शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

‘उडता’ भारत!- ‘आपल्या’ घरापर्यंत पोहोचलेल्या ड्रग्जच्या दुनियेचा काळा विळखा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2021 6:03 AM

तुमच्या ओळखीच्या मुलाच्या कपड्यांवर पेंट किंवा ऑईलचे डाग दिसतात?, त्याच्या अंगाला केमिकलचा वास येतो?, तोंडावर चट्टे किंवा जखमा आहेत?, नाकातनं वारंवार वाहणारं पाणी, डोळे लाल, नजर भिरभिरती आहे?, तर, नक्की समजा, तो ड्रग्जचा शिकार झाला आहे..

ठळक मुद्देअगदी अल्पवयीन मुलांपर्यंतही ड्रग्ज विविध मार्गांनी पोहचत आहेत आणि हे मार्ग कसे उखडून टाकावेत, या विचाराने सरकारी यंत्रणा त्रस्त आहे.

- रवींद्र राऊळ

कधी रेल्वे रूळालगत, कधी खाडीकिनारी, पुलाच्या आसपास, पार्क केलेल्या गाड्यांमध्ये बसलेली टोळकी ड्रग्ज घेताना पाहिलीत का?, सिगारेटभोवती गुंडाळला जाणारा चांदीचा पातळ पत्रा खालून आगीने तापवत त्यावर टाकलेली पांढऱ्या रंगाची पावडर हुंगताना? ही टोळकी जमणारी सारी ठिकाणं अशी की, जिथून पोलीस येत असल्यास दुरूनच दिसावेत आणि पळ काढणं सोपं व्हावं. ड्रग्ज घेणारी ही टोळकी भिकाऱ्यांचीच असावीत असाच समज असेल तर, तो बहुतांशी चुकीचाच. धक्कादायक बाब म्हणजे भिकाऱ्यांप्रमाणे दिसणारी त्यातली अनेक मुलं ही चांगल्या घरातील असतात आणि ड्रग्जच्या नादापायी घर सोडून रस्त्यावरचं जिणं जगत असतात.

पाच वर्षांपूर्वी ‘उडता पंजाब’ हा तेथील व्यसनाधीनता आणि ड्रग्ज व्यापारावर आधारित निघालेला हिंदी चित्रपट. अनेक पुरस्कार मिळवणाऱ्या या चित्रपटाने पंजाबमधील वस्तुस्थिती समोर आणली. पण, सध्या ही समस्या पंजाबच्या सीमा ओलांडून देशभर पसरली आहे.

आर्यन खानपासूनचे अनेक सेलिब्रिटी आणि उच्चभ्रू तसंच कनिष्ठ वर्गातील मुलंही या ड्रग्जच्या विळख्यात अडकले आहेत. अगदी ॲडेसिव्हसारख्या अनेक स्वस्त रसायनांचाही नशेसाठी वापर केला जातो तर, ग्रॅमभर कोकेनसाठी हजारो रूपये मोजणारे धनिकही आहेत. जगभरात अब्जावधी डॉलर्सची उलाढाल करणारा हा गंदा धंदा.

जगभरात शरीरविक्रयानंतर दुसऱ्या क्रमांकावर कोणता मोठा व्यापार असेल तर, तो अमली पदार्थ विक्रीचा. ड्रग्जचा ग्राहक वर्ग सातत्याने वाढतच असतो. जगभरात सुमारे २३४ दशलक्ष लोक या अमली पदार्थांचं सेवन करतात तर, दरवर्षी सुमारे दोन लाख लोक याच अमली पदार्थांमुळे आपला जीव गमावतात. पण, तरीही त्यांचा वापर दिवसागणिक वाढतोच आहे. ही व्यसनाधीनता भारतही वेगाने गिळंकृत करत चाललाय.

अगदी अल्पवयीन मुलांपर्यंतही ड्रग्ज विविध मार्गांनी पोहचत आहेत आणि हे मार्ग कसे उखडून टाकावेत, या विचाराने सरकारी यंत्रणा त्रस्त आहे.

व्हाईटनर ही अगदी पहिली पायरी.

पण, शाळकरी वयातली मुलं काय काय व्यसनं करतात, हे पाहणं मोठं धक्कादायक आहे.

मुळात संप्रेरकांमुळं पौगंडावस्थेत व्यसनांना बळी पडण्याची मुलांची शक्यता अधिक. सुरुवातीला उत्सुकता आणि साहसाचं आकर्षण वाटतं म्हणून मुलं या व्यसनांकडं वळतात. मात्र, नंतर ते व्यसन हीच त्यांची गरज आणि हीच त्यांची ओळख होते. एका अहवालानुसार एकदा का, हे व्यसन जडलं की, ७० ते ९० टक्के व्यक्ती त्याच्या पूर्णत: आहारी जातात. त्यांना ते सोडता येत नाही. निकोटिनशिवाय एमडी व मॅफ्रेडॉनसारख्या अमली पदार्थांच्या विळख्यात आता शाळकरी विद्यार्थीही अडकलेत. ‘बुक’ या नावानं विद्यार्थ्यांमध्ये एक पावडर प्रसिद्ध आहे आणि याच वयोगटात केटामाईन, मॅजिक मशरूम यासारख्या अमली पदार्थांना प्रचंड मागणी आहे.

जर्मनीमध्ये एका संशोधकाने अफूतील वैद्यकीय भाग लक्षात घेऊन हेरॉइन हे वेदनाशामक औषध तयार केलं आणि अफूचं व्यसन करणाऱ्यांना एक सोपा मार्ग आढळला. हेरॉइन ही पांढरी शुभ्र पूड. शुद्ध स्वरुपातील हेरॉइन अत्यंत महागडं असल्यामुळे त्यात भेसळ करून, परवडेल असं ड्रग अर्थात गर्द तयार करण्यात येऊ लागलं. भारताच्या नैऋत्येला म्यानमार, लाओस आणि उत्तर थायलंड या डोंगराळ प्रदेशात अफूची शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. तिथे अफूपासून मॉर्फिन ते गर्द बनवणारे रासायनिक कारखाने आहेत. अशा गर्दची तस्करी नेपाळमार्गे चीन आणि भारतात होते. त्याचबरोबर पाकिस्तान आणि अफगाणिस्तान ही दोन राष्ट्रे अफूच्या पिकांची कोठारंच आहेत. तेथून आणि नायजेरिया या आफ्रिकन देशातून हेरॉइन तसेच गर्दची निर्यात मोठ्या प्रमाणात युरोपीय देशात आणि अमेरिकेत होते.

ड्रग्जचा धंदा करून त्यातून मिळणाऱ्या नफ्यातून शस्त्रास्त्रं विकत घेणं हा दहशतवादी टोळ्यांचा एक प्रमुख कार्यक्रम. कोणतीही हिंसा न करता भारतातील तरूण पिढी खच्ची करण्याचा ‘आयएसआय’ या पाक हेर संस्थेचा उद्देश आहे आणि त्यासाठी ते करीत असलेले प्रयत्न यशस्वी होत असल्याचं पाहावयास मिळतं.

तुमच्या ओळखीच्या मुलांच्या कपड्यांवर पेंट किंवा ऑईलचे डाग असतील, ते जवळ आल्यावर एखाद्या केमिकलचा वास येत असेल, त्यांच्या तोंडाच्या आजूबाजूला चट्टे किंवा जखमा असतील, नाकातनं वारंवार पाणी वाहत असेल, डोळे लाल दिसत असतील, नजर भिरभिरती असेल, नखांवर डाग असतील, स्वभाव चिडचिडा असेल, बोलण्यात अडखळत असतील तर, आधी त्याचा मित्रपरिवार कोण आहे याचा तपास करा, त्यांना विश्वासात घ्या. या सगळ्या ड्रग्जचा परिणाम प्रामुख्यानं हृदय, त्वचा, पचनसंस्था, श्वसनसंस्था, किडनी यासोबतच मेंदूवरही होतो.

ड्रग्जने तरूण वर्गाचा घेतलेला ताबा, ड्रग्जची खुलेआम विक्री अशी सारी स्थिती धोक्याची घंटा वाजवणारी परिस्थिती असूनही अद्याप कुणाचे डोळे उघडलेले दिसत नाहीत.

खरंच आपला देश ‘उडता भारत’ होणार, अशी धास्ती आहेच..

 

गांजाची शहाळी!

काही महिन्यांपूर्वी विक्रोळी येथे पकडलेल्या टेम्पोतून मोठ्या प्रमाणावर गांजा हस्तगत करण्यात आला. यावेळी तपास करताना तपास यंत्रणेला आढळलं, ओडीशामधून महाराष्ट्रात येणाऱ्या या गांजाची तेथील कंधमाळ भागात शेतीच केली जाते. हा माल तेथून येथे आणण्यात वेगवेगळे लोक सहभागी असतात. पण कुणासाठी आपण गांजाची वाहतूक करतोय याची त्यांना कल्पना नसते. खरेदी - विक्री करणारे आपली ओळख लपवतात. तिथे जाऊन ‘शहाळी’ भरलेला ट्रक घेऊन यायचा आणि ठाण्यात कुठेतरी कुणाच्या हवाली करायचा, इतकीच कामगिरी. त्या शहाळींखालीच गांजाची पोती लपवलेली असत.

------------------------------------------------------------------

 

मॉर्फिन ते म्याव-म्याव’!

अफू व त्यापासून तयार केलेले मॉर्फीन, हेरॉईन इ. पदार्थ, कोकेन, भांग, गांजा, चरस अशी मादक पदार्थांची यादी भलीमोठी. यापुढे जाऊन धनिक लोक सिंथेटिक अमली पदार्थांचा तसेच घातक, जीवघेण्या एमडीचा (मेफेड्रॉन) वापर करू लागले आहेत. शिवाय मॅजिक मश्रूम, एलसीडी, मारिजुआना, म्याव-म्याव, डॅरनेक्स, शिलावती, वेदनाशामक गोळ्या ते औषधे यांचाही वापर नशेसाठी केला जाऊ लागला आहे.

पाकिस्तान, नेपाळ, बांग्लादेश, अफगाणिस्तान, भूतान येथून अनेक अमली पदार्थ आपल्या देशात येतात. याची खरेदी-विक्रीही सांकेतिक चिन्हे, खुणा तसेच भाषांच्या माध्यमातून होते. मोठमोठ्या शहरांमधून ते लहानसहान गावांमध्येही विक्रेत्यांचं जाळं तयार झालेलं आहे. या विक्रेत्यांच्या माध्यमातून ते देशभर वितरित होतं.

 

स्वत:साठी प्रतिसरकारआणि

तुरुंग बनवणारा पाब्लो एस्कोबार !

जगातील आजपर्यंतचा सर्वात मोठा ड्रग माफिया. कोलंबिया देशाचा नागरिक. एक बेट, पाणबुडी, इथवर की कोलंबिया सरकारच त्याने विकत घेतलं होतं. पैशांच्या जोरावर त्याने आपल्या देशाचे कायदे बदलून टाकले. स्वत:साठी स्वत:च तुरुंग बनवणार म्हणत फाइव्ह स्टार तुरुंग तयार केला. त्यात फुटबॉल ग्राऊंडपासून स्विमिंग पुलापर्यंतच्या साऱ्या सुविधा. कोलंबिया सरकार त्याच्यासमोर झुकलं. अमेरिका सरकार त्याला घाबरू लागलं की, याचं करायचं काय? आजच्या ड्रग्जच्या धंद्याला संघटित स्वरूप देण्यात पाब्लोचाच हात आहे.

१९४९ साली पाब्लो एस्कोबारचा जन्म झाला. त्याचे वडील शेतकरी तर आई शिक्षिका. घरची स्थिती चांगली नसल्याने शिक्षण पूर्ण करता आलं नाही. अनेक गुन्हे करत वयाच्या अठराव्या वर्षापासून तो ड्रग्जच्या धंद्यात उतरला. त्याकाळी आजच्या इतका ड्रग्जचा प्रसार नव्हता.

पाब्लोने या जीवघेण्या आणि बेकायदा धंद्याला एखाद्या उद्योगाप्रमाणे स्वरूप दिलं. कोकेनला जगभरात मागणी आहे हे त्याने हेरलं. एक भंगारातील विमान खरेदी केलं आणि त्याच्या टायरमध्ये कोकेन लपवून ते अमेरिकेला पाठवू लागला. नंतर तर अनेक विमानं खरेदी केली. माशांच्या पोटातही कोकेन लपवायचा. कोलंबियामध्ये तर समांतर सरकारही सुरू केलं. नंतर राजकीय वर्तुळावर पकड बसवली.

२६व्या वर्षी पकडला गेला तेव्हा हातात पाटी घेतलेला त्याचा फोटोही हसतमुख आहे. ड्रग्जच्या केसमध्ये दहा-पंधरा वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता असतानाही पाब्लो हसत होता, कारण त्याचा ड्रग्जच्या धंद्यातून मिळणाऱ्या पैशांवर आणि त्याद्वारे कोणत्याही प्रकरणातून सहीसलामत सुटू यावर विश्वास होता. प्रशासकीय अधिकाऱ्यांपासून राजकारणी, न्यायाधीशांनाही त्याने विकत घेतलं. ज्यांना खरेदी करू शकला नाही, त्यांना त्याने ठार केलं. तो अमेरिकेत ड्रग्ज पुरवत असे. एक ग्रॅम कोकेनची हजारो रुपये किंमत असते. पाब्लो टनावारी कोकेन पुरवायचा. फोर्ब्जच्या जगातील २५० श्रीमंतांच्या यादीतही हा हजर होता ! मायामी हा अमेरिकेचा एन्ट्री पॉइंट. तेथून ७0 ते ८0 टन कोकेन दर महिन्याला अमेरिकेत जायचं. नफा तब्बल एक हजार टक्के. अगदी भारतातही त्याने पाठवलेलं ड्रग्ज आलं. १९९३ मध्ये पाब्लोची हत्या झाली..

ravindra.rawool@lokmat.com

(लेखक लोकमतच्या मुंबई आवृत्तीत उपवृत्त संपादक आहेत.)