कुलाबा, डोंगरीतून एक कोटी ४१ लाखांचे एमडी जप्त; सहा महिन्यात ३३ कोटींचा ड्रग्ज साठा जप्त

By मनीषा म्हात्रे | Published: September 15, 2023 09:46 PM2023-09-15T21:46:24+5:302023-09-15T21:46:53+5:30

गुन्हे शाखेची कारवाई

1 Crore 41 Lakh MD seized from Kolaba, Dongri; | कुलाबा, डोंगरीतून एक कोटी ४१ लाखांचे एमडी जप्त; सहा महिन्यात ३३ कोटींचा ड्रग्ज साठा जप्त

कुलाबा, डोंगरीतून एक कोटी ४१ लाखांचे एमडी जप्त; सहा महिन्यात ३३ कोटींचा ड्रग्ज साठा जप्त

googlenewsNext

मुंबई : अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या आझाद मैदान युनिटने कुलाबा आणि डोंगरी भागातून १ कोटी ४१ लाख किंमतीचा ७०५ ग्रॅम एम.डी (मेफेड्रॉन) साठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. गेल्या सहा महिन्यात अंमली पदार्थ विरोधी कक्षाने ३३ कोटीपेक्षा जास्तीचा ड्रग्ज साठा जप्त करण्यात आला आहे. 

पोलीस उपायुक्त प्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, आझाद मैदान युनिटचे पथक दक्षिण प्रादेशिक विभागात गस्त करत असताना, हाजी नियाझ अहमद आझमी मार्ग, कुलाबा येथे दोन जण पोलिसांना पाहून संशयास्पदरित्या पळुन जाताना दिसले. पथकाने त्यांना ताब्यात घेत, केलेल्या झाडाझडतीत एमडी मिळून आला. पुढे दोघांच्या चौकशीत डोंगरी कनेक्शन उघड होताच पथकाने आणखीन दोघांना अटक केली. त्यांच्याकडून एकूण ७०५ ग्रॅम वजनाचा १ कोटी ४१ लाख रूपये किंमतीचा एमडी जप्त केला आहे.

    यामध्ये अटक आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्या विरुद्ध डोंगरी, कुलाबा, कफपरेड, आझाद मैदान आणि आग्रीपाडा पोलीस ठाण्यात जबरी चोरी, सोनसाखळी चोरी, हत्येचा प्रयत्न तसेच सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला असे गुन्हे नोंद आहे.

सहा महिन्यात ३३ कोटींचा ड्रग्ज साठा जप्त

अंमली पदार्थ विरोधी कक्षाने गेल्या सहा महिन्यांत ८० गुन्हे नोंदवत, १६१  तस्करांना बेड्या ठोकल्या आहेत.  या कारवाईत १,२३६ किलो वजनाचे ३३ कोटी रुपये पेक्षा जास्त किंमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात यश आले आहे. या कारवाईत एम.डी. (मेफेड्रॉन) या अंमली पदार्थाचे तस्करी करणारे एकूण ११२ (१२ परकीय नागरिकांसह) आरोपीविरूध्द कारवाई केली असून, त्यांचे ताब्यातून एकूण १३ किलो पेक्षा अधिक वजनाचा व २५ कोटी पेक्षा अधिक किंमतीचा एम.डी. (मेफेड्रॉन) साठ्याचा समावेश आहे.

Web Title: 1 Crore 41 Lakh MD seized from Kolaba, Dongri;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.