मुंबई : समाज कल्याण आयुक्तालयात आस्थापनेवरील वर्ग-३ संवर्गातील २१९ विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. चार मार्चपासून राज्यातील ५६ केंद्रांवर ऑनलाइन परीक्षा सुरू झाल्या असून, १९ मार्चपर्यत त्या होणार आहेत. परीक्षेसाठी काही परीक्षा केंद्रांवर उमेदवार वेळेवर पोहोचत नसल्याचे दिसून आले आहे. तसेच उशिरा आलेल्यांनी परीक्षा केंद्रांवर प्रवेश मिळावा यासाठी शासन प्रातिनिधींशी हुज्जतही घातली. त्यामुळे परीक्षा कामकाजात व्यत्यय येऊ नये यासाठी परीक्षार्थी उमेदवारांनी निर्धारित वेळेतच परीक्षा केंद्रांवर उपस्थिती राहण्याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन समाज कल्याण विभागाने केले आहे.
दिव्यांग उमेदवारांच्या लेखनिकसंदर्भात सूचना दिल्या आहेत. दिव्यांग उमेदवाराने अर्जात नमूद केल्यानुसार स्वत:चा लेखनिक स्वत:च उपलब्ध करून घ्यायचा आहे. विभागाकडून लेखनिक दिला जाणार नाही. कॉम्प्युटरबेस ऑनलाइन परीक्षा ४ ते १९ मार्च रोजी ३ सत्रांमध्ये आहे. ५६ केंद्रांवर रोज साधारण २२ हजार उमेदवार परीक्षा देत आहेत. कोणीही भरती प्रक्रियेबाबत गैरमार्गाने नोकरी देण्याचे-परीक्षा पास करून देण्याचे किंवा तत्सम स्वरूपाचे आमिष दाखविल्यास त्याबाबत नजीकच्या पोलिस स्टेशनकडे संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
कोणत्या जागांसाठी किती अर्ज?पद आलेले अर्जवरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक ५ जागांसाठी ११,२१६गृहपाल/अधीक्षक ६१ जागांसाठी ४०,९६८गृहपाल/अधीक्षक (महिला) ९२ जागांसाठी ७३,६२५समाज कल्याण निरीक्षक ३९ जागांसाठी ५८,००९उच्चश्रेणी लघुलेखक १० जागांसाठी १,३१७निम्म श्रेणी लघुलेखक ३ जागांसाठी ६२० लघुटंकलेखक ९ जागांसाठी १,४४७
महिला अर्जदार ९९,५०८ पुरुष अर्जदार ८७,६५८ माजी सैनिक ३,४४८