Join us

मुंबईतल्या धारावीत निर्माणाधीन इमारतीचा भाग कोसळला, एकाचा मृत्यू, तिघे जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 3:59 AM

धारावीतल्या पीएमजीपी कॉलनीमधील एक बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली.

मुंबईः धारावीतल्या पीएमजीपी कॉलनीमधील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा भाग कोसळला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून, तिघे जखमी आहेत. रविवारी रात्री 10.30 वाजताच्या दरम्यान ही दुर्घटना घडली आहे. कंत्राटदराच्या हलगर्जीपणामुळे या इमारतीचा भाग कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पीएमजीपी कॉलनीमधील नईम कुरेशी या प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं की, या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा भाग एका रिक्षाचालकावर कोसळला.या अपघातात रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला. तर मोटारसायकलवरून जाणारी एक व्यक्तीही या अपघातात जखमी झाली. तिला उपचारासाठी रुग्णालयात हलवलं. पोलीस आणि अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून, बचावकार्य सुरू आहे. 

टॅग्स :मुंबईइमारत दुर्घटना