८५ नव्हे तर २२ आयआयटीयन्सना एक कोटींचे पॅकेज; आयआयटीचा खुलासा, चुकीबद्दल दिलगिरी

By रेश्मा शिवडेकर | Published: January 10, 2024 06:20 PM2024-01-10T18:20:28+5:302024-01-10T18:21:10+5:30

गेल्या वर्षीच्या तुलनेत एक कोटीच्या ऑफर अधिक आहेत.

1 crore package to 22 IITians, not 85 IIT Disclosure, Apology for Mistake | ८५ नव्हे तर २२ आयआयटीयन्सना एक कोटींचे पॅकेज; आयआयटीचा खुलासा, चुकीबद्दल दिलगिरी

८५ नव्हे तर २२ आयआयटीयन्सना एक कोटींचे पॅकेज; आयआयटीचा खुलासा, चुकीबद्दल दिलगिरी

मुंबई: पवईच्या मुंबई इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (आयआयटी) डिसेंबर महिन्यात पहिल्या टप्प्यात पार पडलेल्या प्लेसमेंट सीझनमध्ये एक कोटीहून अधिक पॅकेज मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या २२ असल्याचा खुलासा करण्यात आला आहे. आयआयटीने या आधी दिलेल्या माहितीनुसार तो ८५ होता. आपल्या चुकीबद्दल आयआयटीने दिलगिरी व्यक्त केली आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत एक कोटीच्या ऑफर अधिक आहेत. गेल्या वर्षी १६ जणांना एक कोटीच्या ऑफऱ होत्या. त्यापैकी २ देशांतर्गत तर १४ परदेशी होत्या. यंदा हा आकडा अनुक्रमे ३ आणि १९ असा आहे. यंदा एकूण ६३ परदेशी कंपन्यांनी आयआयटीयन्सना नोकरी देऊ केली आहे. १ ते २० डिसेंबर दरम्यान आयआयटीच्या प्लेसमेंट सीझनचा पहिला पहिला टप्पा पार पडला. यात ३८८ कंपन्यांनी १,३४० आयआयटीयन्सना नोकरी देऊ केली आहे. ही माहिती योग्य असल्याचे आयआयटीने खुलाशात म्हटले आहे.

संशोधन क्षेत्राला मोठे पॅकेज
यंदा संशोधन आणि विकास क्षेत्रात सर्वाधिक वेतनाचे (सरासरी) पॅकेज (३६.९४ लाख) दिले गेले. एरवी वित्त क्षेत्राला दिले जाते. यंदा वित्त क्षेत्राकरिता ३२.२८ लाख रूपयांचे (सरासरी) पॅकेज दिले गेले.

Web Title: 1 crore package to 22 IITians, not 85 IIT Disclosure, Apology for Mistake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई