रमाई आवास योजनेत १ लाख १ हजार घरे मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2018 05:41 AM2018-09-22T05:41:40+5:302018-09-22T05:41:50+5:30

सामाजिक न्याय विभागाच्या रमाई आवास योजनेंतर्गत चालू आर्थिक वर्षात अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील व्यक्तींसाठी १ लाख १ हजार ७१४ घरकुले मंजूर करण्यात आली आहेत.

1 lakh 1 thousand houses approved for Ramai Awaas Yojana | रमाई आवास योजनेत १ लाख १ हजार घरे मंजूर

रमाई आवास योजनेत १ लाख १ हजार घरे मंजूर

Next

मुंबई : सामाजिक न्याय विभागाच्या रमाई आवास योजनेंतर्गत चालू आर्थिक वर्षात अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील व्यक्तींसाठी १ लाख १ हजार ७१४ घरकुले मंजूर करण्यात आली आहेत. सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी ही माहिती दिली.
जेवढ्या घरांची मागणी आली तेवढी पहिल्यांदाच मंजूर करण्यात आली. मंजूर घरकुलांपैकी सर्वाधिक २२ हजार नागपूर विभागातील आहेत. नाशिक विभाग १८८९६, पुणे विभाग १२८३०, अमरावती १४ हजार ६१४ तर औरंगाबादेत १०२३० घरकुले मंजूर करण्यात आली आहेत.

Web Title: 1 lakh 1 thousand houses approved for Ramai Awaas Yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Homeघर