Join us

अकरावी विशेष फेरीसाठी १ लाख २६ हजार जागा शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 3:00 AM

अर्ज करण्याची आजची शेवटची संधी; १४ ऑगस्टला गुणवत्ती यादी जाहीर होणार

मुंबई : अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या विशेष फेरीसाठी अर्ज भरण्यास शुक्रवार, ९ ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. विशेष फेरीसाठी एकूण १ लाख २६ हजार ५६६ जागा उपलब्ध आहेत. यामध्ये वाणिज्य शाखेच्या ६३ हजार १०५, कला शाखेच्या १६ हजार २२९ , विज्ञान शाखेच्या ४४ हजार ०८१ आणि एचएसव्हीसीच्या ३,१५१ जागा उपलब्ध आहेत. कोट्याच्या जागांची संख्या ही ३५ हजार १७७ इतकी आहे. शनिवारी, १० आॅगस्ट रोजी विशेष फेरीसाठी अर्जाचा भाग १ आणि भाग २ भरण्याचा शेवटचा दिवस असून, सायंकाळी ५ वाजेपयत विद्यार्थ्यांना अर्जनिश्चिती करता येणार आहे. १४ आॅगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता विशेष फेरीची गुणवत्ता यादी आॅनलाइन जाहीर करण्यात येणार आहे.अकरावी प्रवेशाच्या तीन फेऱ्यांमध्ये कोणत्याही महाविद्यालयांत प्रवेश न मिळालेल्या, पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळूनही प्रवेश न घेतलेल्या, यापूर्वी प्रवेश मिळूनही रिपोर्टिंग न केलेल्या, प्रवेश नाकारल्या गेलेल्या विद्यार्थ्यांना विशेष फेरीसाठी अर्ज करता येणार आहे. विशेष फेरीसाठी महाविद्यालयांकडून सरेंडर केलेल्या जागांची संख्या ४३ हजार ५२८ इतकी आहे. यामध्ये कला शाखेच्या ३, ९६१ जागा, वाणिज्यच्या २३ हजार ५०४, विज्ञानाच्या १५ हजार १९९ तर एचएसव्हीसीच्या ८६४ जागांचा समावेश आहे. कोट्यातून झालेल्या प्रवेशाची संख्या ही ४१ हजार २०४ इतकी आहे.कोट्यातून आतापर्यंत कला शाखेचे ३ हजार ८८१, वाणिज्य शाखेचे २७ हजार ६८४ , विज्ञानाचे ९ हजार ३२७ ते एचएसव्हीसीचे ३१२ प्रवेश झाले आहेत. तर केंद्रभूत आॅनलाइन पद्धतीने प्रवेश झालेल्यांची संख्या १ लाख १४ हजार १२४ इतकी आहे. यामध्ये कला शाखेत झालेल्या प्रवेशाची संख्या १२ हजार १५६, वाणिज्य शाखेत झालेल्या प्रवेशाची संख्या ६६ हजार ५६२ , विज्ञान शाखेच्या प्रवेशाची संख्या ३३ हजार ८३९ तर एचएसव्हीसीमधून झालेल्या प्रवेशाची संख्या १,५६७ इतकी आहे.