ब्रिटनस्थित लेखिकेचा मराठी ब्लॉग
आर्निका नामक ब्रिटनस्थित ब्लॉगर गेली पाच वर्षे लेखन करतेय, पण नवखेपणा अजिबात नाही. रोज मनात खूप काही येते, त्यातले काही समोर ठेवताना लेखिका एकदम वेगळा अनुभव देत राहते. अभयारण्य भेटीत जोकिया नामक हत्तिणीची कहाणी हलवून टाकते. जोकिया गाभण असताना काम करत नाही म्हणून मालक तिला छळतो. डोंगरावर बाळंत होऊन पिलू गडगडत खाली जाते. मरते. शोकविव्हल जोकिया मग काम बंद करते. मालक चिडून तिचे डोळे फोडतो. लेक नावाची एक विलक्षण स्त्री असे पीडित हत्ती पाळते. जोकिया आधी लेकला जुमानत नाही, पण नंतर दोघी एक होतात, अशी एक गोष्ट इथं वाचायला मिळते. ‘फेसबुक नसेल तर ना आपण बंद पडत, ना फेसबुक’ हे नमूद करताना ‘प्रत्येक ओवीला किती लाइक्स आणि कमेंट्स येत आहेत हे तपासत बसले असते तर ज्ञानोबा ज्ञानेश्वरी पूर्ण करू शकले असते का?’ हा प्रश्नसंदर्भ एकदम सणसणीत. ‘मला कळलेलं लंडन’ मालिकाही मनोज्ञ.
http://arnika-saakaar.blogspot.in/
- अनंत येवलेकर