राज्यात कोविड संदर्भात १ लाख ५५ हजार गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2020 02:21 AM2020-07-09T02:21:22+5:302020-07-09T02:21:45+5:30
ज्यात २२ मार्च ते ६ जुलै या कालावधीत कलम १८८ नुसार १ लाख ५५ हजार ९८४ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. याप्रकरणी २९ हजार ७९३ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. तसेच अत्यावश्यक सेवेसाठी ५ लाख ६७ हजार ३३९ नागरिकांना ते पास पोलीस विभागामार्फत देण्यात आले.
मुंबई : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात एकूण १ लाख ५५ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. साडेतीन महिन्यात राज्यातील विविध पोलीस ठाण्यात या गुन्ह्यांची नोंद झाली आहे.
राज्यात २२ मार्च ते ६ जुलै या कालावधीत कलम १८८ नुसार १ लाख ५५ हजार ९८४ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. याप्रकरणी २९ हजार ७९३ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. तसेच अत्यावश्यक सेवेसाठी ५ लाख ६७ हजार ३३९ नागरिकांना ते पास पोलीस विभागामार्फत देण्यात आले.
या दरम्यानच्या कालावधीत पोलिसांवर हल्ला करण्याच्या २९९ घटना घडल्या. त्यात ८६३ व्यक्तींना अटक केली आहे. काहींचा शोध सुरू आहे. या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १ हजार ३३५ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले व एकूण ८८ हजार, ७८३ वाहने जप्त करण्यात आली. कोरोनाचे संकट टाळण्यासाठी प्रशाासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. नागरिक मात्र याकडे दुर्लक्ष करत आहेत.