हाता पायाला खरचटलेलं, एक डोळा सुजलेला.. बाजारात गेलेला पती या अवस्थेत घरी आल्यानं पत्नीला चिंता वाटली.. पत्नीला प्रचंड काळजी वाटत होती.. काय झालं हो.. पत्नीनं विचारलं..पती- काही नाही.. एका तरुणीच्या स्कूटीची धडक बसली.पत्नी- तिच्या स्कूटीचा नंबर पाहिलात का..? आपण पोलिसात जाऊ..पती- मला लागलंच इतकं.. वेदनाच इतक्या होत्या की नंबर पाहण्याचं लक्षातच राहिलं नाही. पण ती खूप गोरी होती.. सोनेरी रंगाचे केस होते.. हिरव्या रंगाचा सूट घातला होता तिनं.. गुलाबी रंगाच्या बांगड्या.. गडद लाल रंगाची लिपस्टिक.. हातावर मेहंदी होती.. आणि तिच्या डाव्या गालावर ओठांच्या जवळ एक तीळ होता.. पतीनं हे वर्णन सांगताच त्याचा दुसरा डोळादेखील सुजला...
बाजारात नवऱ्याचा एक डोळा सुजला; घरी बायकोनं दुसरा डोळा सुजवला; वाचा काय घडलं
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 7:50 AM