Join us

CoronaVirus Updates: राज्यात १ लाख ३२ हजार २४१ रुग्ण उपचाराधीन; दिवसभरात ९ हजार ३६१ रुग्ण, तर १९० मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 8:59 AM

राज्यात दिवसभरात ९ हजार १०१ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत ५७ लाख १९ हजार ४५७ रुग्णांनी कोविडवर मात केली आहे.

मुंबई : राज्यात रविवारी ९ हजार ३६१ रुग्ण आणि १९० मृत्यूंची नोंद झाली आहे. परिणामी, कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५९ लाख ७२ हजार ७८१ झाली असून बळींचा आकडा १ लाख १७ हजार ९६१ आहे. सध्या १ लाख ३२ हजार २४१ रुग्ण उपचाराधीन आहेत, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यात दिवसभरात ९ हजार १०१ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत ५७ लाख १९ हजार ४५७ रुग्णांनी कोविडवर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.७६ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी ९५ लाख १४ हजार ८५८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १५.१२ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.  सध्या राज्यात ७ लाख ९६ हजार २९७ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत, ४ हजार ६८३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

मुंबईत रविवारी सापडले ७३३ रुग्ण

मुंबईत फेब्रुवारीपासून कोरोनाची दुसरी लाट आल्याने रुग्णांची संख्या वाढली होती. रोज ७ ते ११ हजारांच्यावर रुग्ण आढळून येत होते. त्यात गेल्या काही दिवसांत घट झाली आहे. गुरुवारी ६६६, शुक्रवारी ७६२, शनिवारी ६९६, तर रविवारी ७३३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. या आकडेवारीवरून मुंबईत रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासांत १९ रुग्णांचा मृत्यू झाला असून ६५० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.  मुंबईत  कोरोनाग्रस्तांचा आकडा ७ लाख २१ हजार ३७० वर पोहचला आहे. तर मृतांचा आकडा १५ हजार २९८ वर पोहचला आहे. 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई