टी-शर्टमध्ये लपवले १ किलो सोने; मुंबई विमानतळावर कस्टमच्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2023 06:41 AM2023-04-29T06:41:04+5:302023-04-29T06:41:36+5:30
थायलंड येथून मुंबईत येणाऱ्या तीन प्रवाशांकडे सोने असल्याची विशिष्ट माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : थायलंड येथून शुक्रवारी मुंबईविमानतळावर आलेल्या तीन प्रवाशांनी आपल्या टी-शर्टमध्ये १ किलो सोने लपवून आणले होते. त्यांचा विमानतळावरील कस्टम विभागाने पर्दाफाश केला आहे.
थायलंड येथून मुंबईत येणाऱ्या तीन प्रवाशांकडे सोने असल्याची विशिष्ट माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. जेव्हा हे प्रवासी असलेले विमान मुंबईत दाखल झाले, त्यावेळी तीन संशयितांना अधिकाऱ्यांना बाजूला घेऊन त्यांची तपासणी केली. मात्र सकृतदर्शनी त्यांच्याकडे सोने आढळून आले नाही. मात्र, त्यांच्याकडे असलेल्या टी-शर्टमध्ये काही तरी संशयास्पद वाटल्याने अधिकाऱ्यांनी टी-शर्ट उलटा केला तेव्हा लहान आकाराच्या चिठ्ठ्यांमध्ये सोने लपविले होते. या चिठ्ठ्या टी-शर्टला चिकटवण्यात आल्या होत्या. या तीनही प्रवाशांना अटक करण्यात आली आहे.