध्ये या जिवाणूचे पोषण करते. आईच्या दुधावर वाढलेल्या मुलांमध्ये रोगप्रतिकारकशक्ती जास्त असते. बाळाच्या आहाराव्यतिरिक्त आईच्या दुधामध्ये इतर काही कार्य असू शकते. गर्भातील वातावरण रोगापासून सुरक्षित असते; पण बाहेरील जग तर तसे नाही, जन्मानंतर नवजात बालकाला रोगापासून दूर ठेवणे कठीण आहे. जनन मार्गातून बाहेर पडत असताना बाळाचा संपर्क या जिवाणूंशी होतो. गर्भाशयातून बाहेर येणाऱ्या मार्गावर हे जिवाणू जणू या नवीन जिवाचे स्वागतच करतात. बाळाच्या शरीरात प्रवेश करून ते लगोलग ते त्याच्या कामाला लागतात. आॅपरेशनने जन्मलेली मुले या लाभापासून वंचित होतात. कारण जनन मार्गाशी त्यांचा संपर्क आलेला नसतो. स्वच्छतेविषयीच्या आपल्या आधुनिक कल्पनेमध्ये सूक्ष्म जिवाणंूबद्दलचा आदर किंवा विचार नसल्याने आपण नवनवीन आजारांच्या तावडीत सापडत आहोत. अलर्जीमळे रोगांचे प्रमाण गरीब देशांच्या तुलनेत युरोप व अमेरिका यासारख्या श्रीमंत देशांत जास्त आहे. आपल्या देशात नवीन आर्थिक विकासाबरोबरच अलर्जीदेखील पसरत आहेत.
हॉस्पिटल ही अशी एक जागा आहे, येथे येणाºया प्रत्येक रुग्णासोबत अनेक प्रकारचे रोगाणूही प्रवेश करतात. अनेकांना आजार नसला तरी दवाखान्याच्या साफसफाईसाठी देखील अनेक प्रकारच्या जंतुनाशकांचा वापर होत असतो. त्यांच्या एकत्रित परिणामामुळे बहुतेक रोगाणू मारले जातात. कठीण परिस्थितीत जे रोगाणू तग धरून राहू शकतात. ते महाबली होतात. कोलायटीसच्या रोगाणूच्या रौद्ररूपाचे उत्पत्तीस्थान अमेरिकेतील हॉस्पिटल असे मानले जाते.
दुकानातून औषधे विकत घेण्यासाठी डॉक्टरच्या सहीच्या कागदाची देखील गरज आपल्या देशात नसते. डॉक्टरदेखील अँटीबायोटिक औषधे लिहून देण्यास अजिबात विलंब करीत नाहीत. रुग्णांना जास्तीत जास्त औषधे लिहून द्यावीत यासाठी डॉक्टरांवर औषध कंपन्यांचा दबाव असतो.
जगभरातील कुठल्याही चर्चांमध्ये जेव्हा रोगाणू औषधावर वरचढ होत असल्या विषयांच्या चर्चा होतात, तेव्हा भारतातील औषधाच्या गैरवापराचा उल्लेख आल्यावाचून राहत नाही. असे असूनही आपल्या चिकित्सा पद्धतीत अँटीबायोटिक औषधांच्या वापरावर भर दिला असल्याचे दिसते. यालाच आरोग्य मानले गेले आहे आणि आर्थिक विकासही. इस्पितळे व हॉटेल्स यासारखी स्वच्छता घरीसुद्धा दिसावी म्हणून आजकाल काही जण घरातील शौचालयात जंतुनाशकांचा भरमसाठ वापर करतात. काही जण रोगजंतुनाशक द्रव्याची बाटली खिशातच ठेवतात आणि वारंवार सॅनिटायझरने हात स्वच्छ करतात. अधिक सावधगिरी म्हणून अँटीबायोटिक साबणाने हात धुतात. या उत्पादकांच्या जाहिराती दिशाभूल करणाºया असतात. अँटीबायोटिक साबणाचे वास्तव्य ‘ट्रायक्लोरोसॅन’ नामक अँटीबायोटिक गोष्टीतून उलगडते.
‘ट्रायक्लोरोसॅन’ हा विशिष्ट रोगाणू नाशक आहे. १९७० च्या दशकामध्ये हॉस्पिटलमध्ये याचा वापर होऊ लागला. हळूहळू याचा वापर साबण टुथपेस्ट सेव्हिंग क्रीम यामध्ये होऊ लागला. दैनंदिन वापरातील आंघोळीचे साबण, भांडी धुण्याची पावडर, लहान मुलांच्या खेळण्यांमध्येही याचा वापर होऊ लागला. ‘ट्रायक्लोरोसॅन’मुळे आपल्या शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडले आहे. युरोपीय राष्ट्रांमध्ये या औषधांवर काही प्रमाणत निर्बंध आणले आहेत. भारतात मात्र एखाद्या किरकोळ दुकानातूनही ‘ट्रायक्लोरोसॅन’ साबण विकत घेऊ शकतो. उष्णकटिबंधातील गरीब देशातील लोक आपल्या रोगप्रतिकारकशक्तीमुळे अॅलर्जीला बळी पडत नाहीत, अशी एक धारणा आहे. त्यांचे शरीर एकाच वेळी अनेक संसर्गाशी झगडत असल्यामुळे त्यांची रोगप्रतिकारकशक्ती त्यात गुंतलेली असते. अतिस्वच्छता हे अनेक आजारांचे कारण आहे. इंग्रजीत त्याला ‘हायजेनिक हायपोथेसीस’ असे म्हणतात. उदाहरण- गंगानदी, गंगा ही एक पवित्र नदी असून आपल्या संस्कृतीत ती मातेसमान आहे.
१९८६ साली इंग्रज संशोधक अनेस्ट हॅनबरी हॅन्कीत यांनी याविषयी एक मत मांडले. गंगा, यमुना या नद्यांचे पाणी बराच काळ भांड्यात वेगवेगळे ठेवण्यात आले तरी ते खराब होत नाही. यमुनेच्या पाण्यात पटकीचे रोगाणू तीन तासांपेक्षा जास्त काळ तग धरू शकत नाहीत. हे ईस्ट इंडिया कंपनीच्या काही कर्मचाºयांना देखील माहीत होते. त्यामुळे इंग्लंडला जाणाºया समुद्री जहाजावर गंगेचेच पाणी नेले जाई. मग ते नदीच्या एखाद्या प्रदूषित भागातले का असेना, पिण्यासाठी फक्त गंगेचे पाणी वापरत असणाºया काही राजांचे व श्रीमंतांचे उल्लेख काही ठिकाणी आढळतात. यामध्ये हर्षवर्धन व मुहम्मदी तुघलकापासून अकबरांचे व औरंगजेबाचेही नाव येते. यमुनेच्या पाण्यात पटकीच्या रोगाणूसाठी नाश करणारी तत्त्वे असल्याचे अर्नेजर यांनी पॅरिस येथील पाश्चर संस्थेला पत्रातून कळविले. त्यांनी पटकीच्या रोगाणूसाठी यमुनेच्या पाण्याची तपासणी केली होती. त्या ठिकाणापासून थोड्या वरच्या अंगाला पटकीच्या आजाराने मेलेल्या लोकांची शरीरे नदीत टाकली गेली होती. अशा ठिकाणचे पाणी त्यांनी तपासणीसाठी घेतले होते. यमुनेचे पाणी उकळल्यानंतर त्या पाण्याचे वैशिष्ट्य नाहीसे होते, असेही त्यांच्या निदर्शनास आले होते. गंगा, यमुनेच्या पाण्यात जिवाणूंना खाणारे विषाणू आढळले. या विषाणूंना युनानी भाषेत जिवाणू खाणाऱ्या जिवांची संज्ञा दिली गेली.
रुरकी आणी लखनौ येथील संशोधनांत गंगेच्या पाण्यात ही ‘फेज’ असल्याचे पुरावे काही वर्षांपूर्वी मिळाले आहेत. आज आपली प्रगतीच आपली समस्या बनू लागली आहे. रोगाणू मानवी शरीरासोबत जसे वर्तन करतात, तसेच वर्तन मानव सृष्टीसोबत करीत आहे. आपली सात अब्जापेक्षा अधिक लोकसंख्या आपले पालनपोषण करीत असलेल्या व्यवस्थेच्याच विनाशात गुंतलेली आहे.
रोगाणूपासून संसर्ग आल्याने जसा ताप येतो, तसेच आपल्या विकासाच्या धुराच्या संसर्गाने वातावरणाचे तापमान वाढत आहे. पृथ्वीने तिची रोगप्रतिकारक जर आपल्या विरुद्ध वापरली तर आपले काय होणार? अति स्वच्छतेत वाढलेल्या मुलांपेक्षा धूळ, मातीत खेळणाऱ्या मुलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता कमी असते. मातीत कितीतरी जिवाणूंशी थेट संपर्क होत असल्यामुळे त्यांची सहनशक्ती बळकट होते. कारण ही मुले मातीच्या संपर्कात राहतात. भारतीय लोकांची रोगप्रतिकारकशक्ती चांगली आहे. जगभर थैमान घालत असलेला कोविड-१९ या विषाणूची जातकुळी एक असली तरी ढंग मात्र वेगळा आहे. जागतिक आघाडीचे विषाणू शास्त्रज्ञ व लंडन स्कूल आॅफ हायजीन अॅण्ड टॉपिकल मेडिसिनचे संचालक डॉ. पीटर पीआॅट हे ‘इबोला’ साथीच्या विषाणूचा शोध लावणाा्र्या वैज्ञानिकांमध्ये हे एक प्रमुख आहेत. त्यांच्या मते लक्षणे न दिसताही प्रसार होणे कोरोनाचा सर्वात मोठा धोका; परंतु साधी काळजी घेतली तर आजार टाळाल.
२०२० साल हे आता जागतिक असंतोषाचे वर्ष म्हणून संबोधले जाणार. कोरोना हे जगावर लागलेले तिसरे महायुद्ध आहे. भारतातील गोरगरीब वर्ग रोजगार नसल्याने आपल्या गावी जाण्याकरिता किंवा जेथे दोन घास पोटात जातील, अशा ठिकाणी आसरा घेण्याकरिता धडपडत आहेत; पण त्याचवेळी सुशिक्षित उच्च मध्यम वर्ग व श्रीमंत हा होम क्वारंटाईन होणाचा सल्ला धाब्यावर बसवून पार्ट्या, समारंभात मंत्रमुग्ध आहेत. लॉकडाऊन काळातील छंद, वाचन, आॅनलाईन चॅटिंग यात तुमचे मन रमण्यासाठी आजूबाजूचा माणूस मृत्यूचे तांडव पाहतो, तेव्हा त्याचा अहंगड संपुष्टात येतो. सत्ताधाऱ्यांना बसणाऱ्या, राजकीय हादऱ्याचे मूळ आर्थिक विवंचनेत आहे. महागाईमुळे जीव मेटाकुटीला आला आहे. अन्नधान्याच्या किमती भडकत आहेत. रोजगार मिळत नाही. राज्य भ्रष्टाचाराने बरबटलेले आहे.
अन्नधान्याची उपलब्धता असली तरी सामान्य जनतेला बाजारातील धान्य विकत घेणे झेपत नाही. अन्न लोकांपर्यंत व लोक अन्नापर्यंत पोहोचू शकत नाहीत. जागतिक पातळीवर अन्नधान्याची विक्रमी वाढ होत आहे. तरीही किमती उतरायला तयार नाहीत. व्यास ऋषींनी उद्वेगाने म्हटले आहे. दोन्ही हात आकाशाकडे फेकून ते विचारतात मी इतके सांगूनसुद्धा कोणीही ऐकत नाही. धर्म आचारून आर्थप्राप्ती करून इच्छा-आकांक्षांची अशी लोक का बरे पूर्ती करून घेत नाहीत? खरे पाहता कृष्णाने अर्जुनाला भरीस पाडून युद्ध करायला लावले. त्याने काय निष्पन्न झाले? नुसता नरसंहार. कौरव तर संपलेच; परंतु पांडवसुध्दा संपले. खुद्द कृष्णाच्या यादव कुळाचा नाश झाला. अनागोंदी, अत्याचार झाला. हजारो स्त्रिया विधवा झाल्या. लहान मुले अनाथ झाली. जनावरेसुद्धा निराधार झाली. कृष्णाने युद्ध करून काय साधले?
जग जिंकायला गेलेल्या सगळ्या साम्राज्यांचा शेवट पण असाच झाला. अलेक्झांडर, नेपोलियन, नादीरशहा, चेंगीज खान, हिटलर दुसरे महायुद्ध जिंकून ब्रिटनने काय मिळविले? तीस-चाळीस वर्षांत देश कंगाल झाला. अमेरिकेची अवस्थासुद्धा काही प्रमाणात अशीच आहे. राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा खर्च अधिक आहे. खर्च होत असलेल्या प्रत्येक डॉलरमधील किती सेंटस् कर्जरूपी असतात. जपान, जर्मनी, सौदी व इतर देशांची मुस्कटदाबी करूनच ना? अमेरिकेच्या भौतिक प्रगतीबद्दल लोक रात्रंदिवस अमेरिकेची प्रशंसा करतात. प्रचंड पैसा व वेळ खर्च करून क्वांटम फिजिक्सचे आजचे निष्कर्ष काढले आहेत. तेच निष्कर्ष भारताच्या प्राचीन ऋषीमुनींनी हजारो वर्षांपूर्वी ध्यानाच्या माध्यमातून काढले होते.