Join us

म्हाडा इमारतीची भिंत कोसळून 1 ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2019 3:34 PM

साकीनाकायेथील म्हाडा इमारत क्र. 01 ची भिंत कोसळली.

मुंबई : डोंगरीमध्ये इमारत कोसळल्याची घटना ताजी असतानाच साकीनाक्याजवळील म्हाडाच्या इमारतीची भिंत कोसळून एक ठार झाला आहे. दोन महिलांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले आहे. 

साकीनाकायेथील म्हाडा इमारत क्र. 01 ची भिंत कोसळली. या भिंतीखाली दोघेजण अडकले होते. यामध्ये चंद्रकांत मुन्नाप्पा शेट्टी (40) यांचा मृत्यू झाला आहे. राजावाडी रुग्णालायात त्यांना मृत घोषित करण्यात आले आहे. तर अन्य एक जखमी संदीप कदम (35) यांच्यावर पॅरामाऊंटमध्ये उपचार सुरु आहेत.

 

डोंगरी परिसरातील तांडेल स्ट्रीट येथे असलेल्या कौसरबाग इमारत कोसळल्याची घटना १६ जुलै रोजी घडली. या दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ, पालिका, पोलीस आणि अग्नीशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि बचाव कार्य केले. या इमारत दुर्घटनेत जखमी झालेल्यांवर अजूनही जे. जे. रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी डोंगरी पोलीस ठाण्यात सर्व संबंधित अधिकारी, ठेकेदार आणि ट्रस्टींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असल्याची माहिती डोंगरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भागडीकर यांनी लोकमतशी बोलताना माहिती दिली. भा. दं. वि. कलम ३३८, ३०४ (अ) आणि ३४ अन्वये हा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. 

टॅग्स :म्हाडाअंधेरी