शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
2
महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
4
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
5
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
6
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: नांदेड पोटनिवडणुकीत अखेर काँग्रेसचा विजय; रविंद्र चव्हाण यांचा १४५७ मतांनी विजय
7
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
8
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
9
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
10
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
11
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
12
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
13
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
14
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
15
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
16
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
17
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
18
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"

खैंदूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2022 6:00 AM

पिवळ्याधम्म भंडाऱ्यात रंगलेल्या सांगलीचे हळदीशी एक खास नाते आहे. शंभर दीडशे वर्षांपासून नदीकाठच्या जमिनीच्या पोटातल्या पेवात या गावाने चाळीस लाख पोती हळकुंडे साठवली. ही हळकुंडे साठवा, मग शिजवा, मग वाळवा, मग दळा.. एवढी उस्तवार करून अख्ख्या देशालाच काय, जगाला हळद पुरवणाऱ्या सांगलीचे पिवळे रहस्य शोधत केलेली भटकंती !

ठळक मुद्देहळद मूळची इंडोमलाया आणि चीनमधली. आता ती भारताचीच झालीय. कारण जगभर वापरल्या जाणाऱ्या हळदीपैकी ७० टक्के भारतातलीच असते.

- श्रीनिवास नागे

पिवळीधम्मक हळद म्हटलं की, आपसूक पुढं येतं सांगलीचं नाव. सांगलीची हळदपेठ अख्ख्या देशात नव्हे तर जगात भारी. तिला शंभर - सव्वाशे वर्षांची परंपरा. एकेकाळी जगातले हळदीचे दर सांगलीतून ठरायचे! इथं पिकणारी दर्जेदार राजापुरी हळद, वायदेबाजार, चोख सौदे, बँकांकडून मिळणारे अर्थसाहाय्य, हळद पावडर आणि पॉलिश - प्रक्रियेचे कारखाने - वेअरहाऊस - गोदामं, वाहतूक कंपन्या, अडते, खरेदीदार आणि हमीदार व्यवस्था यामुळे सांगली ‘फेमस’ झाली. सांगलीच्या मार्केट यार्डात राजापुरी आणि परपेठ हळदीची वर्षाला १७-१८ लाख क्विंटल आवक होते, तर उलाढाल एक हजार कोटींची! २००५ आणि २०१९च्या महापुरात उद्ध्वस्त झालेली नैसर्गिक साठवणूक यंत्रणा, त्यामुळं व्यापाराला बसलेला जबर फटका, २०१७पासून हळदीवर लागू केलेला जीएसटी, कोरोनानं लावलेला ‘ब्रेक’, नवे कायदे, हळद जणू शेतीमाल नसल्याचा निर्माण केलेला संभ्रम आणि आता वाळवलेल्या हळदीसह अडतीवर लावलेला जीएसटी अशा संकटांच्या छाताडावर नाचत इथल्या उत्पादकांनी आणि व्यापाऱ्यांनी अजूनही ‘नंबर वन’ सोडलेला नाही.

हळदीला पॉलिश करणारे आणि हळदपूड बनवणारे पन्नासभर छोटे-मोठे कारखाने सांगली परिसरात दिसतात. कारखान्यांचं सगळं आवार पिवळंधम्मक. मार्केट यार्डात केवळ हळदीच्या धंद्यातले ६० - ७० अडते आणि तेवढेच व्यापारी. पाच - सहा बडे निर्यातदार थेट जगभरात निर्यात करणारे. दोन हजारभर हमाल. पाच - सहा हजार लोकांना थेट आणि तेवढ्याच लोकांना अप्रत्यक्ष रोजगार देणारा हा उद्योग. देशाच्या अनेक राज्यांमधून हळकुंडं आणून सांगलीतल्या कारखान्यांमध्ये हळदीची पूड तयार केली जाते आणि नंतर तिचा बाजारांना पुरवठा. त्यामुळं इथल्या हळदीला भौगोलिक सूचकांक (जीआय) मानांकन मिळालं नसतं तरच नवल!

हळद मूळची इंडोमलाया आणि चीनमधली. आता ती भारताचीच झालीय. कारण जगभर वापरल्या जाणाऱ्या हळदीपैकी ७० टक्के भारतातलीच असते. भारतात हळदीच्या मुख्यतः दोन जातींची लागवड करतात. त्यांपैकी एका जातीची हळकुंडं कठीण व भडक पिवळ्या रंगाची. तिचा वापर रंगासाठी. तिचं नाव ‘लोखंडी हळद’. दुसऱ्या जातीची हळकुंडं जरा मोठी, कमी कठीण आणि सौम्य पिवळ्या रंगाची असतात. त्यांचा उपयोग मुख्यतः मसाल्याचा पदार्थ आणि औषधी म्हणूनच. हळदीचं भारतातलं उत्पादन सहा ते सव्वासहा लाख टनांवर, पण त्यातली केवळ १५ ते २० टक्केच हळद निर्यात होते. उत्पादनात पहिला नंबर आंध्रप्रदेशचा. त्यानंतर तेलंगणा, महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक. सांगली जिल्ह्यासह कोल्हापूरचा काही भाग, सातारा जिल्ह्यातला कऱ्हाड, मसूर, उंब्रज, वाई या भागांत राजापुरी आणि कोपरा या दोन दर्जेदार वाणांचं उत्पादन घेतलं जातं. हळकुंड, गठ्ठा, बीज, सोरा, चोरा, कोच्या अशा वेगवेगळ्या प्रकारची ही हळद असते. सांगली जिल्ह्यात हळदीचं क्षेत्र कमी असलं तरी सातारा, कऱ्हाड, वाई, तुळजापूर, बार्शी, नांदेड, आंध्र प्रदेशात कडाप्पा, दुग्गीराळा, निझामाबाद, वरंगल, मेट्टापल्ली, राजमहेंद्री, कोडू, राजमपेठ आणि नंद्याळ, तामिळनाडूत इरोड, सालेम, कन्नूर आणि उत्तर कर्नाटकातल्या विजापूर, बेळगाव इथली हळद सांगलीच्या मार्केट यार्डात विक्रीसाठी येते.

सांगलीच्या काही व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन १९१०मध्ये हळदीचा वायदे बाजार सुरू केला. व्यापारी एकमेकांच्या शब्दावर विश्वास ठेवून वायदे व्यापाराचे व्यवहार करत. त्यांचं नियंत्रण करणारी संस्था किंवा पैशांच्या देवघेवीसाठी क्लिअरिंग हाऊसची सोय त्यावेळी नव्हती. कायद्याचंही नियंत्रण नव्हतं. स्वातंत्र्यानंतर फॉर्वर्ड कॉन्टॅक्टस (रेग्युलेशन) ॲक्ट १९५२मध्ये अमलात आला. मग सांगलीच्या व्यापाऱ्यांनी वायदे व्यवहाराचं आयोजन आणि नियंत्रण करण्यासाठी ‘द स्पायसेस ॲन्ड ऑईल सीड्स एक्स्चेंज लिमिटेड’ या कंपनीची स्थापना केली. ती ११ सप्टेंबर १९५३ रोजी कंपनी ॲक्टखाली नोंदवण्यात आली. भारत सरकारनं २३ एप्रिल १९५६ रोजी प्रत्यक्षात वायदे व्यापाराचं नियंत्रण करण्यास परवानगी दिली. हळद वायदेबाजारात पहिल्यांदा शेंग आणि हळदीचा व्यापार सुरू झाला. देशातले हळद व्यापारी सांगलीचा भाव विचारून व्यापार करू लागले आणि सांगलीचा हळद बाजार देशात नंबर वन ठरला. व्यापाऱ्यांनी व्यवहारात ठेवलेली सचोटी आणि तत्काळ बिल देण्याची व्यवस्था ही हळद व्यापार वाढीस फायद्याची ठरली.

सांगलीच्या वायदे बाजारात ओरडून लिलाव व्हायचा. पण, तंत्रज्ञानाच्या युगात ही पद्धत कालबाह्य ठरली तरी सांगलीचे वायदे बाजारातले व्यापारी बदलले नाहीत. संगणक, इंटरनेटनं वायदे बाजारात आणलेलं नवं तंत्र इथल्या व्यापाऱ्यांनी स्वीकारलं नाही. परिणामी वायदे बाजार बंद पडला, असं व्यापारी पेढीसोबत हळद प्रक्रिया उद्योग सांभाळणारे शरद शहा सांगतात.

सांगलीच्या मार्केट यार्डातली शाह रतनजी खिमजी ही ९१ वर्षांची पेढी. सध्या त्यांची चौथी पिढी हळदीच्या व्यवसायात आलीय. शरदभाई तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधी. हळदीबाबत त्यांचा दांडगा अभ्यास. ते म्हणतात, सांगलीच्या दीड-दोनशे किलोमीटरच्या परिघात तयार होणारी राजापुरी हळद जादा गुणकारी. त्याला कारण इथल्या मातीचा गुणधर्म. इथली हळद राजापूर बंदरातून निर्यात होत होती, म्हणून तिला राजापुरी हळद हे नाव! सांगलीतून वर्षाला एक हजार टन हळद जपानला निर्यात व्हायची. सांगलीच्या राजापुरी हळदीतून चोरा नावाच्या तेलाची निर्मिती होते. त्या तेलापासून चेहऱ्याला लावण्याची आयुर्वेदिक उत्पादनं बनवली जातात. त्यामुळं ती केरळलाही पाठवली जायची.

- सांगलीत अलीकडच्या दहा-बारा वर्षांत आंतरराष्ट्रीय निकषांवर आधारित अत्याधुनिक कारखाने सुरू झालेत. जगाच्या बाजारपेठेत कुठंही माल वेळेत पोहोच करण्याची व्यवस्था झालीय. सेंद्रिय पद्धतीनं पिकवलेली आणि जादा औषधी गुणधर्मांची हळद मोठमोठ्या मॉल्समध्ये चक्क २,२०० रुपये किलोनं विकली जातेय!

वाळवलेली व पॉलिश केलेली हळद शेतीमाल नसल्याचं सांगत महाराष्ट्र अग्रीम अधिनिर्णय प्राधिकरणानं अडत्यांनीच जीएसटी भरावा, असा निर्णय जाहीर केला आहे. त्यावरुन सांगलीच्या हळद बाजारात एकच खळबळ उडाली आहे आणि जीएसटीवरुन मतमतांतरांचा खैंदूळ उडाला असतानाच नवा हंगाम तोंडावर आलाय…

 

(वृत्तसंपादक, लोकमत, सांगली)

(छायाचित्रे : नंदकिशोर वाघमारे)