Maharashtra Assembly Election 2024 Result Kandivali Vidhansabha : कांदिवली पूर्वेतून भाजपचे अतुल भातखळकर आघाडीवर, विजयाची हॅटट्रिक मारणार का?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 09:47 AM2024-11-23T09:47:21+5:302024-11-23T09:47:54+5:30

Maharashtra Assembly Election 2024 Result Kandivali Vidhansabha : निवडणुकीत भाजपकडून अतुल भातखळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून ही जागा काँग्रेसला मिळाली असल्यानं त्यांच्याकडून कालू बढेलिया हे त्यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतलेत.

Maharashtra Assembly Election 2024 Result Kandivali east Vidhansabha BJP's Atul Bhatkhalkar leading from Kandivali East will he score a hat trick of victory | Maharashtra Assembly Election 2024 Result Kandivali Vidhansabha : कांदिवली पूर्वेतून भाजपचे अतुल भातखळकर आघाडीवर, विजयाची हॅटट्रिक मारणार का?

Maharashtra Assembly Election 2024 Result Kandivali Vidhansabha : कांदिवली पूर्वेतून भाजपचे अतुल भातखळकर आघाडीवर, विजयाची हॅटट्रिक मारणार का?

Maharashtra Assembly Election 2024 Result Kandivali Vidhansabha : मुंबई उत्तर कांदिवली विधानसभा मतदार संघात गेल्या १० वर्षांपासून भाजपचे अतुल भातखळकर यांचं वर्चस्व आहे. यावेळीही निवडणुकीत भाजपकडून अतुल भातखळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून ही जागा काँग्रेसला मिळाली असल्यानं त्यांच्याकडून कालू बढेलिया हे त्यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतलेत. सुरुवातीच्या कलांमध्ये या ठिकाणी भाजपचे अतुल भातखळकर हे आघाडीवर असल्याचं दिसून येतंय. त्यामुळे या निवडणुकीत ते विजयाची हॅटट्रिक मारणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

२००९ मध्ये हा मतदारसंघ अस्तित्वात आला. त्यावेळी ही जागा काँग्रेसनं मिळवली होती. या ठिकाणी काँग्रेसचे ठाकूर रमेश सिंह यांचा विजय झाला होता. त्यांच्यासमोर भाजपच्या जयप्रकाश ठाकूर यांना उमेदवारी देण्यात आली होती. परंतु २०१४ मध्ये जयप्रकाश ठाकूर यांचं तिकिट कापून अतुल भातखळकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. यानंतर भातखळकर यांनी ठाकूर रमेश सिंह यांचा पराभव केला. तसंच २०१९ च्या विधानसभा निवडणुकांतही भातखळकर यांनी बाजी मारली.

दरम्यान, यावेळी पुन्हा भातखळकर विजयाची हॅटट्रिक साधणार की कालू बढेलिया त्यांना विजयी रथ रोखणार हे पाहावं लागेल. २०१९ च्या निवडणुकांमध्ये त्यांनी काँग्रेसच्या अजंता यादव यांचं आव्हान होतं.

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 Result Kandivali east Vidhansabha BJP's Atul Bhatkhalkar leading from Kandivali East will he score a hat trick of victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.