प्रिन्स विल्यम्स आणि केट
By admin | Published: April 9, 2016 02:44 PM2016-04-09T14:44:39+5:302016-04-09T14:44:39+5:30
तो भावी राजा आणि ती त्याची होणारी राणी! पदरात दोन गोडुली मुलं. वर्तन अत्यंत प्रतिष्ठित आणि मर्यादशील. राजघराण्याचा रुबाब असला, तरी त्याची आढय़ता नाही. बदलत्या वास्तवाची जाणीव आहे आणि त्यानुसार बदलाची तयारीही!
Next
- अमृता कदम
तरुण शाही जोडप्याच्या भारत दौ:याच्या निमित्ताने बदलत्या ‘रॉयल’ वर्तणुकीची कहाणी
एक साधी, सामान्य घरातली सुरेख, गुणी मुलगी.. तिच्या प्रेमात पडलेला राजकुमार.. त्यांच्या प्रेमातले अडथळे आणि ते पार करून सुखाने नांदू लागेपर्यंत येऊन सुफळ-संपूर्ण झालेली त्यांची कहाणी.. अशा परीकथा आपण लहानपणी पुष्कळ वाचलेल्या असतात. पण काही जोडप्यांच्या बाबतीत सत्य या कल्पिताहूनही सुंदर असतं. केट मिडल्टन आणि प्रिन्स विल्यम्स यांची कहाणी ही जुन्या परीकथांच्या पुस्तकांमधून अलगद सत्यात यावी, अशीच आहे!
एका मध्यमवर्गीय घरातली केट मिडल्टन प्रिन्स विल्यम्सशी लग्न करून ब्रिटनच्या राजघराण्याची सून झाली. केट मिडल्टन ते ‘डचेस ऑफ केंब्रिज कॅथरिन’ बनण्यापर्यंतचा तिचा प्रवास स्वप्नवत आहे आणि आता तर मीडियाच्या भोचक नजरांशी सामना करत मुळं धरलेल्या तिच्या संसाराला दोन गोड फुलंही आली आहेत.
राजघराणं हा ब्रिटनच्या जनतेच्या मनातला जुना हळवा कोपरा आणि नव्या वादाचं, मतभेदांचं एक कारणही! अलीकडच्या काळात राजघराण्यातल्या तरुण जोडप्यांचं व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवनातल्या वर्तनाने, प्रेमप्रकरणं, विश्वासघात, बाहेरख्यालीपणा, घटस्फोट असल्या वादग्रस्त, सनसनाटीपणाने राणीचा राजवाडा सातत्याने हादरता राहिला आहे.
त्या पाश्र्वभूमीवर राणी व्हिक्टोरियाचा नातू आणि नातसून यांनी मात्र राजघराण्याला प्रतिष्ठित स्थैर्याचा दिलासा दिला आहे. मर्यादशील, तरीही आधुनिक, नव्या पिढीचं प्रतिनिधित्व करणारं हे जोडपं सुरु वातीपासूनच औत्सुक्याचा विषय बनून राहिलं आहे. ब्रिटनची जनता आणि राजघराण्यावर नजर ठेवून असलेली माध्यमं त्यासाठी कोणतीही ‘शाही’ पाश्र्वभूमी नसलेल्या एका व्यक्तीला मोठं श्रेय देतात : केट मिडल्टन.
केटचा जन्म बर्कशायरमधल्या रीडिंगचा. वडील मायकल हे पायलट आणि आई कॅरोल ही फ्लाइट अटेंडंट होती. केटच्या आईचं कुटुंब हे खरं तर खाण कामगारांचं. पण केटच्या महत्त्वाकांक्षी आजीने लेकीला पुढे ढकलतं ठेवलं. केटच्या जन्मानंतर काही वर्षांतच तिच्या आईने स्वत:चा व्यवसाय सुरू केला. मिडल्टन कुटुंबाची आर्थिक ऐपत चांगलीच वाढली. त्या बळावर केटची रवानगी सेंट अँर्डय़ूज प्रेप स्कूल आणि मार्लबरो कॉलेजसारख्या प्रतिष्ठित शिक्षण संस्थांमध्ये झाली. मार्लबरो कॉलेजनंतर केटने प्रवेश घेतला स्कॉटलंडमधल्या युनिव्हर्सिटी ऑफ सेंट अँर्डय़ूजमध्ये. इथेच तिच्याबरोबर शिकायला होता प्रिन्स विल्यम्स. आधी ओळख आणि ओळखीचं रूपांतर मैत्रीत झालं. त्यानंतर काही काळ आपल्या इतर मित्रंसोबतच केट आणि विल्यम्स एकच फ्लॅट शेअर करून राहत होते. कॉलेजमधल्या दिवसांत प्रिन्स विल्यम्स आपल्या राजघराण्याच्या वलयापासून लांब राहत अगदी सामान्य विद्याथ्र्यासारखंच आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत होता. अगदी स्वत: दुकानातून फळं-भाज्या खरेदी करण्यापासून जेवण बनवण्यापर्यंत सगळ्या गोष्टी स्वत:च करण्याचा त्याचा प्रयत्न असे. त्यामध्ये या सगळ्या फ्लॅटमेट्सची मदत व्हायची.
- याकाळात केटचा ‘प्रिन्स चार्मिंग’ होता तिला सिनीअर असलेला रु पर्ट फिंच! तर राजघराण्यातून आलेल्या विल्यम्सचे स्वत:चे असे वेगळे ताण-तणाव होते. कॉलेजमध्ये झालेल्या एका फॅशन शोनंतर मात्र प्रिन्स विल्यम्सच्या मनात केटबद्दल आकर्षण निर्माण व्हायला सुरु वात झाली. त्यानंतर आपल्या मनातल्या भावना विल्यम्सने केटजवळही बोलून दाखवल्या. मात्र त्यावेळी फिंचच्या प्रेमात असलेल्या केटने विल्यम्सला ग्रीन सिग्नल दिला नाही. पण केटच्या कुंडलीतच बहुधा राजयोग असावा. कारण 2क्क्2 चं वर्ष संपता संपता केट आणि तिचा बॉयफ्रेंड वेगळे झाले.
- विल्यम्स आणि केटच्या प्रेमकहाणीला सुरुवात झाली. मात्र माध्यमांना टाळण्यासाठी प्रिन्स विल्यम्स आणि केटने आपलं नातं उघड न होऊ देण्याची पुरेपूर खबरदारी घेतली होती. चारचौघांमध्ये वावरताना वागण्याचे काही नियमच जणू त्यांनी स्वत:साठी बनवले होते. सार्वजनिक ठिकाणी एकमेकांचे हात न धरणो, हॉटेलमध्ये सोबत असणो टाळणो. 2क्क्4 साली केट राजघराण्यातील लोकांसोबत स्किइंगसाठी गेली होती. त्यानंतर केट आणि तिचे विल्यम्ससोबतचे संबंध हे माध्यमांसाठी चर्चेचा विषय बनू लागले.
- बघता बघता केटचं सामान्य, चार चौघांसारखं आयुष्य एकदमच बदलून गेलं. प्रिन्स विल्यम्सची गर्लफ्रेंड असली, तरी केट स्वत:ची पाश्र्वभूमी विसरली नसावी. त्यामुळेच कदाचित राजघराण्याशी संबंध आल्यानंतरही ती नोकरीच्या शोधात होती. पण आता केटकडे भावी प्रिन्सेस म्हणून पाहिलं जात होतं. त्यामुळे तिला नोकरी मिळण्यात अडचणी येऊ लागल्या. शिवाय तिला मिळणारा जॉब हा राजघराण्याच्या प्रतिष्ठेला साजेसा असायला हवा होता. राजघराण्याचे नियम, या कुटुंबाच्या सदस्यांवर सार्वजनिक जीवनात वावरताना येणा:या मर्यादा हे काटे केटला पहिल्यांदा टोचले ते हे असे. तिचं राजकुटुंबात आगमन होण्यापूर्वीच!
अखेरीस ब:याच प्रयत्नांनंतर तिला तयार कपडे विकणारी ब्रिटनची प्रसिद्ध क्लोदिंग चेन ‘जिग्सॉ’मध्ये काम मिळालं. आठ वर्षांच्या या सोबतीची परिणती अखेर लग्नबंधनात झाली.
29 एप्रिल 2क्11 रोजी वेस्टमिनस्टर अबे इथे केट आणि प्रिन्स विल्यम्सचा शाही विवाहसोहळा पार पडला. लग्नाच्या काही वेळापूर्वीच राणी एलिझाबेथने केटला ‘डचेस ऑफ केंब्रिज’ हा किताबही दिला. आणि ब्रिटनच्या जनतेच्या दृष्टीने ‘कॉमनर’ असणारी केट राजघराण्याची सून कॅथरिन बनली.
राजघराण्याचा भाग बनणं हे जितकं प्रतिष्ठेचं असतं, तितकंच जबाबदारीचं आणि मर्यादेचंही! तुम्ही चर्चेचा आणि बातम्यांचा विषय असता, याचं भान ठेवूनच केट आणि विल्यम्स यांचं सार्वजनिक वर्तन असायचं आणि असतं. त्यामुळे वाद, गॉसिप यांपासून केट दूरच राहिली. तिच्या जगप्रसिद्ध सासूबाई प्रिन्सेस डायनाच्या वादळी आयुष्याच्या पाश्र्वभूमीवर केटचं हे ‘नेमस्त’ वागणं चर्चेचा विषय न होतं तरच नवल!
अपवाद फ्रान्समधल्या एका घटनेचा. 2क्12 साली दक्षिण फ्रान्सच्या किना:यावर सनबाथ घेणा:या केटचे टॉपलेस फोटो फ्रेंच मासिक ‘क्लोसर’मध्ये प्रसिद्ध झाले. त्यानंतर या फोटोंची प्रसिद्धी रोखण्यासाठी ब्रिटनच्या राजघराण्याला कायदेशीर लढाई लढावी लागली. ब्रिटनमधल्या कोणत्याही प्रकाशनाने मात्र हे फोटो घेतले नव्हते. ब्रिटिश जनतेबरोबरच माध्यमांच्या भोचक विश्वातही केटने मिळवलेल्या स्थानाचंच हे यश!
या वादानंतर अवघ्या काही दिवसांतच केटला आनंदाची बातमी मिळाली. 2क्13 मध्ये पहिल्या अपत्याला जन्म दिल्यानंतर पुन्हा वर्ष- दीड वर्षातच केटच्या पोटी कन्या आली. प्रिन्स जॉर्ज आणि प्रिन्सेस शालरेटच्या आगमनाने प्रिन्स विल्यम्स आणि केट मिडल्टनच्या सुखी संसाराची चौकटच पूर्ण झाली. हे ‘मेड फॉर इच अदर’ जोडपं सध्या भारत दौ:यावर आहे. सात दिवसांच्या या दौ:यात भारत आणि भूतानची सैर करण्याचा दोघांचा बेत आहे. गो:या राजा-राणीच्या स्वागतासाठी जिवाची कुरवंडी करणा:या ‘वसाहती’वरला साम्राज्याचा सूर्य मावळल्यानंतरही भारतात आलेल्या प्रिन्सेस डायनासाठी या देशाने स्वागताचे गालिचे अंथरले होते. त्यावरून विहरलेली ती सम्राज्ञीच होती जणू!
- पण प्रिन्स विल्यम्स आणि केट हे जोडपं मात्र त्या झगमगाटापासून दूरच असेल आणि वावरेलही! जगभरातून भारत भटकायला येणा:या उत्सुक तरुण पर्यटकांचा ‘द सोशल’ या दक्षिण मुंबईतल्या ‘हिप’ क्लबमध्ये अड्डा असतो. विल्यम्स आणि केट हे दोघे ‘द सोशल’मध्येच एक संध्याकाळ घालवणार असल्याच्या बातम्या आहेत.
पारतंत्र्यात असतानाच उसळू लागलेल्या भारतीय ‘स्वाभिमाना’चं सडेतोड प्रतीक असलेल्या ताजमहल हॉटेलमध्ये हे शाही जोडपं राहणार आहे. काळ्या कातडीच्या लोकांना प्रवेश नाकारणा:या नकचढय़ा ब्रिटिश क्लब्जना उत्तर म्हणून जमशेदजी टाटांनी उभारलेलं हे आयकॉनिक हॉटेल!
- देशाच्या इतिहासात एखादं वर्तुळ पूर्ण होतं, ते हे असं!
(लेखिका दिल्लीस्थित मुक्त पत्रकार आहेत.)
amritar1285@gmail.com