मुंबईतील ५८ अपघातप्रवण ठिकाणी २०३ लोकांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2020 12:12 AM2020-03-06T00:12:11+5:302020-03-06T00:12:16+5:30
मुंबईतील रस्ते अपघातांमध्ये तुलनेने घट झाली असली तरी एकूण ५८ अपघातप्रवण ठिकाणांवर ९०३ अपघात झाले.
मुंबई : मुंबईतील रस्ते अपघातांमध्ये तुलनेने घट झाली असली तरी एकूण ५८ अपघातप्रवण ठिकाणांवर ९०३ अपघात झाले. यात २०३ जणांचा मृत्यू झाल्याची लेखी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधान परिषदेत दिली.
शिवसेना आमदार विलास पोतनीस यांनी मुंबईतील अपघातांबाबतचा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर मुंबईतील ५८ अपघात प्रवण क्षेत्रात मागील तीन वर्षात ९०३ अपघात झाले. यात एकूण २०३ नागरिकांना आपला जीव गमवावा लागल्याची लेखी माहिती मंत्री देशमुख यांनी दिली.
या ५८ ठिकाणांवरील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. सल्याचेही देशमुख यांनी सांगितले. याठिकाणी सूचना फलक लावण्यात आले आहेत. गरजेनुसार वाहतूक अंमलदारांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच पादचारी रस्ता ओलांडत
असल्यामुळे या ठिकाणांवर अपघात होतात.
त्यामुळे स्कायवॉकचा वापर करण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. तसेच विद्यार्थ्यांना रोड सेफ्टी पेट्रोलींग, वाहतूक सुरक्षा पंधरवडा असे प्रबोधनात्मक कार्यक्रम हाती घेण्यात आल्याचे गृहमंत्र्यांनी लेखी उत्तरात स्पष्ट केले.