Join us

आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी १ लाख ८६ अर्ज पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 4:05 AM

शिक्षणाचा मूलभूत अधिकार अधिनियमांतर्गत विनाअनुदानित आणि कायम विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेशासाठी यंदा आॅनलाइन अर्ज पद्धती राबविण्यात आली. त्यानुसार, आतापर्यंत २ लाख ९६ हजार २७७ मुलांच्या पालकांनी आॅनलाइन अर्ज केले आहेत.

मुंबई - शिक्षणाचा मूलभूत अधिकार अधिनियमांतर्गत विनाअनुदानित आणि कायम विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेशासाठी यंदा आॅनलाइन अर्ज पद्धती राबविण्यात आली. त्यानुसार, आतापर्यंत २ लाख ९६ हजार २७७ मुलांच्या पालकांनी आॅनलाइन अर्ज केले आहेत. त्यापैकी १ लाख ८६ हजार ३४१ अर्ज पात्र ठरले आहेत. १ लाख ८६ हजार ९३६ अर्ज अपात्र ठरल्याने, ते रद्द झाल्याची माहिती राज्य शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचनालयातर्फे देण्यात आली आहे, तसेच ३ मार्च रोजी अर्ज भरण्याची मुदत संपली होती. ही मुदत संचालनालयाने ११ मार्चपर्यंत वाढविली होती.शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अंतर्गत राज्यातील सर्व मुलांना मोफत शिक्षण मिळावे, यासाठी विना अनुदानित आणि कायम विना अनुदानित शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात, परंतु या शाळांमध्ये प्रवेश मिळविणे पालकांना कठीण जात होते. त्यामुळे प्रवेशप्रक्रिया पूर्णपणे आॅनलाइन करण्यात आली.आॅनलाइन अर्ज करण्यासाठी दुसºया फेरीत ३ मार्च ही अंतिम मुदत होती. ही मुदत वाढविण्यात आली असून, ११ मार्चपर्यंत पालक अर्ज करू शकतात.१३ मार्च रोजी दुपारी ३ वाजता प्रवेशांची लॉटरी काढली जाणार आहे. त्यानंतर, आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेत ज्या शाळेची निवड झालेली आहे, त्या शाळेमध्ये १४ मार्च ते २४ मार्चपर्यंत पालक मुलांचे प्रवेश निश्चित करू शकतात. २८ ते ३१ मार्च दरम्यान दुसरी लॉटरी काढली जाईल. २ एप्रिल ते १२ एप्रिल दरम्यान पालकांनी प्रत्यक्ष शाळेत जाऊन प्रवेश घ्यावा. १७, १८ एप्रिल रोजी तिसरी लॉटरी काढली जाईल. १९ एप्रिल ते ३ मे दरम्यान पालकांनी मुलांचा प्रवेश घ्यावा, असे आवाहन प्राथमिक संचलनालयातर्फे करण्यात आले आहे.पुण्यात सर्वाधिक ४१ अर्जांची निवडपुणे जिल्ह्यात सर्वाधिक ६८ हजार ९६० अर्ज भरण्यात आले, त्यापैकी ४१ हजार ७३२ अर्ज पात्र ठरले आहेत. त्या पाठोपाठ नागपूर विभागामध्ये ३४ हजार ६३७ अर्ज भरण्यात आले असून, त्यापैकी २३ हजार ४६० अर्ज प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. मुंबईत १६ हजार ७७३ अर्ज भरले असून, त्यापैकी १० हजार १८२ अर्ज प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत.

टॅग्स :शैक्षणिकशिक्षण क्षेत्र