मुंबईतल्या धारावीत निर्माणाधीन इमारतीचा भाग कोसळला, एकाचा मृत्यू, तिघे जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 04:00 IST2019-04-15T03:59:02+5:302019-04-15T04:00:02+5:30
धारावीतल्या पीएमजीपी कॉलनीमधील एक बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली.

मुंबईतल्या धारावीत निर्माणाधीन इमारतीचा भाग कोसळला, एकाचा मृत्यू, तिघे जखमी
मुंबईः धारावीतल्या पीएमजीपी कॉलनीमधील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा भाग कोसळला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून, तिघे जखमी आहेत. रविवारी रात्री 10.30 वाजताच्या दरम्यान ही दुर्घटना घडली आहे. कंत्राटदराच्या हलगर्जीपणामुळे या इमारतीचा भाग कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पीएमजीपी कॉलनीमधील नईम कुरेशी या प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं की, या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा भाग एका रिक्षाचालकावर कोसळला.
1 dead, 3 injured after under construction building collapses in Mumbai's Dharavi
— ANI Digital (@ani_digital) April 14, 2019
Read @ANI Story | https://t.co/zYIBUb0GdIpic.twitter.com/ADRN7wySqD
या अपघातात रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला. तर मोटारसायकलवरून जाणारी एक व्यक्तीही या अपघातात जखमी झाली. तिला उपचारासाठी रुग्णालयात हलवलं. पोलीस आणि अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून, बचावकार्य सुरू आहे.
Spot visuals: 1 dead & 3 injured after a portion of an under-construction building collapsed in Dharavi's PMGP colony in Mumbai. Injured have been shifted to hospital. #Maharashtrapic.twitter.com/x8Ci7Yh1Re
— ANI (@ANI) April 14, 2019
Mumbai: 1 dead & 3 injured after a portion of an under-construction building collapsed in Dharavi's PMGP colony. Injured have been shifted to hospital. #Maharashtra
— ANI (@ANI) April 14, 2019