राज्यात १ लाख २१ हजार रुग्ण उपचाराधीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:06 AM2021-06-25T04:06:17+5:302021-06-25T04:06:17+5:30

मुंबई - राज्यात गुरुवारी ९,८४४ नवीन रुग्णांचे निदान झाले असून १९७ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आता ...

1 lakh 21 thousand patients under treatment in the state | राज्यात १ लाख २१ हजार रुग्ण उपचाराधीन

राज्यात १ लाख २१ हजार रुग्ण उपचाराधीन

Next

मुंबई - राज्यात गुरुवारी ९,८४४ नवीन रुग्णांचे निदान झाले असून १९७ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६०,०७,४३१ झाली असून मृतांचा आकडा १,१९,५८९ झाला आहे. सध्या १,२१,७६७ रुग्ण उपचाराधीन आहेत, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

दिवसभरात ९,३७१ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ५७,६२,६६१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.९३ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,०३,६०,९३१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १४.८८ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ६,३२,४५३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत, तर ४,१६६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात मुंबईत सर्वाधिक सक्रिय रुग्ण आहेत, ही संख्या १८ हजार ६७८ आहे. त्याखालोखाल पुण्यात १७३६३, ठाणे १२९९९, सांगली ९७५३, कोल्हापूर ९७०४, सातारा ७०९९ आदी रुग्णांचा समावेश आहे.

दिवसभरात नोंद झालेल्या एकूण १९७ मृत्यूंपैकी १४९ मृत्यू हे मागील ४८ तासातील, तर ४८ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. या १९७ मृत्यूंमध्ये मुंबई १०, ठाणे मनपा १, नवी मुंबई मनपा १, मीरा भाईंदर मनपा १, पालघर १, वसई विरार मनपा २, रायगड ३१, मालेगाव मनपा ३, अहमदनगर ६, अहमदनगर मनपा २, जळगाव १, पुणे २, पुणे मनपा ५, पिंपरी चिंचवड मनपा १, सोलापूर ५, सोलापूर मनपा १, सातारा २६, कोल्हापूर २२, कोल्हापूर मनपा १४, सांगली ११, सांगली मिरज कुपवाड मनपा १, सिंधुदुर्ग १०, रत्नागिरी १६, औरंगाबाद ८, औरंगाबाद मनपा ३, लातूर १, उस्मानाबाद ३, बीड २, अकोला मनपा २, अमरावती मनपा १, बुलडाणा २, नागपूर मनपा १, गोंदिया १आदी रुग्णांचा समावेश आहे.

Web Title: 1 lakh 21 thousand patients under treatment in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.