१ लाख ६३ हजार वीज ग्राहकांनी थकविले १७ हजार ५४७ लाख रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:07 AM2021-02-12T04:07:23+5:302021-02-12T04:07:23+5:30

कोरोनामुळे आकडा वाढला लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : लघुदाब औद्योगिक, वाणिज्यिक, घरगुती तसेच सार्वजनिक विभागाकडे वीजबिलांची १७ हजार ५४७ ...

1 lakh 63 thousand electricity consumers spent 17 thousand 547 lakh rupees | १ लाख ६३ हजार वीज ग्राहकांनी थकविले १७ हजार ५४७ लाख रुपये

१ लाख ६३ हजार वीज ग्राहकांनी थकविले १७ हजार ५४७ लाख रुपये

Next

कोरोनामुळे आकडा वाढला

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : लघुदाब औद्योगिक, वाणिज्यिक, घरगुती तसेच सार्वजनिक विभागाकडे वीजबिलांची १७ हजार ५४७ लाख रुपयांची थकबाकी आहे. कोरोनामुळे हा आकडा वाढला असून, आता वीजबिल वसुलीची मोहीम सुरू करण्यात आली आहे.

या थकबाकीमुळे दिनांक १ ते ८ फेब्रुवारी या कालावधीत अनेक ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला आहे. यातील ६ आणि ७ फेब्रुवारी रोजी तब्बल ६ हजार ६०२ ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरता खंडित करण्यात आला.

भांडुप परिमंडलातील ३४,८०६ लघुदाब घरघुती ग्राहकांनी वीजबिलापोटी ३३५०.१५ लाख रुपये, ६,९१४ लघुदाब वाणिज्यिक ग्राहकांनी १२०५.७४ लाख रुपये, तर ४९३ लघुदाब औद्योगिक ग्राहकांनी १५३.८६ लाख रुपये असे एकूण ४२,२१३ ग्राहकांनी ४७०९.७५ लाख रुपये थकविले आहेत.

१४२ सार्वजनिक संस्थांनी ४६.७७ लाख थकविले आहेत. याचप्रमाणे वाशी मंडलात ४६,७०५ लघुदाब घरगुती ग्राहकांनी ५२३४.४० लाख रुपये थकविले आहेत. ११,६४२ लघुदाब वाणिज्यिक ग्राहकांनी २२९१.९८ लाख रुपये, तर ४५२ लघुदाब औद्योगिक ग्राहकांनी २९०.१७ लाख रुपये थकविले असून, एकूण ५८,७९९ ग्राहकांनी ७,८१५ लाख रुपये थकविले आहेत. या व्यतिरिक्त ४४६ सार्वजनिक संस्थांनी ९८.७८ लाख रुपये थकविले आहेत.

पेण मंडलात ५३,९६० लघुदाब घरगुती ग्राहकांनी वीजबिलापोटी ३६२३.९३ लाख रुपये थकविले असून, ६,२६९ लघुदाब वाणिज्यिक ग्राहकांनी ९८६.४१ लाख आणि ४०१ लघुदाब औद्योगिक ग्राहकांनी १२१.०२ लाख रुपये थकविले. अशाप्रकारे एकूण ६०,६६२ ग्राहकांनी ४,७३१ लाख रुपये थकविले आहेत.

१,६८५ सार्वजनिक संस्थांनी १४४.५६ लाख रुपये थकविले आहेत. याबाबत ग्राहकांकडे अनेकदा पाठपुरावा करण्यात आला असून, शेवटचा पर्याय म्हणून ज्यांनी १ एप्रिल २०२०पासून एकही वीज देयक भरले नाही, अशा ग्राहकांचा वीजपुरवठा १ फेब्रुवारीपासून खंडित करण्यात येत आहे.

दरम्यान, ज्या ग्राहकांनी लॉकडाऊनपासून आजपर्यंत एकही वीज देयक भरले नाही, अशा ग्राहकांनी आपले थकीत वीज देयक भरून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणच्या भांडुप परिमंडलाचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी केले आहे.

...................

Web Title: 1 lakh 63 thousand electricity consumers spent 17 thousand 547 lakh rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.