शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: आजचा कौल माझ्या प्रवासाचा शेवट नाही; पराभवानंतर अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
2
Maharashtra Assembly Election Result 2024: ठाकरे गटाच्या गटांगळ्या! ठाणे-कोकणच्या गडाला खिंडार, शिंदेसेनेपुढे जिंकला फक्त एक आमदार
3
Baramati Vidhan Sabha Election Result 2024 Live : बारामतीचे 'दादा' अजित पवारच! पुतण्याला चितपट करत साकारला ऐतिहासिक विजय
4
दहिसरमध्ये मनीषा चौधरी यांची हॅटट्रिक; शिवसेना उबाठा गटाच्या घोसाळकर यांचा दारूण पराभव 
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : "बहि‍णींनी असा अंडर करंट दाखवला की सगळे उताणे पडले"; विजयानंतर अजित पवारांचा टोला
6
नांदेडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय
7
'ओ स्त्री! रक्षा करना', राजकारणातील सर्वाधिक पावरफुल मंत्र ठरला; एकामागोमाग एक सरकारे वाचली
8
Maharashtra Assembly Election Result 2024: मालाड पश्चिममध्ये अस्लम शेख यांच्याकडून आशिष शेलारांच्या भावाचा पराभव; सलग चौथ्यांदा विजय
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महायुतीचा मुख्यमंत्री कोण?; खुद्द देवेंद्र फडणवीसांनीच दिलं सगळ्यांच्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर
10
Yevla Vidhan Sabha Election Result 2024 Live : छगन भुजबळांनी येवल्याचा गड राखला; २६०५८ मतांनी विजयी, शिंदे पराभूत 
11
Maharashtra Assembly Election Result 2024: वर्सोव्यात शिवसेना उबाठाच्या हारुन खान यांचा विजय, भाजपच्या भारती लव्हेकरांचा १६०० मतांनी पराभव
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: 'अजित पवार पिछाडीवर', अशी खोटी बातमी का दाखवता? अजित पवारांचा सवाल
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : "महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार देवेंद्र फडणवीस!"; आई सरिता फडणवीस यांचं मोठं विधान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : जतमध्ये फडणवीसांच्या शिलेदाराने गड खेचून आणला; गोपीचंद पडळकरांचा मोठा विजय
15
"हा महायुतीच्या एकजुटीचा विजय, जनतेसमोर नतमस्तक", देेवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
16
Mahim Vidhan Sabha Election Result 2024 Live : "एक धनवान अन् एक राजपुत्र, त्यांच्या..."; विजयानंतर महेश सावंतांची पहिली प्रतिक्रिया
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : "आम्ही आधुनिक अभिमन्यू, चक्रव्यूह तोडून दाखवला"; एकहाती विजयानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया
18
अहिल्यानगर जिल्ह्यात महाविकास आघाडीतील दिग्गजांना पराभवाचा धक्का! थोरात, गडाख, तनपुरे, भांगरे पराभूत
19
Sangamner Vidhan Sabha Election Result 2024 Live : बाळासाहेब थोरातांना पराभवाचा धक्का; नवखे अमोल खताळ ठरले जायंट किलर
20
Anushakti Nagar Vidhan Sabha Result 2024: स्वरा भास्करचा पती फहाद अहमद विरुद्ध सना मलिक, निकाल काय?

सोशल मीडियाचा राजकीय रहाटपाळणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 6:48 PM

फेसबुक, केम्ब्रिज अ‍ॅनालिटिका आणि भारत : २०१९

राहुल बनसोडेलोकांचा राजकारणातला प्रचंड रस आणि त्या व्यसनात  ते कसे गुरफटून जातात हे एकदा कळले की त्या माहितीचा उपयोग प्रचारासाठी, निवडणुका जिंकण्यासाठी केला जातो. फेसबुक सदस्यांचा डेटा वापरून केम्ब्रिज अ‍ॅनालिटिका या कंपनीने नेमके हेच केले आणि अनेक देशांच्या मतदारांवर प्रभाव टाकला. भावनांच्या रहाटपाळण्यात गोल गोल फिरवून त्यांचे मत ‘ग्राहका’ला अनुकूल करून घेतले. या आभासी खेळाचे वादळ आता भारतातही घोंघावतेय.ते आपल्याला कुठे घेऊन जाईल?म्ब्रिज अ‍ॅनालिटिका या मतदारांचे प्रोफायलिंग करणाऱ्या कंपनीने पाच कोटी फेसबुक वापरकर्त्यांच्या वैयक्तिक माहितीचा केलेला गैरवापर या आठवड्याच्या सुरुवातीस बाहेर आला. भारतीय राजकारणातही त्यामुळे खडाजंगी सुरू झाली. माध्यमविश्व या बातमीने ढवळून निघाले. मंगळवारी अमेरिकेच्या फेडरल ट्रेड कमिशनने केम्ब्रिज अ‍ॅनालिटिकाची या प्रकरणात कायदेशीर चौकशी सुरू केली. दरम्यान, अमेरिकेच्या सिनेट कॉमर्स कमिटीने याबाबतीत फेसबुकलाही जबाबदार धरले आणि यासंदर्भात फेसबुकने त्वरित खुलासा करावा, अशी मागणी केली. अमेरिकेच्या अलीकडच्या राजकीय इतिहासात हे सर्वात मोठे स्कॅण्डल ठरण्याची चिन्हे दिसत असताना या सर्व प्रकरणाची इत्थंभूत माहिती देणाºया बातम्या द गार्डियन आणि न्यू यॉर्क टाइम्सने आपल्या पहिल्या पानावर छापल्या. यानंतर फेसबुकचे शेअर बाजारातले भाव गडगडले आणि त्यांच्या भागभांडवलात कोट्यवधी डॉलर्सचे नुकसान झाले.फेसबुक यूजर्सचा डेटा चोेरून त्याचा गैरवापर करण्याचा गोरखधंदा कसा चालतो याचा इतिहास मोठा रंजक आहे. आपला माल ग्राहकांच्या माथी मारण्यापासून तर निवडणुकांत मतदारांवर प्रभाव पाडण्यापर्यंत अनेक गोष्टी या डेटाच्या माध्यमातून केल्या जातात हेही अलीकडच्या काळात सर्वांनी पाहिलं.

संशोधनाच्या नावाखाली अलेक्झांडर कोगन या शास्त्रज्ञाने एक आॅनलाइन फेसबुक क्विज बनविली, ज्यात अडीच ते तीन लाख लोक सहभागी झाले. हा सहभाग घेताना त्यांच्या मित्रयादीतल्या लोकांचीही माहिती मिळविण्यात आली. एकूण पाच कोटीहून अधिक लोकांच्या आवडीनिवडी, फिरायला जाण्याच्या जागा, नोकरीचे स्वरूप आणि इतर दैनंदिन जीवनक्रमाची फेसबुकने उपलब्ध करून दिलेली शक्य तितकी माहिती एका सर्व्हरमध्ये गोळा करण्यात आली. ही माहिती नंतर कोगन यांनी केम्ब्रिज अ‍ॅनालिटिकाला दिली. केम्ब्रिज अ‍ॅनालिटिकाने या माहितीचे विविध मॉडेल्स बनवून त्यावर अनेक गणिती प्रक्रि या केल्या. हा कच्चा माल तयार झाल्यानंतर त्याचा वापर कुठल्याही राजकीय पक्षाला निवडणूक जिंकण्यासाठी करणे शक्य होते. अमाप पैसा सोबत घेऊन अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरलेल्या डोनाल्ड ट्र्म्प यांनी केम्ब्रिज अ‍ॅनालिटिकाची ही सेवा विकत घेतली. त्यानंतर या पाच कोटी लोकांना जाहिरातीच्या स्वरूपात निरनिराळ्या राजकीय बातम्या, व्हिडीओ आणि इमेजेस दाखवून प्रत्येक माणसाचा कल कुठल्या उमेदवाराकडे आहे ते तपासण्यात आले. आपल्याला अनुकूल नसणाºया मतदाराचे मत बदलवण्याकरिता त्याच्या मेंदूतल्या अतिशय मूलभूत भावनांना हात घालण्यात आला.

गेली पाच-सहा वर्षे भारतासारख्या देशात निवडणुका या टी-ट्वेंटी क्रि केटपेक्षाही जास्त लोकिप्रय झाल्या आहेत. नकाशावर लवकर दाखवता येणार नाहीत अशा प्रदेशांतल्या निवडणुकांमध्येही उर्वरित देशाला कमालीचा रस असतो. दिल्लीतल्या आपल्या आवडत्या नेत्याच्या पक्षाची गल्लीपातळीवर कशी आगेकूच होते आहे याच्या सुगम्य आणि सुरस कथा एका पक्षाच्या समर्थकाने सोशल मीडियाच्या पोस्टीत रंगवून सांगणे आणि त्याखाली प्रतिपक्षाच्या समर्थकांनी दिल्लीपातळीवरच्या नेत्याला दूषणे देणे वा त्याची टिंगल करणे हा सोशल मीडियावरचा नित्याचा खेळ असतो. या देशात निवडणुका होत नसतात तेव्हाही आपापल्या पक्षाच्या प्रचारात लोक गुंतलेलेच असतात. सार्वत्रिक निवडणुकांचा हा पंचवार्षिक खेळ सोशल मीडियावर दर पाच तासाने बदलत असतो. मतदानासाठी प्रत्यक्ष इव्हीएम मशीनचा वापर न करता फेसबुकचा वापर केला तर आजचे सरकार उद्या विरोधी पक्षात आणि आजचा विरोधी पक्ष उद्या सत्तेत असू शकतो. ही रस्सीखेच आलटून पालटून कधी या, तर कधी त्या बाजूला झुकत असते. एखाद दोन दिवस कुणी राजकारणावर काही बोलले नाही तर उगीचच चुकचुकल्यासारखे वाटते, तोवर सरकारचा किंवा विरोधी पक्षाचा एखादा नेता कुठलेसे विधान करतो आणि त्या विधानाचा खरपूस समाचार घ्यायला लोकांची शर्यत लागते. कित्येकदा इकडच्यांचे धोरण हे तिकडच्यांचा विनोद असतो तर कधी तिकडच्यांचा विनोद ही इकडच्यांची तळपायाची आग मस्तकाला नेत असतो.

आभासी निवडणुकांच्या खेळात लोक इतके व्यग्र आहेत की, प्रत्यक्ष निवडणुकीत निवडून आलेले लोक नव्वद लाख कोटींचा अर्थसंकल्प कुठल्याही चर्चेविना अवघ्या अर्ध्या तासात मंजूर करून टाकतात. या अर्थसंकल्पात खासदारांचा पगार वाढलेला असतो तर गरिबांचे अनुदान कमी झालेले असते, राजकीय पक्षांना मिळालेल्या देणग्यांची कुठलीही चौकशी होणार नाही अशी तरतूद त्यात असते आणि असा रोजच्या जीवनावर प्रभाव टाकणारा अर्थसंकल्प लोकप्रतिनिधींच्या गोंधळात आणि सरकार पक्षाच्या रेटण्यात बळेबळे पास करून घेण्यात येतो. अर्थात तुरळक लोक यावरही फेसबुकवर चर्चा करू पहातात; पण अर्थसंकल्पाचे व्हिडीओ चित्रण पाहताना त्यात मोठा वाद घालता येईल, अशा काही शक्यता दिसत नसल्याने फेसबुकीय राजकारणी त्याकडे दुर्लक्ष करतात. लोकांचे लक्ष दुसरीकडे रहावे म्हणून सरकार प्रायोजित यंत्रणाही रोज नवनव्या शक्कली लढवून काढते. शेतीच्या समस्यांविषयी देशाच्या संरक्षणमंत्री हे गतकाळाच्या सरकारचे पाप आहे असे विधान करतात आणि मग त्यांचे विधान त्यांच्या फोटोखाली पेस्ट करून या बाई संरक्षणमंत्री आहेत की कृषिमंत्री, असा प्रश्न विचारणारी इमेज फेसबुकवर टाकली जाते. सरकारच्या विरोधातल्या लोकांना ही इमेज संरक्षणमंत्र्यावर टीका करणारी आहे असे वाटते आणि मग ते ती इमेज शेकडो ठिकाणी शेअर करीत जातात. ही इमेज सरकार पक्षानेच बनविली असल्याची शक्यता जास्त असते, वरवर विरोधी वाटणारी ती इमेज लाखो लोक शेअर करीत जातात आणि या संरक्षणमंत्री आहेत कृषिमंत्री नाही हा उपरोध जरी लोकांना कळत असला तरी गतकाळातल्या सरकारवर त्यांनी ओढलेले ताशेरे आपसूकच सर्वदूर पसरून जातात. वरवर विरोधी वाटणाºया एखाद्या इमेजचा मानवी मेंदूवरचा सटल परिणाम वेगळाच असतो आणि ही इमेज तो परिणाम घडवून आणण्यात यशस्वी ठरते.

मुळात लोकांना राजकारणात एवढा रस का असतो? या प्रश्नाचा मानवंशशास्त्राच्या अंगाने घेतलेला शोध मोठा गमतीशीर आहे. माणसांची उत्पत्ती नरवानरांपासून झाली आहे, असे एक वाक्य सर्रास वापरले जाते. माणसाची उत्पत्ती नरवानरांपासून झालेली नसून माणसे नरवानरेच आहेत ही व्याख्या जास्त सटीक ठरावी. माणसांच्या मूलभूत भावनांचा अभ्यास करायचे झाल्यास त्याच्यातल्या नरवानराला नपेक्षा माकडाला जवळून ओळखणे आवश्यक आहे. माणसात लपलेल्या माकडांचा अभ्यास करणाºया ‘युवर न्यूरोकेमिकल सेल्फ’ या पुस्तकाच्या लेखिका लॉरेटा ब्रुईनिंग यांनी मानवी मेंदूतले राजकारणाच्या मूलभूत भावनांवर अभ्यास केला आहे. त्यांच्या मते जिवंत राहाण्याच्या मूलभूत प्रेरणेसाठी माणसाचा मेंदू काही गोष्टींकडे नितांत गरज म्हणून पहात असतो. यात जिवंत राहाण्यासाठी शारीरिक गरजांची अर्जन्सी ही या सामाजिक गरजांच्या अर्जन्सीइतकीच महत्त्वाची असते. राजकारणातले ट्रिगर्स ही अर्जेन्सी पूर्ण करतात तेव्हा तुम्हाला आनंदाची भावना येते तर हे ट्रिगर्स अर्जेन्सी जेव्हा पूर्ण करीत नाहीत तेव्हा तुम्हाला दु:ख होते. यामुळे राजकारणाने मेंदूवर होणारा परिणाम हा नेहमी रहाटपाळण्यासारखा चढता उतरता असतो.

माणूस जन्माला येतो तेव्हा हे जग आपल्याभोवतीच फिरते अशा भ्रमात असतो. यामुळे लोक तात्पुरते सुखी असतात, वय वाढल्यानंतर जग आपल्याभोवती फिरत नाही हे समजल्यानंतर मात्र लोक दीर्घकाळासाठी दु:खी होतात. जगण्याच्या आदिम प्रेरणोत मग आपल्या आजूबाजूला ‘जे काही चालले आहे ते चांगले नाही’ ही भावना माणसाच्या मनात जन्म घेते. राजकारणी लोक नेमक्या याच भावनेचा फायदा घेऊन जग तुमच्याभोवतीच फिरते आहे हे व्यक्तींना पटवून देण्यात यशस्वी होतात. या मोहात पडलेले लोक मग क्षणिककाळासाठी सुखी होतात; पण दीर्घकाळासाठी दु:खीच राहातात. इतिहासात माणसांचे पूर्वज जगण्यासाठी आपल्यासारख्याच इतर प्राण्यांच्या कळपात राहून त्याच्याशी संबंध प्रस्थापित करीत असतं. कळप करणो या त्यांच्या जिवंत राहाण्याच्या आदिम प्रेरणोचा भाग असे. मेंदूचा आकार लहान असणारे प्राणी जसे की मुंग्या, उंदीर, हे हुबेहुब आपल्यासारख्याच दिसणा:या एका मोठय़ा कळपाचा भाग असतात. बाह्यरूपातले बारकावे व्यवस्थित ओळखू शकणारा मोठा मेंदू असणारे सस्तन प्राणी मात्र अधिक चांगल्या सामुदायिक संधींसाठी सजातीय प्राण्यांशी नवनवीन संबंध निर्माण करण्याच्या प्रयत्नात असतात. सामुदायिक संधीचा हा प्रयत्न जिवंत रहाण्याच्या प्रेरणोला उत्तेजन देतो ज्यामुळे सुरक्षितपणाची भावना निर्माण होते.

पण सस्तन प्राण्यांना फक्त सुरक्षिततेचीच गरज असते असे नाही तर त्यांना कळपात आपले वर्चस्वही हवे असते. अप्रत्यक्षरीत्या या वर्चस्वाचा उपयोग पुनरुत्पादनांच्या चांगल्या संधी मिळण्यात होतो. माणसे प्रत्यक्ष हिंसा करण्यापेक्षा शब्दांतून आपले वर्चस्व जास्तवेळा गाजवत असतात. सस्तन प्राणी कळपात असताना कळपाअंतर्गत वर्चस्वासाठी प्रयत्नशील असले तरी कळपात रहाण्याचा मुख्य उद्देश हा बाह्यजगाकडून असलेल्या धोक्यांपासून संरक्षण मिळविण्याचा असतो. यात म्होरक्या किंवा नेता आपले कळपात वर्चस्व स्थापन करण्यासाठी कळपाच्या बाहेर उद्भवणा:या धोक्यांचा वापर करून घेतो. बाह्यधोक्यांपासून सुरक्षितता मिळाल्याने कळपातले इतर सदस्य नेत्याचा उदोउदो करतात. यात नेता आपल्याला काहीकाळ बाह्यधोक्यापासून वाचवत असल्याने क्षणिक काळासाठी सुखी होत असला तरी प्राण्यांचा मेंदू नैसर्गिकपणो सतत पुढचा धोका शोधतच रहात असल्याने प्राणी दीर्घकाळासाठी मात्र दु:खीच रहातात.

माणसाचा आणि त्याच्या मेंदूचा विकास हा सततच्या धोक्याने युक्त अशा असुरक्षित जगात झाला आहे. आपण शरीराने आफ्रिकेच्या बाहेर आलेलो असलो तरी आपले मन मात्र आजही आफ्रिकेतच आहे. अलीकडच्या काळात माणसाचे जीवन बरेचसे सुरक्षित झाले असले तरी त्याच्या मेंदूतली नैसर्गिक असुरक्षिततेची भावना प्रसवणारी यंत्रणा तशीच आहे. माणसाला जेव्हा शारीरिक भीती वाटत नाही तेव्हा त्या भीतीची जागा दैनंदिन जीवनात येणारे अपेक्षाभंग, निराशा आणि अपयश घेते. या भीतीचे उत्तर राजकारण्यांकडे तयार असते आणि त्यातूनच मग तात्पुरत्या आनंदाच्या शोधात दीर्घकाळासाठी दु:खी होण्याच्या राजकारणाच्या प्रक्रियेत माणसे सहभागी होतात. फेसबुक या संकेतस्थळावर राजकीय पोस्ट एकाखाली एक येत असल्याने आणि अशा प्रत्येक पोस्टवर अनुकूल-प्रतिकूल कमेंट एकाखाली एक येत असल्याने हा सुख-दु:खाचा रहाटपाळणा माणसाला अतिशय वेगाने अनुभवता येतो, ज्याचा दीर्घकालीन परिणाम म्हणून माणूस राजकारणाच्या नादी लागतो वा त्याला राजकारणाचे व्यसन लागते. राजकारणाचे हे व्यसन नेमके कुठून येते हे एकदा व्यवस्थित समजल्यानंतर या माहितीचा उपयोग राजकीय प्रचार करण्यासाठी, निवडणुका जिंकण्यासाठी आणि निवडणुका जिंकल्यानंतरही नेतेपद ठिकवून ठेवण्यासाठी केला जातो. माणसाच्या मनातल्या नैसर्गिक भीतीचे आधुनिक स्वरूपाला आव्हान करताना  अ) अपेक्षाभंग - आम्हाला सोडून त्यांना निवडून दिले आणि त्यांनी काहीच केले नाही, ब) निराशा - बेरोजगारी वाढते आहे महागाई वाढते आहे असे संदेश, क) अपयश- मागच्या सरकारला इतकी वर्षे निवडून देऊनही त्यांनी काहीच केले नाही, असा संदेश असणा:या मजकुरांचा आळीपाळीने वापर केला जातो.

या तंत्रचा वापर करून आपल्या आजूबाजूला चोवीस तास चाललेल्या प्रचाराला सामान्य लोक कंटाळले असले तरी राजकारणाच्या रहाटपाळण्याचे व्यसन जडलेल्यांसाठी मात्र राजकीय प्रचार ही जीवनावश्यक गोष्ट बनली आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीत प्रचारापासून तटस्थ राहिलेल्या आणि डोनाल्ड ट्र्म्प यांना मत देण्यास अनुकूल नसणा:या लोकांच्या भावनांना राजकारणाच्या रहाटपाळण्यात वारंवार गोल गोल फिरवून त्याचे प्रतिकूल मत आपल्याला अनुकूल होईल पाहिले गेले. या प्रक्रियेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्र्म्प यांचा विजय झाला. त्यांना मत देण्यास अनुकूल नसलेल्या लोकांच्या मेंदूला आपल्या या नैसर्गिक भावनांमुळे किती वेळा रहाटपाळण्यात बसावे लागले असेल याचा व्यवस्थित हिशेब अद्याप बाहेर आलेला नाही. केम्ब्रिज अॅनालिटिकाने अमेरिकेत वापरलेले हे तंत्र भारताच्या निवडणुकांतही वापरले जाऊ शकते का, असा प्रश्न इथे काहींना पडू शकतो.

अमेरिकेतल्या लोकांचा वैयक्तिक डेटा चोरून केम्ब्रिज अॅनालिटिका त्या लोकांचा कल डावीकडे आहे की उजवीकडे हे तपासण्यासाठी उच्च दर्जाचे तंत्र विकसित करीत होती, भारतीय लोकांसाठी मात्र तसे तंत्र विकसित करण्याची कसलीही गरज नाही. भारतात फेसबुकचा वापर लोक आपली राजकीय भूमिका स्पष्टपणो मांडण्यासाठी करतात, त्यासाठी प्रचारकी खोटय़ा बातम्या हिरिरीने शेअर करतात, आपल्या आवडत्या नेत्याच्या प्रचारासाठी आपल्याच देशबांधवांना आईबहिणींवरून कमेंटमध्ये शिवीगाळ करतात. भारतात एखाद्या माणसाचा कल कुठल्या राजकीय पक्षाकडे आहे हे तपासण्यासाठी कुठलेही आधुनिक तंत्रज्ञान वापरण्याची गरज नाही, कारण आपल्या व्यक्तिगत कर्तृत्वाची ओळख देता येत नसल्याने राजकीय पक्षांची चिन्हे आणि घोषणा हीच भारतीयांनी आपली व्यक्तिगत ओळख बनवून घेतली आहे. खोटय़ा प्रचारकी बातम्यांनी आणि टोकाच्या विखारी चित्रंनी अनेक भारतीय लोकांची फेसबुक टाइमलाइन ओसंडून वाहते आहे. भारतातली विकाऊ माध्यमे, सत्याचा अपलाप, नवअंधश्रद्धा आणि टोकाच्या राजकीय विचारांचा भक्तिपंथ पाहिल्यास फेसबुकचे भारतातले भविष्य अजूनही उज्ज्वलच आहे.

(लेखक माहिती-तंत्रज्ञान व मानववंशशास्त्रचे अभ्यासक आहेत.)rahulbaba@gmail.com  

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाCambridge Analyticaकेम्ब्रिज अ‍ॅनालिटिका