शहरं
Join us  
Trending Stories
1
"रावसाहेब दानवेंना मुख्यमंत्री करा", युवकाने रक्ताने लिहिले पंतप्रधानांना पत्र
2
महायुतीचे ठरले! अखेर ‘या’ तारखेवर शिक्कामोर्तब; पंतप्रधान मोदी शपथविधीला राहणार उपस्थित
3
काळजीवाहू CM एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांनी दिली महत्त्वाची अपडेट; म्हणाले...
4
काँग्रेसची कठोर भूमिका! बेशिस्त वर्तन खपवणार नाही, पक्ष प्रतिमा मलिन करणाऱ्यांवर कारवाई
5
"ज्यांना कुणाला वाटते, त्यांनी ईव्हीएम हॅक करून दाखवावे"; दानवेंचं जानकरांना खुलं आव्हान
6
“पक्षाने फक्त तिकीट दिले, सभा-सामग्री नाही, वाऱ्यावर सोडले”; काँग्रेस उमेदवाराचा आरोप
7
“काळजीवाहू CM संकल्पनाच नाही, राज्यात राष्ट्रपती राजवटीची स्थिती”; वकिलांचे कायद्यावर बोट!
8
“एकनाथ शिंदेंवर PM मोदी-अमित शाह यांचे भावाप्रमाणे प्रेम”; भाजपा नेत्याचे विधान चर्चेत
9
VIDEO: अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न; तरुणाला लोकांनी पकडून केली मारहाण
10
"...तर आम्ही आपल्या विरोधात उमेदवार देणार नाही"; दिल्ली CM आतिशी यांची भाजप नेत्याला अनोखी ऑफर
11
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडली, दरे गावी बंगल्यावर डॉक्टरांची टीम दाखल 
12
'भाजपमध्ये नेतृत्वावरून संभ्रम, त्यामुळेच सत्तास्थापनेला विलंब'; अंबादास दानवेंचा मोठा दावा
13
'जय' हो..! पाक 'हायब्रिड मॉडेल'साठी 'कबूल'; आता कसं भारत म्हणेल तसं! पण ठेवल्या या २ अटी
14
"मुख्यमंत्री भाजपचाच, उरलेल्या दोन पक्षांना..."; अजित पवारांकडून मोठी घोषणा
15
ज्या EVM वर लोकसभा जिंकली, त्यावरच नीलेश लंकेंनी शंका घेतली; म्हणाले, “आता विधानसभेला...”
16
“मी स्वतः इंजिनिअर, मला सगळे माहिती आहे, EVM हॅक करता येते”; महादेव जानकर थेटच सांगितले
17
“EVM सेट केले जाते हे दाखवले होते, विश्वास ठेवला नाही, पण आता...”; शरद पवारांचा मोठा दावा
18
"बांगलादेशातील हिंदूंसाठी लवकरात लवकर..."; केंद्र सरकारला संघाचं मोठं आवाहन
19
"अमित शाह यांनी गुन्हा नाही तर केजरीवालांना..."; भाजपाच्या आरोपावर संजय सिंह यांचा पलटवार
20
IND vs PAK : युवीची कार्बन कॉपीच! Nikhil Kumar ची बॅट तळपली; तो आउट झाला अन् मॅच फिरली

सोललेस सिटी

By admin | Published: April 09, 2016 2:41 PM

गचडीने गिजगिजलेल्या सेऊलमधल्या कलकलाटाला कंटाळून सोंगडोमध्ये स्थायिक झालेली जोडपी विकेण्ड आला, की सेऊलला पळतात! का? - तर सोंगडोमध्ये बाकी सगळं आहे, पण ‘जान नाही’ असं त्यांना वाटतं. सोंगडोमध्ये समुद्राचं पाणी फिरवून केलेल्या कृत्रीम नदीकाठच्या शुद्ध शांततेत फिरण्यापेक्षा सेऊलमधली प्रदूषणाने भरलेली हवा त्यांना ‘जिवंत’ वाटते. हा या ‘स्मार्ट’ शहराच्या वाटय़ाला आलेला एक नवाच प्रश्न आहे.

 घडी न मोडलेल्या को:या-करकरीत सोंगडोचे  नवे नामकरण- अपर्णा वेलणकर

 
या शहरात न्यूयॉर्कमधले सेंट्रल पार्क आहे, सिडनीचे ऑपेरा हाऊस आहे, व्हेनिसमधले कालवे आहेत आणि अगदी डिट्टो पॅरिससारखे रस्तेही आहेत. काय नाही इथे?.. म्हणाल ते सगळे सगळे आहे. कुणीतरी नीट चित्र काढून मग जमिनीवर रचावी तशी, आधी ठरवल्याबरहुकूम ठरल्या नियमांनी नेमकी चालणारी जादूनगरीच आहे ही!.. पण तरी काहीतरी चुकले आहे इथे. या प्रमाणबद्ध, चित्रसारख्या शहराला नुसते देखणो शरीरच आहे फक्त, त्यात आत्मा नाही.. इथे सगळे यंत्रसारखे चालते. गजबजत्या, भयाण गर्दीच्या सेऊलमधून आम्ही इथे आलो, तेव्हा कसे शांत, शिस्तीचे वाटले होते. पण मग कंटाळा आला या शहराचा! आपण एखाद्या चित्रपटासाठी लावलेल्या कृत्रिम सेटवर फिरतो आहोत, असेच वाटायला लागले. असे का? काय चुकले असेल या शहरात?
- दक्षिण कोरियाच्या सोंगडो बिङिानेस डिस्ट्रिक्टमध्ये जाऊन आलेल्या एका जोडप्याला पडलेला हा प्रश्न त्यांच्या ‘वन मॉडर्न कपल’ या ब्लॉगवर विस्ताराने वाचायला मिळतो.
जगभर भटकंती करायची, त्याबद्द्ल जिथे असू तिथून आपल्या वेबसाइटवर/ब्लॉग्जवर लिहायचं, त्यासाठी ‘ट्राफिक’ मिळवायचं. आपल्या साइटवर जितका जास्त ‘फुटफॉल’ - म्हणजे चाहत्या वाचकांची वर्दळ - तितक्या जाहिराती मिळण्याची आणि त्यातून कमाईची शक्यता मोठी, असा एक नवा व्यवसाय सध्या चांगलाच रुजू लागला आहे. त्यातलंच हे अमेरिकन जोडपं.
ते गेले होते द. कोरियात भटकायला. 
कुणीतरी म्हणालं, आता आलाच आहात अमेरिकेतून इतके दूर, तर आमच्या सोंगडोला पण याच जाऊन! ताजं ताजं ‘स्मार्ट’ आणि ‘सस्टेनेबल’ (शाश्वत) शहर आहे!
- म्हणून हे दोघे सोंगडोला गेले आणि तिथे चांगला दीड महिना मुक्काम ठोकून राहिले.
हे पाहायला, अनुभवायला, की या अशा चकचकीत, स्मार्ट शहरात राहणं म्हणजे असतं तरी काय नेमकं? पहिल्याने सोंगडोत पाऊल ठेवल्यावर या दोघांना एकदम स्वप्ननगरीतच आल्यासारखं वाटलं. कसला म्हणून प्रश्न नाही. कुठेही जाणं-फिरणं-प्रवास करणं, खाणंपिणं, सिनेमा-नाटकाला जाणं. काहीही असो, सगळ्याची पद्धत ठरलेली आणि त्यातली शिस्तही! या शहरात राहणा:या-आलेल्या प्रत्येकाला कोणते प्रश्न पडू शकतात, कोणत्या अडचणी येऊ शकतात याचा सखोल अभ्यास करून त्यावरची उत्तरं आधीच शोधून ठेवलेली!
- मॉडर्न कपल खूश! (तसे तर या लेखमालेचे वाचकही खूश आहेत आणि त्यातल्या अनेकांनी तर सोंगडो-भेटीची तजवीजही करायला सुरुवात केलेली आहे.) पण जसजसं सगळं रहस्य उलगडलं, प्रोसेस समजली तसतसं सोंगडोमध्ये फिरणं फारच कंटाळवाणं आहे असं या दोघांना वाटू लागलं. ‘नवं, धक्का देणारं, चकित करणारं असं काही नाहीच. एका दिशेहून दुसरीकडे निघालात की कुठून कसं जायचं हेही कुणीतरी आधीच आखूनरेखून ठेवलेलं. सहज गंमत म्हणून डावीऐवजी उजवीकडच्या गल्लीत वळू अशी काही सोयच नाही. अमक्या एका भागात आल्यावर आज जरा कॉण्टिनेण्टल खाऊ म्हटलं तर नॉट अलाउड. कारण स्थानिक कोरियन फूड कुठे मिळेल आणि कुठे इतर देशातलं हेही ठरलेलं. तिथे तेच मिळणार.’ - हे मॉडर्न कपल अगदी लवकरच कंटाळून गेलं. आल्या आल्या दिसलेल्या एकसारख्या, एका रेषेत आखून बांधलेल्या गगनचुंबी इमारती डोळ्यात भरल्या होत्या, काही दिवसांनी तोच डोलारा डोळ्यात खुपू लागला. आधी सगळीकडे पसरलेली कारंजी, तळी, बागा, हिरवाई हे सगळं सुखदसुखद वाटलं होतं. त्यातली ‘सिस्टीम’ लक्षात आल्यावर तेच सगळं निर्जीव चित्रतल्यासारखं वाटू लागलं. या शहरात गर्दी नाही, हे खरंतर पर्यटकांसाठी केवढं सुख! - पण मग सदैव आखूनरेखून, गर्दी होणारच नाही अशा पूर्वसूत्रने ठरल्या शिस्तीत धावणारे रस्ते बेजान वाटू लागले.
- आणि सगळी मजाच गेली! ही भावना फक्त पर्यटकांची नाही, सोंगडोमध्ये राहणारे नागरिकही तेच म्हणतात. इथे जे राहतात त्यात सोंगडोमध्ये काम करणा:यांची संख्या अर्थातच जास्त आहे. पण सेऊलच्या उपनगरात राहणा:या काही कुटुंबांनी (विशेषत: तरुण जोडप्यांनी) सोंगडोच्या शिस्तबद्धपणाच्या आकर्षणाने इथे घरं विकत घेतली. मुलांना उत्तम शिक्षण मिळेल, त्यांच्यासाठी जगाची दारं उघडतील म्हणून सोंगडोमध्ये नोकरी शोधून इथे स्थलांतरित झालेल्या कुटुंबांची संख्या मोठी आहे.
- पण गंमत म्हणजे, गचडीने गिजगिजलेल्या सेऊलमधल्या कलकलाटाला कंटाळून इथे आलेली हीच जोडपी विकेण्ड आला, की सेऊलला पळतात! का? - तर सोंगडोमध्ये बाकी सगळं आहे, पण ‘जान नाही’ असं त्यांना वाटतं. सोंगडोमध्ये समुद्राचं पाणी फिरवून केलेल्या कृत्रिम नदीकाठच्या शुद्ध शांततेत फिरण्यापेक्षा सेऊलमधली प्रदूषणाने भरलेली हवा त्यांना ‘जिवंत’ वाटते. हे शहर बघायला येणा:या अनेक पत्रकारांनी सोंगडोच्या आर्थिक वास्तवाचा अभ्यास मांडतामांडता या सांस्कृतिक कुचंबलेपणाची चिकित्साही तपशिलाने केलेली आहे. 
या शहराची मालकी दोन खासगी कंपन्या आणि इंचऑन शहराकडे आहे. म्हणजे पब्लिक-प्रायव्हेट ओनरशिप. गेल्या बारा वर्षात या तिघांना एका पैशाचा फायदा झालेला नाही. पण ते तसं अपेक्षितही होतं. त्यामुळे गुंतवणूकदारांची अजूनतरी तक्रार नाही. पण बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या ऑफिसांसाठी मागणी वाढण्याऐवजी सोंगडोमधल्या शाळा आणि ग्लोबल कॉन्फरन्सेस अधिक लोकप्रिय होऊ लागल्या आहेत. इथे गोल्फ खेळायला येणारे धनाढय़ येताना मौजमजेसाठी जोडीदार आणतात, भांडवल नाही. सोंगडोला चेहरा मिळतो आहे तो कधीतरी भेट देऊन तिथले तांत्रिक चमत्कार अनुभवत वेळ घालवण्याला उत्तम अशा जादूई शहराचा! बघताबघता या शहराच्या उभारणीच्या मूळ हेतूलाच बगल मिळेल, असं आता तज्ज्ञ म्हणू लागले आहेत. त्यात जागतिक मंदीने द. कोरियाच्या या महत्त्वाकांक्षी ‘प्रॉडक्ट’ला कुंपणं घातली आहेत.
 सुरुवातीला ‘स्मार्ट तंत्रज्ञाना’ची प्रयोगशाळा म्हणून वाखाणला गेलेला हा प्रयोग अपेक्षित गतीने परकीय भांडवल आकर्षित करण्यात तर अपयशी ठरला आहेच, पण आता तो एका नव्या टीकेचं कारणही बनतो आहे. तांत्रिक चमत्कृतींचं औत्सुक्य ओसरल्यावर आता लोकांना जाणवतं आहे, की सोंगडोमध्ये बाकी सगळं आहे, पण ‘आत्मा’ नाही! थोडी अव्यवस्था हवी, ऐनवेळी बदलण्याची शक्यता जिवंत हवी, वैविध्य तर हवंच! शहरं म्हणजे एक जिवंत धडधडतं हृदय असलेलं शरीरच! ते तसंच असलं पाहिजे असा आग्रह धरून ‘स्मार्ट सिटी’च्या नव्या ’हव्यासा’बद्दल शंका उपस्थित करणारे जगभरातले तज्ज्ञ आता सोंगडोचं उदाहरण देऊ लागले आहेत. संपूर्णत: स्वयंचलित व्यवस्थांवर चालणा:या या शहरांमधली हरेक कृती या तंत्रज्ञानाचं नियंत्रण करणा:या ‘सेंट्रल ब्रेन’मार्फत ठरवली-आखली-हुकुमात चालवली जाते. अशा व्यवस्थेत जगणा:या माणसांना मग हे तंत्रज्ञानच नियंत्रित करू लागतं. कुठून कुठे कसं जावं, कुठे काय खावं असे साधेसाधे निर्णय घेण्यामध्ये ‘निवडी’च्या / ‘पर्यायां’च्या शक्यता संपतात, हे माणसांना सहन होत नाही. अशा शहरात माणसं रोबोसारखी चालवली जातात, म्हणूनच ती तिथून सुटू पाहतात अशी भूमिका आता आग्रहाने मांडली जाऊ लागली आहे. रिचर्ड सेनेट हे जागतिक कीर्तीचे नागरीकरणतज्ज्ञ ‘स्मार्ट सिटी’च्या प्रयोगांकडे संशयी चिकित्सेने पाहण्याबाबत प्रसिद्ध आहेत.
सोंगडोला भेट देऊन आल्यानंतर त्यांनी लिहिलं, ‘धीस सिटी प्रूव्हज माय पॉइंट. नो वन लाइक्स अ सिटी दॅट इज टू स्मार्ट’!
 
(लेखिका ‘लोकमत’च्या फीचर एडिटर आहेत.)
aparna.velankar@lokmat.com