Join us

मुंबईतून १ कोटी ६० लाखांचे चरस जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 4:08 AM

गुन्हे शाखेची कारवाईमुंबईतून १ कोटी ६० लाख रुपयांचे चरस जप्तगुन्हे शाखेची कारवाईलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ...

गुन्हे शाखेची कारवाई

मुंबईतून १ कोटी ६० लाख रुपयांचे चरस जप्त

गुन्हे शाखेची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : दहीसर येथून त्रिकुटाकडून १ कोटी ६० लाख रुपये किमतीचे ५ किलो चरस गुन्हे शाखेने जप्त केले. यात बिहार, नालासोपारा आणि पालघर येथील आरोपींचा समावेश असून, तिघांनाही मंगळवारी पहाटे अटक करण्यात आली. गुन्हे शाखेच्या कक्ष १२ ने ही कारवाई केली.

गुन्हे शाखेचे कक्ष १२ चे पथक दहीसर परिसरात गस्त घालत असताना सोमवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास

त्रिकुटाच्या संशयास्पद हालचाली त्यांच्या नजरेत पडल्या. त्यांच्यात सुरू असलेल्या देवाणघेवाणीदरम्यान पथकाने त्यांना रंगेहात अटक केली. इकलाख अब्बास शेख (२४, नालासोपारा), जिकरुला शेख (२१, बिहार), शमशाद अब्दुल खैर शेख (३१, पालघर), अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांना न्यायालयाने २५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

.................................