दुष्काळग्रस्तांना १ लाखाची मदत

By admin | Published: December 28, 2015 03:03 AM2015-12-28T03:03:04+5:302015-12-28T03:03:04+5:30

गोरगाव(पूर्व) येथील आरे रोडवरील, बाबू सायकल वाडी येथील प्रसिद्ध दत्त मंदिरातील श्री गुरुदत्त सेवा मंडळाने सामाजिक बांधिलकी म्हणून दुष्काळगस्त शेतकऱ्यांना एक लाखाची देणगी दिली आहे

1 lacs of relief to drought victims | दुष्काळग्रस्तांना १ लाखाची मदत

दुष्काळग्रस्तांना १ लाखाची मदत

Next

मुंबई : गोरगाव(पूर्व) येथील आरे रोडवरील, बाबू सायकल वाडी येथील प्रसिद्ध दत्त मंदिरातील श्री गुरुदत्त सेवा मंडळाने सामाजिक बांधिलकी म्हणून दुष्काळगस्त शेतकऱ्यांना एक लाखाची देणगी दिली आहे. उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्याकडे ही रक्कम सुपुर्द करण्यात आल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष सुधाकर देसाई आणि सचिव रवींद्र अडिवरेकर यांनी दिली.
१७ ते २४ डिसेबरपर्यंत सुमारे १० हजार भविकांच्या उपस्थितीत विभागप्रमुख आमदार सुनील प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली श्री दत्त जयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी पाच अपंगांना मोफत तीन चाकी सायकल, पाच निराधार महिलांना मोफत शिलाई मशीनचे वाटप, विशेष नैपुण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार अशा अनेक विधायक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
मंडळाच्या वतीने स्वच्छता मोहीम, प्रबोधन रक्तपेढीच्या मदतीने आयोजित रक्तदान शिबिरात १०० नागरिकांनी रक्तदान केले. महिलांसाठी मोफत गर्भाशय कॅन्सरची तपासणी, पुरुषांची आरोग्य तपासणी तर मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा सुमारे २५० नागरिकांनी लाभ घेतला.

Web Title: 1 lacs of relief to drought victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.