मुंबई : राज्यात दिवसभरात १० हजार १०७ रुग्ण आणि २३७ मृत्यूंची नोंद झाली आहे. परिणामी, राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५९ लाख ३४ हजार ८८० झाली असून, मृतांचा आकडा १ लाख १५ हजार ३९० झाला आहे. सध्या १ लाख ३६ हजार ६६१ रुग्ण उपचाराधीन आहेत.
राज्यात १० हजार ५६७ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत एकूण ५६ लाख ७९ हजार ७६४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.७ टक्के झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.९४ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी ८६ लाख ४१ हजार ६३१ प्रयोगाशाळा नमुन्यांपैकी १५.३६ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहे. राज्यात ८ लाख ७८ हजार ७८१ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत, तर ५ हजार ४०१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.
दिवसभरात नोंद झालेल्या २३७ मृत्यूंमध्ये मुंबई ११, ठाणे ७, ठाणे मनपा २, नवी मुंबई मनपा २, कल्याण डोंबिवली मनपा १, मीरा भाईंदर मनपा २, पालघर ९, वसई विरार मनपा ४, रायगड १७, पनवेल मनपा १, नाशिक १, नाशिक मनपा १८, अहमदनगर ५, जळगाव २, पुणे ७, पुणे मनपा ८, पिंपरी चिंचवड मनपा १, सोलापूर १३, सातारा १६, कोल्हापूर १२, कोल्हापूर मनपा ४, सांगली ८, सांगली-मिरज-कुपवाड मनपा ४, सिंधुदुर्ग १३, रत्नागिरी ३०, औरंगाबाद ९, जालना ३, परभणी १, परभणी मनपा १, लातूर १, उस्मानाबाद ६, बीड ६, नांदेड मनपा २, अकोला ३, अमरावती १, बुलडाणा २, वाशिम १, नागपूर मनपा १, वर्धा १, चंद्रपूर १ इ. रुग्णांचा समावेश आहे.