पिनिआटा

By admin | Published: December 6, 2015 12:02 PM2015-12-06T12:02:46+5:302015-12-06T12:02:46+5:30

ख्रिसमस जवळ यायला लागला की, अमेरिकेत अनेक चिल्यापिल्यांना पिनिआटाचे वेध लागतात. आपलं बोरन्हाण, दहीहंडी यांचं एकत्र, पण वेगळं रूप असावं, तसा हा आनंदाचा एक वेगळाच शॉवर असतो.

Pinyata | पिनिआटा

पिनिआटा

Next
>- मेक्सिकन दहीहंडीचा छोटा शॉवर
 
शशीकला लेले
 
मी एका डे केअर सेंटरमधे किंडरगार्टनच्या   वर्गाला शिकविण्याचं काम थोडे दिवस केलं, तेव्हा एका मुलाच्या वाढदिवसाला त्याच्या  आजोबांनी पिनिआटा आणला. (पिनिआटा म्हणजे पातळ पुठ्ठय़ाचा खोका असतो. खोक्याच्या आत गोळ्या, चॉकलेटं, इतर छोटय़ा छोटय़ा खाण्याच्या, खेळण्याच्या वस्तू लपवून योग्य वेळेला त्याचा उत्सवमूर्तीवर (बहुतेक वेळा लहान मुलंच उत्सवमूर्ती असतात) वर्षाव व्हावा अशी योजना असते.) त्या दिवशीच्या पिनिआटाला पोनीचं तोंड होतं आणि त्याचं अंग रंगीत पेपरच्या नागमोडी पट्टय़ांनी आच्छादलेलं होतं. आमच्या सेंटरच्या आवारात खूप झाडं होती. एका झाडाच्या फांदीला आम्ही पिनिआटा बांधला. खाली ब्लॅंकेट अंथरलं. सगळी मुलं जमली. बर्थडे बॉयनी पिनिआटाच्या दो:या   ओढल्या, आणि सगळ्या मुलांच्या अंगावर गोळ्या, चॉकलेटं, नाजूक खेळणी यांचा पाऊस पडला. मुलांच्या आनंदाला पारावार राहिला नाही.
मुलं साधारण सात, आठ वर्षाची होईर्पयत आई-वडील, आजी-आजोबा त्यांचे वाढदिवस घरातल्या जवळच्या नातेवाईक मुलांना, शाळेतल्या मित्र-मैत्रिणींना बोलावून साजरे करतात. गेम्स, पिङझा, रिटर्न गिफ्ट्स हे सगळे कार्यक्र म असतात. लहान मुलांच्या पाटर्य़ाना बरेच वेळा पिनिआटा वापरतात. 
अमेरिकेत जिथे इटालिअन, लॅटिन अमेरिकन, मेक्सिकन लोक जास्ती संख्येनी आहेत तिथे पिनिआटाची प्रथा जास्त प्रचलित दिसते. ‘पिग्नाटा’ असा इटालियन शब्द आहे. (पिग्नाटा ह्या मूळ इटालियन शब्दाचं रूप अमेरिकेत येईपर्यंत पिनिआटा असं झालं.) त्याचा अर्थ स्वयंपाक करायचं मातीचं भांडं (गाडगं?). आधुनिक पिनिआटा अर्थातच पुठ्ठा, कागद, खळ अशा वस्तूंच्या मदतीने बनलेला असतो.   
पाश्चिमात्य देशांना मार्को पोलो ह्या इटालियन प्रवाशाने 13 व्या शतकात पिनिआटाची ओळख करून दिली. त्याने चीनमध्ये पहिल्यांदा पिनिआटा पाहिला. चायनीज न्यू ईअरला पाच प्रकारचं बी-बियाणं घातलेला हा पिनिआटा (मडकं) काठीने फोडला जात असे. हा पिनिआटा गाय अथवा बैलाच्या रूपात असे. धान्य जमिनीवर लांबवर पसरवून पिनिआटा जाळला जाई. राख गुड-लककरता ठेवीत. 14 व्या शतकात पिनिआटा युरोपात-स्पेन, इटालीत आला. पहिल्यांदा त्याचा वापर लेंटच्या महिन्यातल्या पहिल्या रविवारी करीत. (ईस्टरच्या आधीच्या एक महिन्याच्या अवधीला लेंट   म्हणतात. ािश्चन परंपरेप्रमाणो लोकांनी ह्या दिवसात अभक्ष भक्षण, मदिरापान, छानछोकी यापासून लांब राहायचं असतं. ह्या महिन्यातल्या काही रविवारी नियमांना जरा शिथिल केलेलं  असतं. अशा एखाद्या रविवारी पिनिआटाचा उपयोग खास मेजवानीसाठी होत असे. ) 
पिनिआटाभोवती धर्माचं वलय देऊन त्याचा उपयोग ािश्चन धर्माच्या प्रचारासाठी  सुरुवातीला इटालीमध्ये केला गेला. सात पॉइंट्स असलेला पिनिआटा तेव्हा लोकप्रिय होता. स्टारच्या सात पॉइंट्सबद्दल असं सांगितलं जाई की, राग, लोभ, द्वेष, गर्व अशासारखे दुर्गुण म्हणजे हे पॉइंट्स. पिनिआटाचे ठळक रंग म्हणजे मोह, माया, काठी मारणा:याच्या डोळ्यांवर बांधलेली पट्टी म्हणजे श्रद्धा. पिनिआटा फोडायची काठी किंवा तो फोडण्याची क्रि या म्हणजे पापक्षालनाची इच्छा. पिनिआटामधली गोळ्या-चॉकलेटं म्हणजे स्वर्ग-सुख. श्रद्धा आणि सद्गुणांच्या बळावर पापक्षालन करून मोक्ष मिळवायची सगळी प्रक्रिया पिनिआटा सूचित करतो. अर्थात अशी  धर्ममरतडांनी दिलेली शिकवण फार काळ टिकली नाही. धार्मिकतेचं वलय ओलांडून लवकरच पिनिआटा निव्वळ मनोरंजनाचं साधन म्हणून लोकप्रिय झाला. 
पिनिआटा जरी 16व्या शतकात युरोपमधून मेक्सिकोत आला असला, तरी आज पिनिआटाचं मूळ मेक्सिकोमधलंच मानलं जातं. स्पॅनिश भाषा बोलणारे लॅटीनीज, मेक्सिकन, बाकी युरोपियन्स असे बरेच लोक आता ािसमस, वाढदिवस, मुलांच्या पाटर्य़ा अशा प्रसंगांना पिनिआटा ठेवतात. त्याला चिकटलेली धार्मिकता कधीच लोप पावली आहे. ािसमच्या वेळी स्टारच्या आकारात आणि इतर वेळी वेगवेगळ्या डिस्नी कॅरॅक्टर्समधे आता पिनिआटा केला जातो. 
हे पाहून मला आपल्याकडच्या दहीहंडीची आठवण झाली. संक्र ांतीच्या सुमारास बोरं, उसाचे करवे अशासारखे पदार्थ असलेली सुगडं हातात घेऊन जाणा:या छोटय़ा मुलीही संक्रांतीच्या सुमाराला बघितलेल्या आठवतात.   पिनिआटाचं दहीहंडीशी साम्य म्हणजे त्याची उंची. दहीहंडीला काय किंवा पिनिआटाला काय, जमिनीवर उभं राहून हात पोचत नाही. ह्युमन पिरॅमिड किंवा काठी अशी काही तरी मदत घ्यावी लागतेच. फोडण्याचा आणि फोडल्यानंतरचा आनंद मात्र दोन्हींचा सारखाच. सुगडामधलं आणि पिनिआटामधलं साम्य म्हणजे दोन्हीमध्ये असलेला मेवा. पिनिआटामधून होणा:या गोळ्या, चॉकलेटांचा वर्षाव बघून आपल्याकडच्या बोरन्हाणाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.   मात्र बोरन्हाण लहान बाळांना आणि तेही फक्त    पहिल्या वर्षीच होतं; पण पिनिआटामधून होणा:या गोळ्या, चॉकलेटांच्या ह्या पावसाला वयाचं बंधन नाही. 
 
लेखिका अमेरिकास्थित निवृत्त शिक्षिका आहेत. 
naupada@yahoo.com

Web Title: Pinyata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.