राज्यात १ लाख ३२ हजार २४१ रुग्ण उपचाराधीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:06 AM2021-06-21T04:06:09+5:302021-06-21T04:06:09+5:30

मुंबई – राज्यात रविवारी ९ हजार ३६१ रुग्ण आणि १९० मृत्यूंची नोंद झाली आहे. परिणामी, कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५९ ...

1 lakh 32 thousand 241 patients under treatment in the state | राज्यात १ लाख ३२ हजार २४१ रुग्ण उपचाराधीन

राज्यात १ लाख ३२ हजार २४१ रुग्ण उपचाराधीन

Next

मुंबई – राज्यात रविवारी ९ हजार ३६१ रुग्ण आणि १९० मृत्यूंची नोंद झाली आहे. परिणामी, कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५९ लाख ७२ हजार ७८१ झाली असून बळींचा आकडा १ लाख १७ हजार ९६१ आहे. सध्या १ लाख ३२ हजार २४१ रुग्ण उपचाराधीन आहेत, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यात दिवसभरात ९ हजार १०१ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत ५७ लाख १९ हजार ४५७ रुग्णांनी कोविडवर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.७६ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी ९५ लाख १४ हजार ८५८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १५.१२ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ७ लाख ९६ हजार २९७ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत, ४ हजार ६८३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

दिवसभरात नोंद झालेल्या १९० मृत्यूंमध्ये मुंबई १९, ठाणे १, नवी मुंबई मनपा ३, कल्याण डोंबिवली मनपा २, पनवेल मनपा २, नाशिक मनपा १०, मालेगाव मनपा १, अहमदनगर ८, अहमदनगर मनपा २, पुणे ७, पुणे मनपा ५, पिंपरी चिंचवड मनपा ३, सोलापूर ४, सातारा २३, कोल्हापूर २१, कोल्हापूर मनपा ५, सांगली ९, सांगली मिरज कुपवाड मनपा ६, सिंधुदुर्ग १३, रत्नागिरी २६, औरंगाबाद १, औरंगाबाद मनपा १, जालना १, परभणी २, लातूर १, उस्मानाबाद १, बीड ५, अकोला ३, अमरावती २, बुलडाणा १, नागपूर १, वर्धा १ इ. रुग्णांचा समावेश आहे.

Web Title: 1 lakh 32 thousand 241 patients under treatment in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.