म्हाडाच्या घरांसाठी १ लाख २० हजार अर्ज; लॉटरीचे स्थळ व तारीख लवकरच जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2023 07:31 AM2023-07-29T07:31:32+5:302023-07-29T07:33:25+5:30

म्हाडाच्या ४ हजार ८२ घरांच्या लॉटरीत १ लाख ४५ हजार ८४९ अर्जांपैकी अंतिमतः १ लाख २० हजार १४४ अर्जदार सहभागी होणार असून, लॉटरीचे स्थळ व तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

1 lakh 20 thousand applications for MHADA houses; The venue and date of the lottery will be announced soon | म्हाडाच्या घरांसाठी १ लाख २० हजार अर्ज; लॉटरीचे स्थळ व तारीख लवकरच जाहीर

म्हाडाच्या घरांसाठी १ लाख २० हजार अर्ज; लॉटरीचे स्थळ व तारीख लवकरच जाहीर

googlenewsNext

मुंबई : म्हाडाच्या ४ हजार ८२ घरांच्या लॉटरीत १ लाख ४५ हजार ८४९ अर्जांपैकी अंतिमतः १ लाख २० हजार १४४ अर्जदार सहभागी होणार असून, लॉटरीचे स्थळ व तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

म्हाडाच्या लॉटरीची घरे अंधेरी, जुहू, गोरेगाव, कांदिवली, बोरीवली, विक्रोळी, घाटकोपर, पवई, ताडदेव, सायन येथे असून, या माध्यमातून म्हाडाकडे ५१९ कोटींचा अनामत रकमेचा भरणा झाला आहे. तर अपात्र अर्जदारांना अनामत रकमेचा परतावा करण्यात येणार आहे.

म्हाडाच्या लॉटरीत सहभाग घेणाऱ्या पात्र अर्जदारांची यादी https://housing.mhada.gov.in  या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. २२ मे पासून ऑनलाइन अर्ज नोंदणीला सुरुवात झाल्यानंतर लॉटरीला उत्तुंग प्रतिसाद मिळाला. ११ जुलै या शेवटच्या दिवसापर्यंत १ लाख ४५ हजार ८४९ अर्ज प्राप्त झाले होते.

 १ लाख २२ हजार ३१९ अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा केला. अर्जांच्या छाननी प्रक्रियेअंती २१७५  अपात्र ठरविण्यात आले आहे. याबाबतचा तपशील संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

कुठे आले किती अर्ज / उत्पन्न गटनिहाय 

१) अत्यल्प उत्पन्न गटातील ८४३ सदनिकांसाठी २८,८६२ अर्ज
२) अल्प उत्पन्न गटातील १०३४ सदनिकांसाठी ६०,५२२  अर्ज 
३) मध्यम उत्पन्न गटातील १३८ सदनिकांसाठी  ८३९५ अर्ज 
४) उच्च उत्पन्न गटातील १२० सदनिकांसाठी २०६८ अर्ज  

     ४ हजार ८२ सदनिकांमध्ये प्रधान मंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत १९४७ सदनिकांचा समावेश आहे.  
     प्रधान मंत्री आवास योजना प्रकल्पातील घरे पहाडी गोरेगाव येथे असून या घरांकरिता २२,४७२ अर्ज प्राप्त झाले आहेत.

Web Title: 1 lakh 20 thousand applications for MHADA houses; The venue and date of the lottery will be announced soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.