शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : "महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार देवेंद्र फडणवीस!"; आई सरिता फडणवीस यांचं मोठं विधान
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : जतमध्ये फडणवीसांच्या शिलेदाराने गड खेचून आणला; गोपीचंद पडळकरांचा मोठा विजय
3
Yevla Vidhan Sabha Election Result 2024 Live : छगन भुजबळांनी येवल्याचा गड राखला; २६०५८ मतांनी विजयी, शिंदे पराभूत 
4
"हा महायुतीच्या एकजुटीचा विजय, जनतेसमोर नतमस्तक", देेवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
5
Mahim Vidhan Sabha Election Result 2024 Live : "एक धनवान अन् एक राजपुत्र, त्यांच्या..."; विजयानंतर महेश सावंतांची पहिली प्रतिक्रिया
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : "आम्ही आधुनिक अभिमन्यू, चक्रव्यूह तोडून दाखवला"; एकहाती विजयानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया
7
अहिल्यानगर जिल्ह्यात महाविकास आघाडीतील दिग्गजांना पराभवाचा धक्का! थोरात, गडाख, तनपुरे, भांगरे पराभूत
8
Sangamner Vidhan Sabha Election Result 2024 Live : बाळासाहेब थोरातांना पराभवाचा धक्का; नवखे अमोल खताळ ठरले जायंट किलर
9
Anushakti Nagar Vidhan Sabha Result 2024: स्वरा भास्करचा पती फहाद अहमद विरुद्ध सना मलिक, निकाल काय?
10
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: संस्थान खालसा! विनोद तावडेंना घेरणारे हितेंद्र, क्षितिज ठाकूर पडले; वसई-विरारमध्ये ‘कमळ’ फुलले!
11
भाजपच्या प्रशांत बंब यांचा विजयाचा चौकार; गंगापूरमधून सलग चौथ्यांदा विजयी...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : शिराळा विधानसभा मतदारसंघात सत्यजित देशमुखांचा विजय; मानसिंगराव नाईकांना किती मत मिळाली?
13
अंधेरी पूर्वेत शिवसेनेच्या मुरजी पटेलांची बाजी, उबाठाच्या ऋतुजा लटकेंचा पराभव 
14
Vikhroli Vidhan Sabha Result 2024: संजय राऊतांचे भाऊ सुनील राऊतांचा निकाल काय?
15
Maharashtra Assembly Election Result 2024: अमित ठाकरेंचा दारूण पराभव, बाळा नांदगावकरही हरले; राज ठाकरेंवर उद्धव ठाकरे भारी पडले
16
प्रणिती शिंदेंना मोठा धक्का! त्यांच्याच मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार पडला; भाजपने बालेकिल्ला फोडला
17
Maharashtra Assembly Election Result 2024: कांदिवली पूर्वेतून भाजपच्या अतुल भातखळकरांची हॅटट्रिक, काँग्रेसच्या कालू बढेलियांचा पराभव
18
ठरलं! 'या' दिवशी राज्यात स्थापन होणार महायुतीचं सरकार; कोण होणार मुख्यमंत्री?
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम करणाऱ्या जयंत पाटलांचे काय झाले? इस्लामपूरमध्ये महायुती की मविआ जिंकले
20
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: 'अजित पवार पिछाडीवर', अशी खोटी बातमी का दाखवता? अजित पवारांचा सवाल

चित्र-प्रवासी : चित्रकारांचे प्रवास आणि कलंदर मुशाफिरीचा शोध

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2018 4:50 PM

गेली असंख्य शतके निरनिराळ्या खंडांमधून, देशांमधून, समुद्रमार्गे, पर्वतराजी ओलांडून, दुर्गम रस्त्यांवरून अगणित चित्रकारांनी वेड्यासारखे प्रवास केले. त्यातून त्यांना काय गवसले? त्यांच्या कलेत या प्रवासातले काय उतरले? काय हरपले? ...याचा वेडा शोध.

-    शर्मिला फडकेमाणसे प्रवास करतात, कायमच करत आलेली आहेत. प्रवास ही माणसाच्या रक्तातली आदिम प्रेरणा. एका जागेवरून दुसºया जागी जाण्याची त्याची गरज भलेही जगण्याच्या, अन्न मिळवण्याच्या, तगून राहण्याच्या, सुरक्षिततेच्या प्रेरणेतून, काहीशा नाइलाजातूनही जन्माला आली असेल; पण ती विकसित होत गेली आणि मग नवे प्रदेश पाहाता येणे, अधिक चांगले आयुष्य जगता येणे, साहसाची पूर्ती, सर्जनशीलतेच्या ऊर्मीला वाव मिळणे हे प्रवास करण्यातले इतर फायदे जास्त महत्त्वाचे ठरत गेले. चित्रकाराने, किंवा कोणत्याही कलाकाराने आपल्या कलेकरता केलेला प्रवास जन्माला आला तो याच विकसित प्रेरणेतून.प्रवास, त्यातही कलेकरता केलेला प्रवास हा कायमच कुतूहलजनक ठरतो. हा प्रवास नेमका का केला जातो, चित्रकाराला त्यातून काय गवसते, त्याच्या कलेत या प्रवासातले काय उतरते, काय हरपते याबद्दल जाणून घेण्याची ओढ चित्ररसिकाला असते. असंख्य शतके निरनिराळ्या खंडांमधून, देशांमधून, समुद्रमार्गे, पर्वतराजी ओलांडून, दुर्गम रस्त्यांवरून चित्रकारांनी केलेल्या प्रवासांच्या नोंदी कला-इतिहासाने जपून ठेवलेल्या आहेत.पॅरिसच्या झगमगाटी, शहरी वातावरणाचा उबग आलेला, कौटुंबिक झगड्यांनी वैतागलेला, सततच्या आर्थिक अडचणींमुळे ग्रासलेला चित्रकार पॉल गोगॅँ एक दिवस उठला आणि प्रवासाला निघाला. अनोळखी, दूरस्थ, नव्या निसर्गभूमीच्या शोधात केलेला प्रवास आपल्या आयुष्यात एक नवे पर्व सुरू करणारा ठरेल, आपल्यातल्या मरगळलेला कलेला नवे जीवदान मिळेल, ताजेतवाने रंग आपल्या कॅनव्हासवर उतरतील असा त्याचा विश्वास होता आणि तसेच झाले. ताहिती बेटांवरच्या खुल्या वातावरणात, लख्ख सूर्यप्रकाशात त्याच्या डोळ्यांवरची तथाकथित सुसंस्कृत आणि कृत्रिम नैतिकतेने झाकोळलेली युरोपियन सौंदर्यदृष्टीची झापडे गळून पडली. इथे गोगॅँच्या पेंटिंग स्टाइलला आगळे, स्वत:चे वळण मिळाले. ताहिती बेटांवरचा अनोखा, सुंदर सूर्यप्रकाश त्याच्या पेंटिंग्जमध्ये उतरला. सुवर्णरंगात न्हालेल्या ताहितियन स्त्री-पुरुषांचे रोजचे जीवन कॅनव्हासवर रंगवताना गोगॅँला स्वत:चे जीवनविषयक तत्त्वज्ञान गवसले. रंग ठळक झाले, त्यांना झळाळ मिळाला, धाडसी आकार आणि विषय त्याच्या चित्रांमध्ये आले.गोगँचाच समकालीन असलेला कलंदर, अस्वस्थ वृत्तीचा चित्रकार व्हिन्सेन्ट व्हॅन गॉघ १८८६ साली आपल्या भावाला, थिओला लिहिलेल्या पत्रात म्हणतो,‘‘माझी मूळची वृत्ती धाडसी मुशाफिराची नाही, पण माझ्या स्वत:च्या कुटुंबात आणि माझ्या आजूबाजूच्या प्रदेशात मला इतकं अनोळखी आणि उपरं वाटतं आहे की, प्रवासाला निघण्यावाचून माझ्यापुढे दुसरा मार्गच शिल्लक राहिला नाही.’’आपण मुशाफिरी वृत्तीचे नाही असे व्हिन्सेन्ट कितीही म्हणाला तरी मुळात तो डच रक्ताचा. डचांची दर्यावर्दी, फिरस्ती वृत्ती त्याच्या नसांमधून वाहत होतीच. त्यात भर पडली त्याच्या कलंदरी कलाकारी वृत्तीची. आपल्या लहानशा आयुष्यात व्हिन्सेन्ट व्हॅन गॉघ नेदरलॅण्ड, ग्रेट ब्रिटन, बेल्जियम, फ्रान्स या चार देशांमधल्या वीस शहरांमध्ये भटकला. फ्रान्सच्या दक्षिणेच्या आर्लेन या डोंगराळ, निसर्गरम्य गावात आपण दीर्घकाळ, कदाचित कायमचे वास्तव्य करू शकू या इराद्याने त्याने तेथे घर, स्टुडिओही उभारला, आपला मित्र गोगॅँला तिथे बोलावून घेतले. पण व्हिन्सेन्टचा हा मुक्काम त्याच्या आयुष्यात असंख्य वादळे घेऊन येणारा ठरला, त्याच्या कला-प्रवासाचीच नाही तर जीवनप्रवासाची दुर्दैवी आणि अकाली सांगता करणारा ठरला. मात्र आर्लेनच्या या मुक्कामात आणि तिथवर पोहचेपर्यंतच्या त्याच्या आधीच्या प्रवासातली चित्रे चित्रकलेच्या दुनियेकरता केवळ अविस्मरणीय ठरलेली आहेत.आद्य इम्प्रेशनिस्ट पेंटर क्लॉद मोनेचा प्रवासही एक दिवस गिव्हर्नीच्या मुक्कामी येऊन थांबला; पण तिथेही तो एका जागी स्थिरावला नाही. असंख्य तळ्यांनी भरलेले प्रचंड जंगलसदृश उद्यान त्याने आपल्या घराभोवती निर्माण केले. तिथल्या पायवाटांवरून तो आपली अधू दृष्टी सावरत भटकत राहिला.इ.स. १८०० ते १८५० हा काळ चित्रकलेच्या इतिहासात रोमॅण्टिक कालखंड मानला जातो, या कालावधीत अनेक तरु ण डच आणि फ्लेमिश चित्रकार आपल्या ‘चित्र-प्रवासा’करता बाहेर पडले. काही रोमला गेले, फ्लोेरेन्सला गेले, काही जर्मनीत गेले, ºहाईन व्हॅलीला जाऊन पोहचले. जेकब व्हॅन लुई स्पेन आणि मोरोक्कोला गेला, लुईस अपोल तर उत्तर ध्रुवापर्यंत जाऊन पोहचला. आयझॅक इस्रेल डच इस्ट इंडिज बेटांवर जाऊन राहिला, विल्यम दुहेवार्ड मंगोलियाला स्केचिंगकरता गेला, आद्रियन गुवे ताहिती बेटांवर गेला. भारतातही अनेक डच चित्रकार आले, येत राहिले.भारतात या दरम्यान काय परिस्थिती होती? समुद्र ओलांडून जाणे हे धार्मिक परंपरेत बसत नसण्याचा हा काळ. त्यामुळे इथले चित्रकार या काळात फिरत असले तरी ते देशांतर्गतच.अठराव्या शतकातला भारतीय लघुचित्रकार, कांगरा शैलीचा जनक, नैनसुख हिमाचल प्रदेश ओलांडून जसरोताला गेला, त्याआधी त्याचे वडील पंडित शिऊ काश्मीर खोºयातून येऊन हिमाचल प्रदेशात स्थायिक झाले. राजा रविवर्मा केरळमधून बाहेर पडून भारतभर फिरला, मुंबई, पुणे, बडोदा, बंगलोर, म्हैसूर, राजस्थान अशा अनेक ठिकाणी गेला, देशभरातल्या संस्थांनांमध्ये राहिला. त्याने आपल्या भावासमवेत रेल्वेने केलेला हा प्रवास अद्भुत होता. खडतर, कष्टांनी भरलेलाही होताच. पण रविवर्मा सातत्याने फिरत राहिला. त्याचा प्रवास व्यावसायिक निमित्ताने सुरू झालेला असला तरी आपल्या रूढीबद्ध, पारंपरिक राजघराण्यातील चौकटींमध्ये बंदिस्त असणारे आयुष्य झुगारून, बाहेरच्या आधुनिक जगात, मोकळा श्वास घेण्याची, चित्रकलेचे नवे तंत्र, नव्या गोष्टी शिकण्याची, आपल्या कलेला पुढे नेण्याची आस त्यात प्रामुख्याने होती. नंतरच्या काळात, युरोपातून भारतात, आपल्या मुळांच्या शोधार्थ परतलेल्या अमृता शेरगिलने आपली कला-कारकीर्द सुरू करण्याच्या आधी जाणीवपूर्वक भारतीय ग्रामीण प्रदेशात प्रवास केला. इथले लोकजीवन, स्त्रियांचे जगणे, त्यांची सुख-दु:खे दर्शवणारे चेहºयावरचे भाव आणि देहबोलीचा अमृताचा सखोल अभ्यास याच प्रवासात झाला. कला समीक्षक कार्ल खंडालवालांना लिहिलेल्या आपल्या एका पत्रात अमृता शेरगिल लिहिते, ‘‘माझे रंगांचे पॅलेट या प्रवासामुळे पूर्ण बदलले आहे, ते जास्त समृद्ध झाले आणि माझ्या रेषेला सघनता आली, आकारांना खोली आली. हा प्रवास मी केला नसता तर चित्रकार म्हणून माझ्यात काहीतरी अपूर्णता राहिली असती.’’प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट्स मूव्हमेण्टमधले रझा, अंबादास, गाडे चित्रकलेकरता देशाबाहेर पडले, परदेशात स्थायिक झाले, त्यांच्या चित्रकलेला नवे रंग, नवे आयाम मिळाले. आता ग्लोबलायझेशनच्या आणि त्यानंतरच्या काळातले तरुण चित्रकार देशोदेशींच्या आर्ट रेसिडेन्सीच्या निमित्ताने सातत्याने प्रवास करतात. देवदत्त पाडेकरसारखा तरुण चित्रकार आल्प्स पर्वतराजीमध्ये, हिमालयामध्ये वेगवेगळ्या ऋतूंमध्ये मुद्दाम प्रवास करतो, बर्फाळ निसर्गाचे बदलते विभ्रम कॅनव्हासवर उतरवतो.चित्रकलेकरता जगभरात प्रवास केलेल्या या चित्रकारांच्या कॅनव्हासवर असंख्य अद्भुत लॅण्डस्केप्स चितारली गेली, अनोख्या चित्रविषयांनी त्यांची पेंटिंग्ज भरून गेली.प्रवासाचा उद्देश दरवेळी तात्त्विक असतोच असेही नाही, निव्वळ आपली आर्थिक चणचण दूर करण्याचा, व्यावसायिक हेतूही त्यामागे असतोच.कॅनव्हासच्या जागी फिल्म रोल्स, स्टील कॅमेरेही ंंचित्रकारांनी सोबत घेतले. ते माउण्ट एव्हरेस्टवर गेले, डेड सीच्या तळाशी गेले, थरच्या वाळवंटात पोहचले, जपानला गेले, चीनच्या भिंतीवरून चालले, हिमालयाच्या पर्वतराजीमध्ये, अमेझॉनच्या वर्षारण्यात गेले, हिंदूकुश हिंडले. त्यांच्या प्रवासाला अंत नाही, त्यांची पावले थकत नाहीत, कुंचले धरलेले त्यांचे हात प्रवासात सतत रंगवत राहतात...‘‘अनेकदा प्रवास निरु द्देश आणि दिशाहीन होतो, प्रवासातले ताण झेपेनासे होतात, पावलांसोबत मनही भरकटते, अशा वेळी पेंटिंग्ज मदतीला येतात, अनोळखी देशामधले एखादे निसर्गदृश्य नजरेत भरते आणि मग ते कॅनव्हासवर उतरवण्यात, रंग कालवण्यात मन गुंतून जाते. कंटाळवाणा प्रवास अचानक, बघता बघता साहसी बनून जातो.’’अमेरिकन कादंबरीकार आणि हौशी, फिरस्ती चित्रकार सुझन मिनोतने लिहिलेले हे वाक्य.- चित्र- प्रवासाइतकेच जीवन-प्रवासालाही लागू पडणारे. चित्रकार, किंवा कोणताही कलाकार सातत्याने प्रवास नेमके का करतात? या प्रश्नाला कदाचित हेच सार्वकालिक उत्तर असावे.मुझे चलके जाना है.. बस चलके जाना.. असे म्हणत मुशाफिरी वृत्तीने माणूस प्रवास करतच राहणार आहे. एका जागेवरून दुसºया जागेवर, ओळखीच्या प्रदेशातून अनोळखी जगाच्या दिशेने, अधिक चांगले आयुष्य जगण्याच्या प्रेरणेने, रक्तातली साहसाची खुमखुमी जिरवण्याकरता, पैसे मिळवण्याकरता, जगण्याकरता आणि चित्र रंगवण्याकरता...चित्रकार आणि त्यांचे हे प्रवास- याबद्दल अधिक, सविस्तरपणे जाणून घेऊया पुढच्या भागांमध्ये.

(लेखिका ख्यातनाम कला समीक्षक आहेत. sharmilaphadke@gmail.com)ही लेखमाला दर पंधरा दिवसांनी प्रसिद्ध होईल.