विदेशी दारूचा १ कोटी ४ लाखाचा मुद्देमाल जप्त; ३ आरोपीना अटक !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2024 11:08 PM2024-02-01T23:08:34+5:302024-02-01T23:08:57+5:30

उत्पादन शुल्क भरारी पथक, महाराष्ट्रची मुंबई महामार्गावर कारवाई

1 Crore 4 Lakh worth of foreign liquor seized; 3 accused arrested! | विदेशी दारूचा १ कोटी ४ लाखाचा मुद्देमाल जप्त; ३ आरोपीना अटक !

विदेशी दारूचा १ कोटी ४ लाखाचा मुद्देमाल जप्त; ३ आरोपीना अटक !

श्रीकांत जाधव

मुंबई :  परराज्यातील स्वस्त विदेशी दारूची अहमदाबाद - मुंबई महामार्गावर अवैध वाहतूक करणाऱ्या टोळीवर सापळा रचून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महाराष्ट्र भरारी पथकाने कारवाई केली. या कारवाईत विदेशी दारूचे ७२३ बॉक्स असा १ कोटी ४ लाख ५६ हजार १८० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच ३ आरोपीना अटक करण्यात आली. 

राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक, महाराष्ट्र याना अहमदाबाद - मुंबई महामार्गावर टाटा कंपनीच्या सहाचाकी ट्रकमधून दादर नगर हवेली व दीव दमन राज्यातील विक्री करिता असलेली विदेशी दारूची अवैध वाहतूक होत असल्याची खबर मिळावी होती. त्यानुसार सापळा रचून भरारी पथकाने टाटा कंपनीचा सहाचाकी ट्रक क्र. एमएच ०४ - डी. के. ५८३१ ताब्यात घेतला. तेव्हा त्यांना वाहनांमध्ये विक्री करिता असलेले विदेशी मद्याचे ५१२ बॉक्स असा एकूण ६५ लाख ५४ हजार १६० किमतीचा मुद्देमाल हाती लागला. 
तसेच आयशर कंपनीचा सहाचाकी ट्रक एच आर ५८ सी ०९०३ या वाहनात विक्रीसाठी आणलेले दारूचे २११ बॉक्स असा ३९ लाख 
२ हजार ०२० किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

या दोन्ही गुन्ह्यात भरारी पथकाने कारवाई करत चालक रमजान शेख याला अटक करून गुन्हा दाखल केला आहे. तसेच राजतोमर सिंग आणि डेनी सिंग या दोन आरोपींना अटक केली आहे. 
या कारवाईत दोन सहाचाकी ट्रक तसेच विदेशी मद्याचे एकूण ७२३ बॉक्स असा एकूण १ कोटी ४ लाख ५६ हजार १८० किंमतीचा मुद्देमाल जप्त करून ३ आरोपीना अटक करण्यात आली आहे. 

या कारवाईत उत्पादन शुल्क भरारी पथक, महाराष्ट्र निरीक्षक विजयकुमार थोरात, निरिक्षक रियाज खान तसेच दु. निरीक्षक प्रकाश दाते. स. दु. नि. रवींद्र पाटील, जवान बाबा बोडरे, संतोष शिवापूरकर, शाहरुख तडवी, अविनाश जाधव, दिपक कळंबे यांच्या सहभाग होता. पुढील तपास निरीक्षक थोरात आणि खान करीत आहेत. 

Web Title: 1 Crore 4 Lakh worth of foreign liquor seized; 3 accused arrested!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.